Extra Marital Affair

A short story of Extra marital affair

जुलै महिन्यातील एक संध्याकाळ...मागील पंधरा दिवसापासून सतत पाऊस....कधी रिप-रिप तर मुसळधार..मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालेलं... 

सुजयने चौथी सिगारेट शिलगावली होती.आपल्या फोर्ड गाडीत तो बराच वेळापासून बसला होता.अक्षरशः कंटाळला होता.त्याने आज ऑफिसात हाफ-डे टाकला होता.फक्त एक ग्रीन-सिग्नल आणी तो लगेच गाडी उडवत नेहाला पिक-अप करणार होता पुढील प्लान आधीच ठरला होता.नेहाला तो मागील 3 महिन्यापासून डेट करत होता.आज सर्व जुळून येणार होतं,नेहाचा नवरा आज रात्री घरी नव्हता.स्वारी आनंदात होती.मध्येच गुणगुणत होता,शीळ घालत होता.ईशाला त्याने कळवलं होतं की रात्री क्लायंट मीटिंग आहे व यायला उशीर होईल.नेहमी प्रमाणे तिने ते मान्य केलं होतं. 

विकी...नामवंत आर्किटेक्ट.. लोकांच्या स्वप्नातील घरे कागदावर उतरवणारा जादूगार..सौन्दर्याची भुरळ पडणारा.... ईशाला पाहीले आणी वेडा झाला..इंटिरियर डिझायनर ईशाच्या संपर्कात आला,तिला पण विकी आवडला,दोघंही लवकरच डेट वर जायला लागले.पुढची पायरी गाठायची होती,ईशाची हरकत नव्हती.सुजय आज उशिरा येणार होता तसेच त्याने कळवलं होतं ,चांगली संधी होती,तिने पण विकी सोबत संध्याकाळ घालवण्याचा प्लॅन केला.विकीने नेहाला त्याला अचानक पुण्याला जावं लागेल असं सांगितलं.विकी नाही म्हणून नेहाने सुजयला "आज की शाम आपके नाम" जाहीर केलं.

विकीने आज ऑफिस थोडं लवकर सोडलं,गाडीत येऊन बसला,गाडी स्टार्ट होत नव्हती,शिव्यांची लाखोली वाहत तो मेन रोड वर आला.पावसाने विश्रांती घेतली होती.आभाळ भरून आलं होतं,काळे ढग रात्रभर बरसतील याचे स्पष्ट संकेत होते.टॅक्सी रिक्षा कुठलंच वाहन दिसत नव्हतं..थोडं पुढे नाक्यावर वाहन मिळेल या विचाराने तो झपाझप पाऊले टाकू लागला.

ईशा भराभर आवरत होती, थोड्याच अवधीत तिला निघायचं होतं.इतक्यात कॉलबेल वाजली "आता..  कोण आलं" चरफडत तिने दरवाजा उघडला आणी पाहते ते काय आई-बाबा समोर.झालं..... आई बाबांनी येऊन सुखद धक्काच दिला.सुजयचं लग्न झाल्या नंतर ते वेगळे रहायला लागले होते.तिला पुढील प्लॅन रद्द करायला हवा होता.तिने विकीला सांगितलं तर तो हिरमुसला पण बेटर लक नेक्स्ट टाइम वर विषय संपला.

नाक्यावर आल्यावर कुठलं वाहन मिळतंय का हे विकी शोधत होता तेवढ्यात ईशाचा कॉल आला.गाडीचा घोळ झाल्यामुळे तिला काय सांगावं हा विचार त्याच्या मनात आला पण ईशाने त्याचा मूड ऑफ केला.चलता हैं.... म्हणत त्याने प्लॅन चेंज केला,आता मस्त घरी जायचं...रमचे 3/4 पेग टाकावे, जगजीत सिंगच्या गज़ल्स ऐकाव्या, एखादा पदार्थ बनवून नेहाला खुश करायचे सोबतीला पाऊस.त्याने लगेच नेहाला कळवून पण टाकले.नेहाची अवस्था बिकट झाली.

विकी खूप वेळ उभा होता पण आता लिफ्टच मागावी लागेल असं स्प्ष्ट दिसत होतं,पुढे काही अंतरावर व्हाईट फोर्ड उभी होती.जवळपास कुठलंच वाहन नव्हतं,त्याने नाईलाजाने विचारायचं ठरवलं.पुढे जाऊन त्याने गाडीच्या खिडकीच्या तावदानावर टक-टक केले.आत सुजय बसला होता त्याने गाडीची खिडकी उघडली व विकीकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागला. 

"Sorry boss... extremely sorry at this moment..माझी गाडी बंद पडली आणी कुठलंच वाहन मिळत नाही आहे,लिफ्ट मिळेल का थोडं पुढे जाई पर्यंत " विकी 

सुजयने विकी कडे निरखून पहिले, तिशीचा तो रुबाबदार तरुण विश्वासार्हाक वाटला.तसाही तो कंटाळला होता, याला लिफ्ट द्यावी थोडं बोलत पुढे जावं तसाही त्याच्या जवळ अवधि होता.

"Ohh.. yess come on.. get inside.. wl drop you.. सुजय 

विकी आत आला,एफ एम वर तलत अझीझची सुंदर गज़ल चालू होती. विकीचा मूड एकदम ऑन झाला. 

"वाह... क्या बात हैं.. तुम्हाला पण गज़ल्स आवडतात..मी भयंकर क्रेझी आहे...

"हो... आज मौसम पण तसाच आहे... anyways तुम्हाला कुठे ड्रॉप करू." सुजयने विचारलं 

"मी टंडन रोड ला रहातो...तुम्ही थोडं पुढे सोडलं तरी चालेल..पुढे मिळेल एखादं वाहन मला."  विकी 

सुजयने गाडी चालू केली आता पाऊस सुरु झाला होता.

"माफ करा.... पण माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे." विकी दिलगिरी व्यक्त करत बोलला. 

"छे छे...मुळीच नाही...मला पण कंपनी हवी होती."

"तुम्ही कोणाची तरी वाट पहात होता का? Something special today evening?   विकीने हसत विचारले.

"Yess dear...but अजून green signal मिळाला नाही आहे.actually extra marital affair." सुजय डोळा मारत बोलला.

"Great... but is it fair?  विकीने स्पष्टच विचारलं.

सुजयने दीर्घश्वास घेतला.. सिगारेट पेटवून एक मोठ्ठा झुरका घेतला. 

"No never....it's not fair.....खरं तर याला काहीच excuses नाहीत... एक क्षण आपल्याला मोहात पाडतो आणी आपण फसतो..आपण संयम बाळगायला हवा व जोडीदाराशी प्रामाणिक असायला हवं...पण हे coroprate life/metro life आपली बुद्धी भ्रष्ट करतात. आपण बळी पडतो." सुजय उत्तरला. 

सुजयने नेहाला कॉल लावला, नेहाने आज चा प्लॅन रद्द हे स्पष्ट केले.. क्षणातच सुजयच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. 

"मी तुम्हाला घरी ड्रॉप करावं अशी नियतीची इच्छा असावी... today's plan cancelled...बोला कुठे सोडू?.  सुजय 

विकीला मनात आत खोलवर कुठेतरी बरं वाटलं.स्वतः बद्दल अपराधीपणाची भावना मनात घर करून गेली.एक सुखाचा क्षण लाखो पश्चातापाच्या क्षणांपुढे नकोसा वाटला.

"You are right bro...आपण आपल्या पार्टनर ला फसवायला नको....same here.... मी पण आज solid प्लॅन केला होता..but suddenly तिचे सासू सासरे आले...जो होता हैं अच्छा होता हैं..I will try to be loyal with my wife Neha." विकी बोलत होता 

नेहा.. !! नाव ऐकताच सुजय बावचळलाच... गाडीवर व स्वतःवर संयम ठेवत तो विकी कडे बघायला लागला.. त्याने आपल्या चेहऱ्यावरचे भाव विकीला जाणवू दिले नाही.

"तुम्ही टंडन रोड ला कुठे रहाता.. society?" सुजय आता उत्तर ऐकायला अधीर झाला होता. 

"Really sorry.... आपण मघापासून बोलतोय.. पण मी आपली ओळख दिलीच नाही... मी विकी... विवेक राणे... टंडन रोड वर, मेहता सोसायटी,फ्लॅट नंबर -201." विकी हसत-हसत बोलला. 

सुजयला अनपेक्षित धक्का बसला.त्याने लवकरच स्वतःवर नियंत्रण मिळवले.बाहेर अचानक पावसाने जोर 
धरला,पावसाच्या सरी गाडीच्या टपावर कोसळू लागल्या.काही वेळातच सुजयची गाडी विकीच्या सोसायटीच्या बाहेर उभी होती.विकीने जाताना आभार व्यक्त केले.घरी येण्यास आग्रह केला पण नंतर कधी येईल असं सांगून सुजयने त्याला टाळलं.

सुजयच्या डोक्यात विचारचक्र चालू होते,संध्याकाळ पासून काही आकस्मित घटना घडल्या होत्या.विकीचं लिफ्ट मागणं,नेहाचं प्लॅन कॅन्सल करणं,गाडी सुसाट वेगात चालवत तो त्याच्या फ्लॅटवर आला,एक अनामिक भीती त्याला वाटत होती,थरथरत्या हाताने त्याने कॉलबेल वाजवली.. दरवाजा बाबांनी उघडला...आई व ईशा आत किचन मध्ये होत्या,खमंग तळण्याचा वास येत होता. 


सुजयला विकीचे शब्द आठवले.. *"but suddenly तिचे सासू सासरे आले...*** 

सुजयचा खेळ संपला होता.... त्याने खिशातून मोबाईल काढला व नेहाचा नंबर पर्मनंट ब्लॉक केला.