
आजीच्या डोळ्याचे ऑपरेशन आणि दागिने
आजीबाई डोळ्याच्या दवाखान्यात पोहोचल्या,तिथे ओळखीची एक नर्स होती ,तिने विचारलं काय झालं ,आजी.
आजीबाई- डोळ्यानी दिसत नाही ,डॉक्टरला दाखवायचं होतं.
नर्स - आजी तिथे जाऊन तुमचं नाव सांगा,नंबर आल्यावर ती तुम्हांला सांगेल.
आजीबाई तिथे जाऊन नाव सांगितले ,तिथेच असलेल्या बाकड्यावर बसल्या आणि नंबर यायची वाट पाहत बसल्या.
नंबर आला तसं आजी आत गेल्या.
डॉक्टर-काय झालं आजी
आजी -दिसत नाही दोन्ही डोळ्यांनी
डॉक्टर चेक करतात.
डॉक्टर- मोतीबिंदू पिकलाय दोन्ही डोळ्यांचा,ऑपरेशन करावे लागेल,तुमच्या बरोबर कुणी नाही आलं का
आजी -नाही,ज्याला त्याला ज्याची त्याची काम आहे ,किती खर्च येईल
डॉक्टर-दोन्ही डोळ्यांच करायचं ,मग पंचवीस हजार रुपये लागतील,एकावेळी नाही करता येणार ,एक महिन्याच अंतर ठेवाव्ं लागेल.
आजी -बरं,मी माझ्या पोराला आणि पोरींना विचारून सांगते
डॉक्टर-चालेल,पण येताना ही फाईल घेऊन या.
--------------------------------------------------
आजी घरी आल्यावर आपल्या मोठ्या मुलीला जी शाळेत शिक्षिका म्हणून होती तिला सांगते आणि मुलाला ही सांगते ,
दोघे बोलतात ,दिवाळीची सुट्टी लागली की करू.
दिवाळी येते ,सुट्टी संपली ,तरी कुणी काहीच बोलत नाही.
आजी पण काही बोलत नाही,पण आता तिला दिसायला जास्तच त्रास होत असतो ,ती मनात काही तरी ठरवते.
तिची नात इंजिनीयरिंगला असते ,ती परिक्षा संपली म्हणून डिसेंबर मध्ये होस्टेलमधून पंधरा दिवसां साठी आलेली होती,तिची आणि आजीची वेगळीच बॉन्डींग होती .
आजीने काहीतरी ठरवलं,फाईल हातात घेतली आणि दवाखान्यात गेली ,डॉक्टरांनी विचारलं,काय ठरलं मग आजी
आजी -ऑपरेशन करायचं आहे ,आजच ऐडमिट करा
डॉक्टर- अहो पण तुमच्या जवळ कुणी तरी हवं ना
आजी-मी माझ्या नातीला बोलावते ,ती थांबेल
डॉक्टर-बारा हजार काउंटर वर भरा
आजी-पैसे नाही माझ्याजवळ ,पण हे दागिने आहेत ,ह्यात दोन्ही डोळ्यांची ऑपरेशन होईल.
डॉक्टर-मी असे दागिने नाही घेऊ शकत तुमच्या कडून
आजी-माझी मूलं काही ऑपरेशन करायचं मनावर घेतलं नाही,माझ्या जवळ पैसे नाही ,पण दागिने आहेत
डॉक्टर- बरं ठिक आहे,घेतो ऐडमिट करून,तुम्ही तुमच्या नातीला बोलवून घ्या फोन करून,घरचा फोन नंबर आहे ना तुमच्या कडे
आजी -हो आहे ,हे घ्या दागिने
डॉक्टर-राहू द्या तुमच्याकडे,बघू आपण नंतर
आजी- नाही ,तुम्ही ठेवून घेतले तर मला वाटेल की ,तुम्ही माझं खरचं ऑपरेशन करणार आहात
डॉक्टर आजींना ओळखत असतात ,त्यांना माहित होते ,ह्या काही ऐकणार नाही,ते ठेवून घेतात.
डॉक्टर- आजी काही ब्लड टेस्ट कराव्या लागतील , ऑपरेशनच्या आधी, तुम्ही सिस्टर बरोबर जा ,त्या ब्लड घेतील आणि चेकिंगला देतील .
डॉक्टर-सिस्टर ह्यांच ब्लड घेऊन टेस्ट करायला पाठवा ,ह्यांच्या कडून फोन नंबर घेऊन ह्यांच्या नातीला बोलवून घ्या आणि ऐडमिट करुन घ्या ,आता तरी खुश ना आजी
आजी-देव तुझं भलं करो बाबा
---------------------------------------------------
सिस्टर फोन करून नातीला .सायलीला बोलवून घेतात ,ती डॉक्टरला भेटते,डॉक्टर तिला सगळं सांगतात ,तसं ती म्हणते , चालेल ,करा ऐडमिट ,मी घरून पैसे भरायला कुणाला तरी बोलावते.
