Dec 06, 2021
मनोरंजन

असाही एक त्रिकोण

Read Later
असाही एक त्रिकोण

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

दारावरची बेल वाजली आणि छोटा विनय बाबा आले ss अस म्हणून दार उघडायला धावला. संध्याकाळची वेळ होती म्हणून त्यांची आई त्यांच्या मागे धावली पण तो पर्यन्त त्यांनी दार उघडलं होतं. दारात एक सुटा बुटातला अनोळखी माणूस उभा होता. विनय गोंधळला. त्याच्या आईने म्हणजे वसुधाने कोण आलंय ते ओळखलं आणि मागेच थबकली आणि दारा आडून बघू लागली.
काय रे हरीचा मुलगा का तू. ? काय नाव तुझं. ?
विनय हरीहर रायरीकर.
छान नाव आहे रे. बरं तुझा बाबा आहे का ?
नाही ते अजून ऑफिस मधून यायचे आहेत.
मग कोण आहे घरी ?
तुम्हांला का सांगू ?
तुझी आई आहे का ?
आहे.
बोलाव
आत मधून वसुधा हा संवाद ऐकत होती. तिने येणाऱ्या माणसाला ओळखलं होतं आणि ती स्वयंपाकघरात गेली आणि रेवतीला म्हणाली की कोणी तरी आलंय, तूच जा समोर.
का ग ?
तू जा म्हणजे तुला कळेल.
विनयच्या आई ,आई अशा हाका चालूच होत्या.
रेवती समोरच्या खोलीत आली आणि तिला धक्काच बसला. तिला लगेचच कळलं की वासुधाने तिलाच का जायला सांगितलं ते. प्रथम तिने विनयला आत पिटाळलं.
अरे भाऊजी तुम्ही ! असे अचानक आलात ? अहो पत्र तरी पाठवायचं.
चार पत्रं पाठवली पण एकाचंही उत्तर नाही. तुम्हाला ती पत्र मिळाली नसणार कारण तुम्ही गावच बदललं. शेवटी गावी गेलो तेंव्हा कळलं की तुम्ही इथे आहात म्हणून. मग इथे आलो.
इतक्या वर्षांनंतर अचानक यायचा कसा विचार केलात ? आमची कशी काय आठवण झाली ? तुम्ही तर सर्व संबंध तोडून गेला होतात.
विश्वास काही बोलणार तितक्यात हरिहर आला. विश्वासला पाहून त्याला आश्चर्यच वाटलं. कपाळावर आठ्या घालत त्यांनी विचारलं की अचानक इथे कसा काय ? तू तर आफ्रिकेला असतोस न ? आणि सामान दिसत नाहीये यांचा अर्थ वापस भारतात आला आहेस आणि घर केलं आहेस अस समजायचं का ? की दुसरीकडे उतरला आहेस ?
नाही मी आफ्रिकेतच असतो. ती मोठी कहाणी आहे. सर्व सांगतो पण आधी काही चहा पाणी देशील की नाही ?
रेवती हरीहर कडेच बघत होती त्यानी मान डोलावल्यावर ती आत गेली.
चहा पिता पिता विश्वास बरंच काही सांगत होता. आफ्रिकेत त्यांनी अतिशय कष्टाने कसं बस्तान बसवलं व्यापारात आणि आता कशी चांगली सुस्थिती आली आहे वगैरे वगैरे. हरिहर आणि रेवती ऐकत होते पण त्यांना अजूनही काही थांग लागत नव्हता की हा अचानक भारतात का आला ते. विश्वास थांबल्यांवर हरीहर म्हणाला की
एवढं सगळं सांगितलं पण इथे येण्याचं प्रयोजन काय ते नाही सांगितलंस.
अरे मी इथे इतक्या वर्षांनंतर आलोय त्याचा आनंद झालेला दिसत नाहीये.
नाही. खरं सांगायचं तर नाही. तू तर आमच्याशी सर्व संबंध तोडूनच गेला होतास ना ? तेंव्हा आता मुद्दया चं बोल. Come to the point.
मी माझ्या बायकोला, यशोदेला न्यायला आलो आहे. ती कुठे आहे ?
आत मध्ये काही आवाज झाल्यासारखा वाटला म्हणून रेवती आत आली. स्वयंपाकघरात वसुधा छोट्या विनय ला पोटाशी घेऊन बसली होती. रेवतीला तिच्याकडे बघून भडभडून आलं आणि रेवतीला तो भयंकर दिवस आठवला.
***
त्या दिवशी संध्याकाळी बराच उशीर झाला तरी विश्वास घरी परतला नव्हता. रात्रीचे दहा वाजले होते आणि आता हरिहारला सुद्धा काळजी वाटायला लागली. १९५३-५४ सालचा काळ होता आणि कोणांकडेही फोन नावाची वस्तु नव्हती. हरीहर सायकलने विश्वासच्या मित्रांकडे चौकशी करायला निघाला. दीड एक तासाने वापस आला तेंव्हा त्याला वाटलं होतं की विश्वास घरी आला असेल म्हणून. पण तसं काही झालं नव्हतं. रात्रभर वाट पाहून सकाळी हरिहर पोलिसांना कळवायला गेला. त्यांनी complaint नोंदवून घेतली आणि सांगितलं की आम्ही शोध घेतो. यशोदा रात्रभर रडत होती तिला समजावता समजावता रेवती आणि हरीहर ची पुरेवाट झाली. आठवडाभर रोज हरीहर पोलिस स्टेशन मध्ये चकरा मारत होता. नंतर आठवड्यातून एकदा आणि मग थांबला. महिन्याभरा नंतर सर्वांनाच कळलं की आता विश्वास येणार नाही. कुठेही आसपास अपघात किंवा मृत्यूची बातमी नव्हती तेंव्हा स्पष्ट झालं की विश्वास पळून गेला. पण का ? याचं उत्तर मिळत नव्हतं. हे उत्तर सहा महिन्यांनी मिळालं.
विश्वासचं पत्र आलं. पत्रावर युगांडा चा शिक्का होता. पत्रात लिहिलं होतं की तो आता आफ्रिकेत युगांडा या देशात आहे. आणि तिथेच राहून नशीब आजमावणार आहे. यापुढे घरात कोणाशीही संबंध ठेवण्याची इच्छा नाही. त्यामुळे इत:पर माझा शोध घेण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये. यशोदेला मी टाकली आहे. यशोदे बद्दल वाईट वाटत पण त्याला काही इलाज नाही.
तिची सोय तीने बघावी.
या पत्रानंतर घरातलं वातावरण बदलून गेलं. यशोदा इतके दिवस मनात काही आशा धरून दिवस कंठत होती पण आता सारंच बदललं होतं. यशोदाच्या नवऱ्याने तिल टाकल आणि तो पळून गेला ही बातमी लवकरच पसरली. आजूबाजूच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना खूपच पुळका आला. त्या चौकशीच्या निमितानी यायच्या आणि बरंच काही बोलून जायच्या. दिवसेंदिवस यशोदा खचत चालली होती. एक दिवस कोणाकडे तरी हळदी कुंकू होतं आणि एक छोटी मुलगी बोलावणं करायला आली होती. रेवती आणि यशोदा दोघी गेल्या. यशोदा नको नको म्हणत होती पण रेवती म्हणाली की चार चौघांत मिसळली तर बर वाटेल, म्हणून तिच्या बरोबर गेली.
जीच्याकडे हळदी कुंकू होतं तिच्या आते सासुबाईंनी यशोदाला पाहिलं आणि एकदम टिपेच्या स्वरात बोलली की हिला कोणी बोलावलं ? ही अवदसा इथे का आली, निर्लज्ज पणाचा कळस आहे. हिचा नवरा हिला कंटाळून पळून गेला आणि तरी ही निर्लज्ज इथे आमचं घर नासावायला आली, हीला आधी घालवा.
हा एवढा अपमान झाल्यावर दोघी जणी तिथे थांबण शक्यच नव्हतं. पण हा प्रसंग यशोदेच काळीज विदीर्ण करून गेला. त्या नंतर ती कुठे बाहेर निघेनाशी झाली. आतल्या आत कुढत राहिली. घरातल्या सगळ्या कामाचा भार तिने आपल्या अंगावर घेतला. तिला कसं समजवाव हे रेवती आणि हरीहरला कळत नव्हतं. दिवस असेच जात होते.
