फक्त एकदा! -१ लघुकथा रिपोस्ट

suspence family story

जलद ब्लॉग लेखन - रिपोस्ट

कथेचे शीर्षक - "फक्त एकदा …..!"

लेखिका ©® स्वाती बालूरकर देशपांडे , सखी

(भाग -१)

वंदनाला जाग आली. . पण उठवेना . अंग जड पडल्यासरखं जाणवंलं .

काही तरी तिला उठण्यापासून  अडवत होतं.

जणु  कुठलीतरी अदृश्य शक्ति तिला वरून दाबतीय की काय असं वाटलं !  

कालपासून खूप थकवा होता .


मुळात असं का होतय  हे तिला कळत नव्हतं.


एरवी  घरात खूप काम असायचे, तिला विशेष मदत नसायची . पण  गेल्या तीन दिवसांमध्ये सगळेजण लग्नासाठी गेल्याने ती आणि मोठा  मुलगा दोघेच घरात होते .

तिला रजा नव्हती व मोठ्या मुलांचा बारावीचे क्लासेस होते, तो बिझी !


 या दोन दिवसात तिला तसा चांगलाच  आराम मिळाला होता, पण थकवा का येतोय  हेच कळत नव्हतं.

कालही तसेच झाले आणि आजही घड्याळात पाहिले  तर  सकाळचे साडेआठ वाजत आले होते. . हे बरं  होत की  तिला आज वीक ऑफ  होता. त्यामुळे उशीरा उठली तरीही हरकत नव्हती.

      ******************************


 दोन -तीन महिन्यापूर्वीच त्यांचं कुटुंब या घरांमध्ये स्थलांतरित झालं होतं . 
नवऱ्याची नोकरी बँकेत होती आणि त्याची इथे  ट्रान्स्फर झाली होती.
 तिने देखील मग एका प्रायव्हेट कंपनीत इंटरव्यू दिला होता .

दोनच दिवसात तिला व नवऱ्याला ऑफिस जॉईन करायचं होतं त्यामुळे घर लावायला आठवडा निघून गेला, तिचं घर तिला तिच्या मनासारखं लावायचं होतं.

 बँकेच्या सौजन्याने हा एक  बंगला किरायाने मिळाला होता.  त्यांना विशेष घराची शोधाशोध  करावी लागली नव्हती .


खाली हॉल, किचन आणि एक बेडरूम होतं  आणि वरती  मास्टर्स बेडरूम आणि मोठी ओपन टेरेस.

कितीतरी वर्षांपासून फ्लॅटमध्ये राहिल्याने आणि प्रत्येक वेळी  दोन - तीन वर्षात बदली झाल्यामुळे तिला बागकामाची आवड असूनही ती जोपासता आली नव्हती.आता  तिचं  किती दिवसांचं स्वप्न पूर्ण होणार होतं ती फुलांच्या कुंड्या ठेवणार होती. 

महिनाभरात घर खूप छान लावून झालं होतं. भेटायला येणार्‍या प्रत्येक जणाला घराच्या सजावटीचा कौतुक करावं वाटत  होतं.

दरम्यान नात्यातलं एक  लग्न निघालं ,चार दिवसांसाठी जाणं . मोठ्या मुलाच्या क्लासेस आणि तिची नोकरी यामुळे तिने जाणे टाळले.

 यावेळी सासुबाई, तिचा नवरा दिनेश आणि मुलगी लग्नाला गेले होते.

 *************************************


 आज उशीरा जाग आली, त्यात प्रचंड थकवा आणि अंगात एक जडपणा होता . . . .तिला वाटायला लागलं की डॉक्टरकडे दाखवावं की काय ?


 ठीक आहे  दिनेश परत   आल्यावरच  बघू . . नाहीतरी, एकटीला दवाखाने फिरायला नको वाटलं .
ती  फ्रेश  होवून  खाली आली.


मुलगा उठून अभ्यासाला बसलेला होता, त्याच्याशी जुजबी बोलून तिने दोघांसाठी नाश्ता बनवला. स्वयंपाकाची तयारी केली आणि पुन्हा अंघोळीसाठी वर  आली. 


नेहमी  प्रसन्न वाटणारे घर  तिला आज अचानक उदास किंवा  किंवा बेचैन जाणवायला लागलं होतं. 
थोडावेळ टीव्ही लावून बसली पण तिचं मनच लागेना.


 दुपारी तीन- चार वाजे दरम्यान  तिच्या खोलीत आराम करण्यासाठी गेली.


दुपारी पडलं  की डोळा लागला, संध्याकाळी  केव्हातरी सहज सहाच्या आसपास जाग आली.

आता  पुन्हा तसंच अंग -अंग दुखतंय,  डोकं ही जड पडलेलं , मैत्रिणीला विचारून एक गोळी घेतली. 


तिला थोड्या वेळाने बरं वाटलं.


 आणखी दोन दिवस हेच होत राहीलं व पुन्हा ती  ऑफिसला गेली.


संध्याकाळी आली. सगळं आवरलं  पण रात्री  दोन वाजता वगैरे  अचानक तिची धडधड वाढली , अंगात एक जडपणा !


तिसऱ्या दिवशी तर अक्षरशः रात्री तीन वाजता ती घाबरून उठली , कारण तिला खोलीत कुणी तरी असल्यासारखं  वाटलं व ती घाबरून खालच्या मुलाच्या बेडरूम मधे   झोपून राहिली.


 आणखी एक दिवस ती वर गेलीच नाही.

तिकडचं लग्न आटोपून  घरात सगळेजण परत आले ,पुन्हा घर भरलं .

रूटिन  सुरू झालं.

 नवऱ्याजवळ या बद्दल बोलावं असं म्हणून  तिने खूप ठरवलं होतं. .  पण  तो आल्यावर तसं काही पण झालंच नाही.


एकटेपणामुळे आपल्याला असं वाटलं असेल किंवा  बीपी वगैरे वाढला असेल , या विचाराने तिने तो विषय टाळलाच.


पुन्हा सगळं सुरळीत सुरू झालं.  तिच्या मनात ती भीती किंवा  ती भावना पूर्णतः निघून गेली.

क्रमशः


रिपोस्ट- कथा- फक्त एकदा!

लेखिका ©® स्वाती बालूरकर देशपांडे , सखी

🎭 Series Post

View all