डॉक्टर-हे दागिने ठेव तुझ्या जवळ
सायली-सध्या राहू द्या,पैसे भरल्यावर द्या,आजीला कुठे ऐडमिट केल आहे
डॉक्टर-सिस्टर यांना आजीच्या रूम मध्ये न्या ,संध्याकाळी रिपोर्ट आल्यावर कळेल की,उद्या ऑपरेशन करु शकतो का ,तो पर्यंत घरच्यांना बोलवा
सायली-हो डॉक्टर
सायली आजीच्या रूममध्ये जाते.
सायली-तू मला आधी बोलली असतीस,तर मी तुझ्या बरोबर आले असते,बरं मी मामाला फोन करून बोलावते.
आजी-नको ,तुझ्या बापाला बोलव,दुसरं कुणी मला समजू शकत नाही,तुझी आईपण नाही ,तिची दिवाळीची सुट्टी संपली तरी तिने विषय काढला नाही,एकदा तुझ्या बापाने विषय काढला तर म्हणाली ,उन्हाळ्यात करु ,माझी पोरगी असून तिला काळजी नाही .
सायली-ठिक आहे ,मी दादांना फोन करते
सायलीचे वडील आजीचे जावई पण आणि भाचे पण, लहानपणापासून मामाकडेच राहत होते ,कारण ते लहान असताना त्यांचे वडील देवाघरी गेले होते,मामांनीच त्यांना लहानाचे मोठे केले होते,त्यावेळी सातवी झाली की,शिक्षकाची नोकरी मिळाली,मग काय मामाची छोकरी पण मिळाली ,सायलीच्या आईला त्यांनी लग्नानंतर डी एड ला टाकले ,म्हणून आज ती शिक्षिका होती ,पण आजी वर त्यांचा खूप जीव होता.
सायलीने वडिलांना फोन करून कल्पना दिली,ते संध्याकाळी डॉक्टरला भेटले,रिपोर्टही चांगले होते ,सायलीच्या बाबांनी पैसे भरले ,डॉक्टरांनी त्यांच्या कडे दागिने सुपूर्द केले ,दुस-या दिवशी सकाळी ऑपरेशन करायचं ठरवलं.
डॉक्टर-एक विचारू का
सायलीचे वडील-हो विचारा ना
डॉक्टर-तुम्ही यांचा मुलगा तर नाही ,कारण मी ह्यांच्या मुलाला ओळखतो,मग तुम्ही
सायलीचे वडील- मी त्यांचा जावई आणि माझी मामी पण लागते ,तिनेच आम्हाला लहानाच्ं मोठं केलं आहे,एवढं तर करुच शकतो आणि तिला खरचं त्रास होत असेल,ती खूप दिवस झाले बोलत होती ,पण तिचे कुणी मनावर घेत नव्हते.
आता ती ऐडमिट झाली आहे ,तर कुणी काही म्हणणार नाही आणि माझी मुलगी थांबेल तिच्या सोबत,मी येतो उद्या सकाळी ऑपरेशनच्या आधी.
सायलीचे वडील दोघींना डबा आणायला घरी गेले.
घरी गेल्यावर सगळ्यांना ऐडमिट झाल्याची कल्पना दिली , दागिने सायलीच्या आई जवळ ठेवायला दिले आणि सांगितले, घरी आल्यावर त्यांना दे त्यांच स्त्रीधन ,किती दिवस झाले त्या म्हणत होत्या,पण तुम्ही लोकांनी मनावर घेतलं नाही,तुम्ही म्हातारे झाल्यावर कळेल तुम्हाला ,की मुलांनी आपलं ऐकलं नाही की ,किती त्रास होतो,कलियुग आहे ,जसं कराल तसं भोगावं लागतं आणि तुझ्या भावाने मामा आणि मामीशी मुलांसमोर चांगल वागलं पाहिजे,कारण मूलं जे बघतात त्याप्रमाणे वागतात.
उद्या सकाळी ऑपरेशन आहे ,तुझ्या भावाला सांग आणि पैशाचं टेन्शन घेऊ नकोस म्हणावं,पैसे भरून आलो आहे मी.
दुस-या दिवशी सकाळी आजीच ऑपरेशन यशस्वी होतं ,एक दिवस दवाखान्यात ठेवून घरी सोडतात ,घरी काय काळजी घ्यायची ते सायलीला सांगतात ,त्याप्रमाणे सायली काळजी घेते,आठ दिवसांनी पट्टी काढतात ,तर छान दिसतं म्हणून आजी खूश असते ,पुढच्या दोन महिन्यानी दुस-या डोळ्यांचे ऑपरेशन फिक्स होतं ,तेही यशस्वी होतं,आजी आता छान दिसतय म्हणून खूपच खुश होती,सायलीच्या आईने आजीचे सगळे दागिने तिच्या हातात दिल्यावर ,ती सगळे समजून चुकली आणि आपल्या मुलीला म्हणाली ,माझा जावई हिरा आहे,त्याला कधीही दुखवू नको.
आता आजी नाही आहे ,पण तिच्या आठवणी आणि तिचे शब्द मात्र ऋदयात विराजमान आहे.
कधीही आपल्या वडीलधा-या माणसांकडे दुर्लक्ष करु नका , एक दिवस आपणही त्या अवस्थेत जाणार आहोत.
तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर नावासहित शेअर करा,हसत रहा ,वाचत रहा,आनंदात रहा आणि अभिप्राय अवश्य द्या.
रुपाली थोरात