अशातच तिचा भाऊ एक दिवस तिला न्यायला आला. तो तिला घरी चल म्हणत होता. आता इथे तू आश्रित म्हणून राहणार, त्यापेक्षा माझ्याबरोबर चल. तिथे तुला काही खायला प्यायला कमी पडणार नाही अस म्हणाला. तो असं म्हणाला खरं पण त्यांची देहबोली काही वेगळच सांगत होती. रेवतीच्या ते लक्षात आलं. तिनेच परस्पर उत्तर दिलं.
हे बघा भाऊजी, यशोदेला इथे कशातच कमी पडत नाहीये. दुसरं ती आमची आश्रित नाहीये. ती या घराची मालकीण आहे. माझी मोठी जाऊ आहे. त्या मुळे तुम्ही हा विचार मनातून काढून टाका की ती इथे आपलं मन मारून राहात आहे. बाकी तिची मर्जी.
काय ग यशोदे काय विचार आहे ?
दादा मी इथेच रहाणार. हेच माझं घर आहे. उलट तिथलाच मला भरवसा वाटत नाही. तू जा. माझी काळजी करू नको.
तिच्या भावाचा चेहरा एकदम उजळला. तिचं मन बदलायच्या आंगोदार आपण इथून काढता पाय घ्यावा या विचाराने तो उठला आणि म्हणाला तर मग मी निघतो आता. बाकी यशोदे तुला केंव्हाही वाटेल तेंव्हा तो माहेरी येऊ शकतेस. चालतो मी.
त्याच दिवशी रात्री रेवती हरिहारला म्हणाली
अहो मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. महत्वाचं आहे.
रेवती, ज्या पद्धतीने यशोदाच्या भावाने पळ काढला, त्याने माझं मन उद्विग्न झालं आहे. आज काही बोललं नाही तर चालणार नाही का ?
दुसऱ्या दिवशी रात्री रेवतीने पुन्हा विषय काढला.
हं सांग काय सांगायचं ते.
मला यशोदेची परवड पाहवत नाही. यातून काही मार्ग काढला पाहिजे.
मी काय बोलू ? तिलाच विचार दुसऱ्या लग्नाला तयार आहे का ? मग बघू आपण तिच्या साठी. तुझ्या पाहण्यात आहे का कोणी ?
आहे.
कोण ?
तुम्ही.
काय ? रेवती तू शुद्धीवर आहेस ना ?
होय मी पूर्ण विचारांती हे तुमच्याशी बोलते आहे. तिच्यावर येऊ नये ती वेळ आली आहे आणि आपण, तिच्या सर्वात जवळची माणसं गप्प बसलो तर देव आपल्याला क्षमा करणार नाही. ती मला बहिणी सारखी आहे आणि मी तिचं दुख: उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाहीये.
रेवती तू अस विचित्रा सारखं बोलशील असं वाटलं नव्हतं. डोक ताळ्यावर आहे ना ? आणि यशोदा तरी कशी तयार होईल ? हा प्रश्न उपस्थित करून तू काय साधलस ? अग उद्या तिच्या समोर जातांना माझी स्थिति किती अवघडल्यासारखी होईल यांची तुला कल्पना नाही. मी आत्ताच अस्वस्थ झालो आहे. आणि तुझं काय होईल ? प्रत्येक गोष्टीत भागीदारी करावी लागेल. सवत आणायला तुझी तयारी असली तरी माझी नाही. मला, तुझ्या माझ्या मध्ये कोणी तिसरं नको आहे. तो काळ आता मागे पडला. बहुधा पुढच्याच वर्षी कायदा येतो आहे एक पत्नीत्वा चा.
अहो यशोदेचा विचार तिच्या भावाने तर केला नाही. मग आपल्या शिवाय कोण आहे तिला. मागे हळदी कुंकू ला गेलो होतो तेंव्हा काय प्रकार घडला हे तुम्हाला माहीत आहे. किती अपमान सहन करायचा तिने. आपलं काही कर्तव्य आहे की नाही ? काळ बदललेला असला तरी समाजात वावरायचं म्हणजे कुंकवाचा धनी लागतोच. नाहीतर असे अपमान सहन करायचं कपाळी येतं.
आपणहून सवत आणा म्हणणारी तू एकटीच असावीस, पण मला हे पटत नाहीये. मला जरा विचार करू दे. जरा वेळ दे मला.
ठीक आहे. तुमचा विचार पक्का झाला की सांगा. मग मी यशोदेशी बोलेन. तो पर्यन्त नाही.
