Login

मनातली परी

Fairy In Mind Explaning Life
पुन्हा नव्याने सापडू लागलं
माझं व्यक्तित्व,माझं अस्तित्व
क्लिष्ट वाटणारे प्रश्न
अवघड वाटणारी गणित
सुटू लागलीत पटापट

कोंडून बसले होते मी
जीवनाच्या भयाने
तुटली होती सारी माणसं
खचले होते रस्ते
तरीही पुन्हा जगण्याच्या
उमेदीने सापडू लागतेय वाट

मनात होती खंत, कोळीष्टकं
आणि गुढ तरंगच तरंग
तेव्हा मला भेटली एक परी
जी लपली होती माझ्याच उरी
ती म्हणाली आयुष्याचे दोन पैलू
आसू आणि हसू


काय असतं आपल्या हृदयात
प्रेम निर्वाज्य प्रेम, अपूर्व माया,
अपार शांती
त्याचाच खरा शोध घे
मग आयुष्य परी कथेसारखं
आयुष्याला काही देणं
हेच माझं आता खरं जगणं


योगिता मिलिंद नाखरे