Facebook... तेव्हा आणि आता.

Facebook....Now And Then.

Facebook__तेंव्हा आणि आता


वर्ष 1990-92, कॉलेजची एखादी डिग्री हातात पडावी,अशी वाट बघणारी आमची तरुण पिढी.इतर काही जॉब, बिस नेस संबधित असणारे प्रायव्हेट कोर्स ही करत असताना,बऱ्यापैकी जम बसवत आलेला,तो कॉम्पुटर चा प्रसाराचा जमाना होता.त्यामुळे बहुतेकांनी कॉम्प्युटर चे कोर्स करणे सुरू केलेले च होते.डिग्री नंतर जॉब,त्यासाठी इंटरव्युव,आणि स्ट्रगल,यामध्ये थोडा कालावधी जातोच.
त्यानंतर थोडा वेळ लग्न कार्य जुळवने आणि पार पाडणे यात जातो.संसाराच्या गाडीचा वेग वाढत असतो.आणि कुटुंबं अन् जबाब दाऱ्या ही वाढत असतात.

मग वर्ष 92_99पर्यंत कधी गेले ते कळलेही नव्हते.आम्ही मुलींच्या पदरात आलेली आमची मुले,शालेय शिक्षणात रमायला लागली होती.हा तो काळ होता.जेव्हा कॉम्प्युटर ने आता प्रतेक प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये चांगले बस्तान बसवले होते.आणि त्यामुळेच प्रत्येक चौका चौकात सायबर क्याफे हा व्यवसाय ही छान पैसा कमवत होते.नोकरी पाण्याच्या उद्देशाने कॉम्प्युटर च्या नादी लागलेली तरुणाई सायबर क्याफेत दोन ,चार तास बसायला लागली होती...
.......
,connect to the people. म्हणजे फेसबुक .

एका जागेवर बसून तुम्ही जगभरातल्या लोकांशी कनेक्ट होऊ शकता.

फेसबुक चे ac उघडायचे आणि जगभरातल्या कोणत्याही व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट सेंड करायची.आणि ॲक्सेप्ट करायची.चॅटिंग अन् मेसेजिंग करायचे.1990-92 ला जिथं कॉलेज मध्ये असताना,एखाद्याच मुलीला फ्रेंडशिप बद्दल विचारण्यासाठी काचरणारी पिढी, फेसबुक वर मात्र अगदी बेफाम व्हायला लागली होती. फ्रेंड्स लिस्ट मध्ये,रोजच्या रोज वाढ व्हायची....दहा वरून शंभर...शंभर वरून हजार...मग एक,दोन,तीन,हाजारांच्या पुढे....!!
मुलींच्य बाबतीत तर त्यांची स्वतःची वंशावळ च फेस बुक वर घेऊन यायचे. घरातलेच भाऊ,बहिणी,चुलते, चुलत्या,मामा,मामी,आज्जी,आजोबा....आणि सर्वात सुखद आश्चर्य म्हणजे,घरामधे विरोधाभास असणारे नवरा बायको... फेसुकवरच्या लिस्टित मात्र अग्र भागी विराजमान दिसायचे.....

सोशल मीडियाचा इतका वाढता प्रभाव आणि नसत्या उठाठेवी....."नको तो नसता मनस्ताप म्हणून फेसुकवर साठी त्या वेळी केलेली टाळाटाळ.".... वर्षमागुन वर्ष गेली आणि सगळं कसं बदलत चाललय ,किती बदललंय ह्याच दृश्य स्वरूप बघण्यासाठी फेसबुक शिवाय दुसरा कोणता सोपा मार्ग उपलब्ध नसल्याने..."पळत्या पाठी राक्षस".... असं होणारच असते.तुम्ही जितके पुढे जाल,तितके तो तुमच्या मागे येणारच...!

वर्ष 2020_21_22..... आख्ख जगच जनुकाय लॉक डाऊन च्या विळख्यात अडकले होते. घरात एका जागेवर बसून,कनेक्ट टू पीपल साठी फेस बुक ने खुप चांगली साथ दिली म्हणायला काहीचं हरकत नाही.अगदी नर्सरी. च्या छोट्या छोट्या बच्चे कंपनी पासून,ते हायस्कूल काय अन् उच्च शिक्षण काय ?सर्वांच्या हातात फोन दिसू लागले....
आता स्त्रियांनाही काही पर्याय उरला नाही.ज्या फेस बुक ला टाळण्याचे मार्ग शोधले जायचे,त्याच फेस बुक वर आता बालपणीच्या,तरुण्यातल्या सख्या मैत्रिणी दिसतायत का हा नवा छंद च जडला जणू काय.मग काय ह्या खऱ्या खुऱ्या ओळखीच्या तीस ते चाळीस फ्रेंड्स असतील त्या अशांच्या फ्रेंड लिस्टित तीन चार हजार पर्यंत स्त्री मैत्रिणी दिसताहेत.....!!!

*फेमिनिझम*

स्त्री ,पुरुष समानतेच्या मनापासून विरोधात असणारे,सर्वच तरुण ,प्रौढ पुरुष फेसबुक वर मात्र वेगवेगळ्या स्त्रियांचे फोटो प्रोफाईलवर टाकून ,हजारोंच्यासंखेने आज फेस बुक वर एक सुस्वंस्कृत स्त्री म्हणून अस्तित्वात आहेत.ज्याला आपण फेक अकाउंट म्हणतो.एका स्त्रीच्या मुखवत्याचे रूप धारण करून ,दुसऱ्या एखाद्या स्त्रीला फसवण्याच काम किती सुलभतेने बजावत आहेत . त्यातही सर्व जाणकार स्त्रियांना हे चांगलेच अवगत असते.तरीही स्त्रिया ही एक पुरुषांना स्त्रियांच्या अस्तित्वाची ,सन्मानाची,जाणीव व्हावी म्हणून कदाचित बहुतेक वेळा फ्रेंड लिस्ट चा आकडा हजारोवर नेण्याचे थांबवत नसताना दिसून येत आहेत.स्त्रियांनी त्यांचे मनोगत अशापध्ढतीनेही प्रकट केले आहे की,जर फेमिनिझम ला यश मिळू न देणारे ,फेस बुक वर मात्र स्त्रियांचे नाव फोटो,धारण करून स्त्री अस्तित्वाला असा पाठिंबाच देत आहेत की...!!जशास तसे चा हा एक पैलुच म्हणावा लागेल...!!एखाद्या अनोळखी स्त्री ला मैत्रीचा प्रस्ताव पाठवण्यासाठी तरी पुरुष प्रधान संस्कृती चे पुरस्कृत पुरुषांना एका स्त्रीच्या च नावाची आणि फोटोची मदत घेऊन खोटे ,फेक ac बनवावे लागते..!!
आमच्या फेस बुक च्याच झुकर दादाने ह्याची कबुली मागे एकदा दिली आहे की,जगाच्या लोक संख्येमध्ये स्त्रियांची टक्केवारी फेस बुक वरच्या स्त्रियांच्या टक्केवारी मध्ये जास्त काही फरक नाही.....!!
आहे ना...अजब दुनियेची गजब कहाणी... बघा विचार करून...!!!

©® Sush.