ठीक आहे पण तू हे उपकाराच्या भावनेतून बोलत नाहीस ना ? तस असेल
तर काही दिवसांनी पश्चात्ताप करायची वेळ यायची . तू सुद्धा विचार कर याचा. घाई करू नकोस.
आठ दिवस तसेच गेले. हरिहरची मनस्थिति विचित्र झाली होती. यशोदेसमोर आता तो नेहमीच्या सहजतेने वावरू शकत नव्हता. आणि मग तो प्रसंग घडला.
यशोदेचा भाऊ आला. पण आता त्यांच्या येण्यामागे एक वेगळंच कारण होतं. त्यांची बायको गरोदर होती आणि तिला घरकामाला बाई हवी होती. फुकटात मिळाली तर चांगलच असा विचार करूनच तो यशोदेला न्यायला आला होता.
यशोदे मी तुला घेऊन जायला आलो आहे. इथे परक्या घरी किती दिवस राहशील ? माझ्या घर तुझ हक्काचं घर आहे, तू चल माझ्या बरोबर.
वाहिनी गरोदर आहे ही बातमी आतापर्यन्त यशोदे पर्यन्त पोचली होती. आणि तिला, भावाला जो प्रेमाचा उमाळा आला होता त्याचं कारण न कळण्याइतकी ती भोळी नव्हती. तिने स्पष्ट शब्दांत नकार दिला.
पण भावानी आपला मुद्दा पुढे रेटला. यशोदे तू चल माझ्याबरोबर नाहीतर हरीहरची ठेवलेली बाई म्हणून शिक्का बसायला वेळ लागणार नाही.
यशोदा भयंकर चिडली. लालबुंद चेहऱ्याने ती म्हणाली,
तू भाऊ असून तुला माझ्या बद्दल अस बोलवतं तरी कस ? भाऊजी स्वच्छ चारित्र्याचे आहेत. माझी जाऊ, जाऊ नसून सख्ख्या बहिणी सारखी आहे. तूच विकृत मनाचा आहेस. मला यापुढे तुझ्याशी कसलाच संबंध ठेवायचा नाही. इथून ताबडतोब चालता हो तू. आणि तिने भावाला जवळ जवळ ढकलतच घरा बाहेर काढलं.
हरीहर कामावर गेला होता. संध्याकाळी घरी आल्यावर त्याला हा सगळा प्रकार कळला. यशोदा कुठे आहे ? तिची मनस्थिति कशी आहे ? त्यांनी विचारलं.
दुपारपासून तिने स्वत:ला खोलीत कोंडून घेतलं आहे. नुसती रडते आहे. मी विचार केला की काही वेळ तिला एकटं राहू द्याव. जरा मन शांत झालं की येईल बाहेर.
मला अस वाटतंय की ह्या दुष्ट चक्रातून तिची सुटका करायची असेल तर मला तू सुचवलेला पर्याय मान्य करावाच लागेल. तू बोल तिच्याशी. पण एक लक्षात ठेव, मी दोघींच्या मधे भेदभाव करू शकणार नाही. तुम्ही दोघी समान पातळीवर असणार आहात. नंतर “हेची फळ काय मम तपास” अशी तुझी अवस्था व्हायला नको. बघ पुन्हा विचार कर, कारण एकदा निर्णय घेतला की मागे वळता येणार नाही.
मी सगळं विचार केला आहे. आणि तुमच्या न्याय बुद्धी वर माझा पूर्ण विश्वास आहे.
ठीक तर मग बोल तिच्याशी.
आणि मग एक दिवस हरेश्वराच्या सभामंडपात हरीहर आणि यशोदेच लग्न झालं. यशोदेला जशा पूर्वीच्या आठवणी नको होत्या तसंच नाव पण नको होतं. हरीहर ने तिचं वसुधा नाव ठेवलं. साधारण वर्षभरात त्यांनी आपलं बस्तान पुण्याला हलवलं. वाडया मधल्या दोन खोल्या ठेऊन बाकी भाड्याने दिल्या. हरीहर एक हुशार वकील होता त्यामुळे पुण्याला जम बसवणं काही जड गेलं नाही. रेवतीला विकास आणि वासुधाला विनय अशी मुलं झाली. सगळं कसं छान चाललेलं होतं आणि आता जवळ जवळ १२ वर्षांनंतर अचानक विश्वास घरी आला होता घरातलं वातावरण गढूळ करायला. सुखी संसारात मिठाचा खडा टाकायला.
***
तिचा नाद सोड. तू तिला केंव्हाच टाकून निघून गेला होतास. आता १२ वर्षांनंतर तिची आठवण येऊन काय उपयोग आहे. आता ती माझी पत्नी आहे. तू आता दुसरी कोणी बघ आणि सुखात रहा. हरीहर बोलला.
तू हे बरोबर केलं नाहीस अरे नवरा बायकोचं नातं अस तुटत नसतं. तू तिला बोलाव. मला तिच्याशी बोलू दे. तिला तुझ्यापासून मुलगा झाला आहे हे मला कळलं आहे. मी त्यांच्यासह तिला घेऊन जायला तयार आहे. तू तिला बोलव तर खरं.
वसुधा आणि रेवती दोघी दारा आडून सगळं संभाषण ऐकत होत्या. वसुधा आता सावरली होती. ती समोर आली.
माझ्याशी तुम्हाला काय बोलायचं आहे ? बोला.
हरी, जरा आम्हाला दोघांना एकटं सोडतोस ?
नाही, कोणीही कुठेही जाणार नाहीत. तुम्हाला जे काही बोलायचं ते सर्वांसमोर बोला, नाही तर आल्या पावली चालते व्हा.
यशोदे
माझं नाव वसुधा आहे. त्याच नावाने माझ्याशी बोला. मला यशोदा या नावाचा तिटकारा आहे.
हं, हे मला अगोदरच कळायला हवं होतं. हरी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. अरे तू माझा सख्खा भाऊ न ? मग असा कसा केसाने गळा कापला तू ?
मी ? मी काय केलं ? अरे मी तुझ्या बायकोला नवं जीवन दिलं, तिला निराशेच्या गरतेतून बाहेर काढलं आणि तू म्हणतो आहेस की गळा केसाने कापला ? काय ? म्हणायचं काय आहे तुला ?
तिला जेंव्हा मी लग्न करून घरी आणली तेंव्हापासूनच तुझा तिच्यावर डोळा असणार. गोरी, गोमटी, शेलाट्या अंगाची मुलगी कोणाच्याही नजरेत भरेल, तर तुझी नजर फिरली त्यात वेगळं काय, मीच मूर्ख, तुझ्यावर विश्वास ठेवला.
विश्वास बस. आता एक अक्षरही नाही. तू जर सांगून गेला असतास तर
काहीच प्रॉब्लेम नव्हता. तिला सन्मानाने राहता आलं असतं. रोजच्या रोज लोकांचे टोमणे आणि नजरांचा सामना करावा लागला नसतं. पण तू पळून गेलास आणि वर पत्र पाठवलस की आपला संबंध संपला म्हणून. आता पश्चात्ताप करून उपयोग नाही. भाऊ म्हणून इतका वेळ शांत पणे बोललो पण आता माझा संयम सुटेल तेंव्हा तू माघारी जा आणि सुखात रहा आणि आम्हाला पण जगू दे.
अस कस ? माझी बायको बळकवलीस आणि वर मला जा म्हणतोस ? मी पोलिसांत जाईन आणि तुझी तक्रार करीन. दोन दोन लग्न करता येत नाहीत हा कायदा आहे हे वकील असून विसरलास वाटत. आता तुझ्याशी पोलीसच बोलतील.
तुझी मजल इथवर जाईल अस वाटलं नव्हतं. जरूर पोलिसांत जा. माझ्याकडे दोन्ही लग्नाचे पुरावे आहेत आणि ते १९५५ च्या अगोदारचे आहे म्हणून ते valid आहेत. जरूर प्रयत्न कर. कोर्टाच्या तारखांवर तारखा पडतील आणि तुला आफ्रिकेतून यावे लागेल तेंव्हा कळेल. बाकी तुझी मर्जी असो आता तू निघ नाही तर मलाच पोलिस बोलवावे लागतील.
विश्वास तर गेला. या प्रकरणावर शेवटचा पडदा पडला. पुन्हा हळू हळू आयुष्य पूर्वपदावर यायला लागलं. अशीच सात आठ वर्षं सरली. मुलं मोठी झाली. त्यांच्या कॉलेज शिक्षणाचे वेध लागले आणि अशातच एक पत्र आलं. पत्रावर कांजी, युगांडा असा पोस्टाचा शिक्का होता. तारीख होती ०२/०९ १९७६. इमर्जनसी चे दिवस होते. परदेशातून पत्र आलंय म्हंटल्यांवर जरा दचकायला झालं. धीर करून पत्र फोडलं. पत्र कुणा इसाबेला नावाच्या बाईने लिहिलेलं होतं. पत्र इंग्रजीत होतं. ते वाचून हरीहर ने सगळ्यांना आशय सांगितला. इसाबेला चा नवरा विश्वास रायरीकर शेवटच्या घटका मोजत होता आणि त्याला हरिहारला आणि यशोदेला भेटायची फार इच्छा आहे. इसाबेला च्या बायकोने त्यांची शेवटची इच्छा पुरी करा म्हणून विनवणी केली होती. तिने असंही लिहिलं होतं की त्याला तुमची मनापासून माफी मागायची आहे. त्याला त्याच्या कृत्याचा फार पश्चात्ताप होतो आहे.
हरीहर ला कळेना की आता काय करायचं ते. रेवती, वसुधा,आणि दोन्ही मुलं अवाक झाली होती. कोणीच काही बोलेना. दोन्ही मुलं आता मोठी झाली होती आणि त्यांना सर्व इतिहास माहीत झाला होता.
बाबा तुम्ही जा. कसही असलं तरी तुमचा तो सख्खा भाऊ आहे. काकांची शेवटची इच्छा पूर्ण करा. नाही तर कायम तुमचं मन तुम्हाला खात राहील. विनय बोलला.
अरे आफ्रिकेला जायचं म्हणजे खायचं काम आहे का ? माझ्या जवळ पासपोर्ट असला तरी विसा लागतो. पुन्हा आफ्रिका म्हणजे यलो फिवर ची लास टोचून घ्यावी लागणार आहे. ती कुठे मिळते हे माहीत नाहीये. ते बघाव लागेल. या सगळ्या गोष्टीला किती वेळ लागेल ते माहीत नाही. तो पर्यन्त विश्वास असला पाहिजे. पत्रात तर लिहिलं आहे की शेवटची घटका मोजतोय म्हणून.
विकास म्हणाला बाबा, काकूने तिचा फोन न. पत्रात दिला आहे. तुम्ही एक इंटरनॅशनल कॉल लावा आणि इथली परिस्थिति तिला समजावून सांगा आणि तिथे काय परिस्थिति आहे ते ही विचारा. मग आपल्याला काही निर्णय घेता येईल.
सर्वानुमते ही सूचना योग्य होती. आता इंटरनॅशनल कॉल फार महाग पडणार होता पण हरीहर म्हणाला की ठीक आहे. खर्चाचं काही एवढं विशेष नाही. उद्याच करतो.
केंव्हा तरी रात्री कॉल लागला. बोलणं धड ऐकू येत नव्हतं. पण एक कळलं की हातात केवळ एक दोन दिवसच आहेत. त्यामुळे जाण्यात काहीच अर्थ नव्हता.
दोन महिन्या नंतर एक दिवस रविवारी संध्याकाळच्या सुमारास सगळे जण बाहेर जेवायला जायच्या तयारीत असतांना दारात काळी सावळी, स्मार्ट पण चाळीशीची आफ्रिकन बाई उभी होती.
येऊ का आत ?
या. पण कोण आपण ? दारात विकास उभा होता त्यांनी विचारलं.
मी इसाबेला आफ्रिकेतून आलेय खास तुम्हाला भेटायला.
विकास मागे सरकला आणि रेवती समोर आली आणि तिला हॉल मध्ये घेऊन आली. पाणी वगैरे दिल्यावर इसाबेलाच बोलायला लागली.
विश्वास जाऊन जवळ जवळ दोन महीने झालेत. त्यांनी तुमच्या फॅमिली बद्दल इतकं काही सांगितलं आहे की तुम्हाला भेटलच पाहिजे अस वाटलं म्हणून आले.
अजूनही सर्वजण तिच्याकडे संशयानेच पहाट होते. विश्वासचीच बायको, काय संकट घेऊन आली आहे बरोबर, असाच भाव सर्वांच्या चेहऱ्यावर होता. इसाबेलाच्या लक्षात त्यांची body language आली. ती म्हणाली
तुमचा माझ्याबद्दलचा संशय मी समजू शकते. पण रीलॅक्स, चिंता करू नका. I have not come here all the way to trouble you. I just want to give you some information which I am supposed to impart and share with you. That’s all.
आमचे प्रेसिडेंट इदी अमिन ने सर्व एशियन लोकांना देश सोडून जायला सांगितलं आणि सगळी धाव पळ सुरू झाली. विश्वास चा धंदा उत्तम चालू होता. कोरोडो ची संपत्ति त्यांनी जमवली होती. पण आता ती सगळी पाण्यात जाणार होती. त्याला नेसत्या कंपड्यांनीशी युगांडा सोडावा लागणार होता. अशात त्याचा वकील म्हणजे माझा भाऊ, जोसेफ यांनी त्याला एक सल्ला दिला की कुणी युगांडाचीच मुलगी बघ आणि तिच्याशी लग्न कर म्हणजे तुला इथे राहता येईल. पण सध्या युगांडात प्रचंड अस्थिर वातावरण आहे. अशांत कुणा एशियनशी लग्न करायला कोणीच तयार नव्हतं. शेवटी माझा भाऊ म्हणाला की तूच कर यांच्याशी लग्न. विश्वासला मी बरेच वर्षं ओळखत होते.
अतिशय सज्जन माणूस म्हणून तो मला माहीत होता. मी पण तयार झाले. नंतर परिस्थिति बदलली आणि सर्व कारभार माझ्या नावे करून त्याला कार्यकारी प्रमुख म्हणून माझ्याकडेच नोकरी करावी लागली. मी अर्थातच केवळ नावांपूरतीच होते, तोच सगळं पाहायचा. पण ही गोष्ट त्याला फार लागली होती. तो नेहमी म्हणायचं की मी माझ्या भावावर अनेक निराधार आरोप केलेत, आणि यशोदेला खूप मानसिक त्रास दिला त्याचच हे फळ मला देव देतो आहे. तो अशातच खूप दारू प्यायला लागला होता. एक दिवस दारू पिऊन आमच्या प्रेसिडेंट ला शिव्या देत हॉटेल च्या पार्किंग मध्ये गाडी काढायला जात असतांना पोलिसांनी त्याला अटक केली आणि आत्ता पर्यन्त तो जेल मध्ये होता. खूप टॉर्चर झालं त्यांच्यावर. शेवटी तो मरायला टेकल्यावर त्याला सोडून दिलं. पण आता सारंच संपलं आहे. त्यांच्या प्रॉपर्टी पैकी अर्धा हिस्सा त्यांनी वासुधाच्या नावावर ठेवला आहे. सध्याच्या परिस्थितीत एकही पैसा देशाबाहेर जाऊ शकत नाही. म्हणून मी तुमचा हिस्सा वेगळा ठेवला आहे आणि राजकीय परिस्थिति निवळल्या वर तो तुम्हाला मिळेल अशी व्यवस्था करणार आहे. हेच तुम्हाला मी सांगायला आली आहे. हा माणूस चुकला असेल, तसा प्रत्येकच केंव्हा तरी चूक करतच असतो. त्यांच्या वतीने मी तुम्हा सर्वांची क्षमा मागते. तुम्ही मोठ्या मनाने क्षमा कराल अशी आशा आहे.
सर्व वातावरणच बदलून गेलं. थोडा वेळ कोणीच बोललं नाही. हरी, रेवती, आणि वासुधाच्या डोळ्यातून अश्रु धारा वहात होत्या. सगळेच भावुक झाले होते.
वासुधाच प्रथम सावरली आणि म्हणाली. त्यांच्या नावाने एक ट्रस्ट करा आणि आमच्या साठी जो पैसा ठेवला आहे त्याचा वापर तुम्ही तुमच्या देशातल्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा. अस मी म्हणते आहे ते त्यांचा एकही पैसा आम्हाला नको या अर्थाने नव्हे. आता सगळे गैरसमज दूर झाले
आहेत. पण मुलांच्या शिक्षणासाठी जर हा पैसा खर्च झाला तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. म्हणून.
इसा बेला आणि तिचा मुलगा चार सिवस राहून नवीन ऋणानुबंध जोडून गेले. एका नवीन पण सुखाच्या जीवनाला सुरवात झाली होती.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

DILIP BHIDE

Retired

Electrical Engineer. And Factory Owner Now Retired