फुसका बॉम्ब
एम टी एन एल ऑफिसमध्ये, एक बॅग दोन-तीन तास झाले, तरी बसायच्या बाकावर तशीच असते. पिऊनच्या लक्षात येताच, तो तिथे असलेल्या सगळ्याच लोकांना विचारतो,त्यांची आहे का ? ,सगळे नाही बोलतात. पिऊन त्याच्या साहेबांना विचारतो, की आत उघडून पाहू का? काय आहे ते ?निदान त्यात आपल्याला कार्ड तरी सापडेल, ज्यावर पत्ता असेल .
साहेब म्हणतात, ठीक आहे, तू घेऊन ये ,आपण बघूया , त्यात काय आहे .
पिऊन जाऊन बॅग घेऊन येतो आणि साहेबांसमोर उघडतो, तर त्यात रिमोट असतो, रिमोट पाहून तो साहेबांना म्हणतो ,यात रिमोट आहे ,हा रिमोट एखाद्या बॉम्बचा ही असू शकतो ,कुणीतरी नक्की बिल्डिंगमध्ये बॉम्ब लावला आहे आणि त्याचा हा रिमोट आहे.
लगेच साहेब पोलीस स्टेशनला फोन करतात आणि त्यांना या बद्दल माहिती देतात. पोलीस इन्स्पेक्टर ,त्यांना सध्या बिल्डींग खाली करायला सांगतात ,ज्याला जसे समजेल ,तसा तो जीव मुठीत घेऊन ,बिल्डींगच्या बाहेर पडतात .तितक्यात पोलिसांची गाडी येते, त्यापाठोपाठ बॉम्ब डिस्पोजल पथकाची ही गाडी येते. पोलिस त्यांना विचारतात, ती बॅग कुठे आहे. पिऊन त्यांना घेऊन जातो आणि बॅग दाखवतो .बॉम्ब डिस्पोजल पथकाचे लोकही, त्यांच्या पाठीमागे जातात ,तो बॅग दाखवतो, तो बघा रिमोट ,तसा डिस्पोजल पथकाचे लोक, बॅग चेक करायला सुरुवात करतात, ते जेव्हा बॅग पाहतात ,त्यांच्या लक्षात येतं की, जो रिमोट आहे ,तो टीव्हीचा आहे , बॉम्बचा नाही, ते तसे पोलिसांना कल्पना देतात. पोलीस बाहेर जाऊन अनाउन्समेंट करतात, की बिल्डींग मध्ये कोणत्याही प्रकारचा बॉम्ब नाही, तुम्ही आपल्या जागेवर जाऊन बसू शकता, तिकडे बॉम्ब पथकातील लोक, बॅगमध्ये अजून काही सापडते का, ते चेक करतात ,त्यांना त्यात काही कागदपत्रे सापडतात, त्यावर नाव लिहिलेले असते आणि फोन नंबर असतो. पोलीस त्या नंबर वर फोन करून, त्या व्यक्तीला विचारतात, की तुमची बॅग एमटीएनएल मध्ये राहिली आहे का?
समोरून ती व्यक्ती बोलते, एक मिनिट, मी चेक करून सांगतो, दोन मिनिटात ,पलीकडून ती व्यक्ती बोलते ,हो , माझी बॅग राहिली आहे .तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता का ?,असं इन्स्पेक्टर विचारतो. ती व्यक्ती म्हणते, मला अर्धा तास लागेल, मी येतो. इन्स्पेक्टर म्हणतो ,ठीक आहे. अर्ध्या तासाने ,ती व्यक्ती येते ,त्यांना विचारले जातं, ही तुमची बॅग आहे का?
ती व्यक्ती, हो म्हणते .पिऊन बोलतो, तुमच्या बॅग मधील रिमोट बघून, आम्हाला वाटलं ,की तो एखाद्या बॉम्ब चा रिमोट आहे आणि मग त्याने त्यांना झालेले सर्व रामायण सांगितले .
ती व्यक्ती नम्रपणे म्हणाली ,माझ्यामुळे तुम्हा सर्वांना खूपच त्रास झाला, मी त्याबद्दल ,तुम्हा सर्वांची क्षमा मागतो, मला लहानपणापासूनच विसरायची सवय आहे आणि सकाळी ही त्या सवयीने मी विसरून गेलो होतो.तसे ते एमटीएनएल चे साहेब म्हणतात ,अहो, ह्या पिऊनला हे समजायला हवे होते, की जो रिमोट आहे, तो टीव्हीचा आहे आणि मीही शहानिशा करायला हवी होती, त्यामुळे एवढा सगळा गोंधळ झाला.
पिऊन म्हणाला, खूप वेळ बॅग एकाच जागेवर असल्याने, मला तो रिमोट पाहून असे वाटले.
इन्स्पेक्टर म्हणाले, इथून पुढे काळजी घेऊन चेक करत जा आणि नंतर कळवा.
पिऊन म्हणाला, हो साहेब, इथून पुढे काळजी घेईन.
ती व्यक्ती सर्वांचे आभार मानून , आपली बॅग घेऊन गेली.
परंतु एमटीएनएल ऑफिस मध्ये मात्र या विषयावर जवळ जवळ एक महिना छान चर्चा रंगली आणि लोक पोट धरून धरून हसली.
कशी वाटली मग तुम्हाला कथा, आवडली असेल तर , नावासहित शेअर करू शकता.
धन्यवाद.
रूपाली थोरात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा