मी 11 वीत असताना नवी कोरी स्कुटी घेतली होती आईने मला. स्कुटी एक रक्कमी घेतली. पण स्कुटी आल्या पासून चालण बंदच झाले माझे. स्कुटी च्या पहिल्या 3 सर्व्हिसिंग फ्री असायच्या जिथून गाडी घेतली त्याच सेंटरला. माझी पहिलीच फ्री सर्व्हिसिंग माझ्या डोक्यात असे नवी कोरी गाडी सगळे उत्तम आहे. सर्व्हिसिंग काय अर्धा एक तासात होईल. मी फार तर 2 तासांत घरी. रविवार चा दिवस. सकाळी थोडा नाश्ता करून घरून निघाले. फ्रि सर्व्हिसिंग मुळे पैसे घेतले नाही. तिथे गाडी ची सर्व्हिसिंग सुरू झाली आणि मला सांगण्यात आले तुम्ही संध्याकाळी 6 वाजता या गाडी घेऊन जा. इथे वेटिंग केले तर चालेल का मी विचारले तर तो म्हणे लेडीज वेटींग नाही करत इथे. आता काय करायचं. पैसे नाहीत. काही खाल्लं नाही. माझे घर 10 - 12 किलोमीटर लांब. तिथूनच एक दिड किलोमीटर मामाचे घर होते. पायी चालण्याची सवय मोडली. कसबस करत मामा च्या घरी गेले. मामाच्या घरी कुलूप. आत कंपाऊंड मध्ये वाट पहात बसले. मामा रिक्षा तुन त्यांच्या कडे 1 कुत्री होती तिला दवाखान्यात घेऊन गेला होता. ती कुत्री गेली होती. त्यांचा अति जीव तिच्यात मामा च्या मुली रडत होत्या. मग त्यांच्या घरी त्या दुःखात कोणी जेवेना. मग एका माणसा कडून मागे मोकळ्या जागेत 1 खड्डा खणून घेतला मामांनी. मी आणि मामेबहीण खडे मीठ आणायला गेलो 20 किलो आणले. तिला पूरले. या गडबडीत मला कोणी पाणी विचारले नाही. सगळा रविवार असाच गेला. मामा कडे मी पैसे मागितले नाही. तशीच सर्व्हिसिंग सेंटरला आले गाडी घेऊन घर गाठले.
?????????
1994 औरंगाबाद. आईच्या ऑफिस मध्ये 1 जणांच्या घरच लग्न होते. मे महिना भर उन्हाळ्यात. भारी साड्या, दागिने, उकाडा.... रविवार होता. लग्न 10 चा सकाळचा मुहूर्त. 11, 12, 1 वाजले लग्न लागेना. लग्न झाल्यावर जेवण. आई, मी तसे गिफ्ट दिले आणि घरी निघालो. आईच्या ऑफिस चे सर समोर आले अचानक मॅडम जेवल्या शिवाय जायचेच नाही. त्यांनी परत आत कार्यालयात नेले. आम्ही 2-3 वेळी निघण्याचा प्रयत्न केला. पण जमले नाही. लग्न 4 ला लागलै. नंतर त्यांच्याकडे पध्दत आहे पुरूषांच्या पंगती आधी बसणार 6 पंगती झाल्या. संध्याकाळी 6.30 ला पंगत बसली बायकांची. उन्हाळ्या मुळे मटकी खराब झाली होती. बुंदी संपली. पुऱ्या कडक झाल्या. घरी आलो खिचडी टाकली जेवलो.. मी आणि आई..
*सौ. भाग्यश्री चाटी सांबरे ???*
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा