Jan 26, 2022
नारीवादी

शोषण...

Read Later
शोषण...


शोषणाची समस्या होत आहे बिकट

कधी संपेल हे शोषणरुपी संकट?

असो तान्हे बाळ वा वृद्ध बाई

सर्वचं जण शोषणाचे शिकार होई

शोषण करण्यात कसला आहे पुरुषार्थ

नाही अशा पुरुषात्वाला काही अर्थ

नाही राहिला नात्यांवर विश्वास

जेव्हा पालनकर्ताचं बनतो राक्षस

मुली असो वा मुले होत असते शोषण

अवघड होत आहे त्यांचे करणे रक्षण

नराधमांना नाही कसली भीती

शोषितांवर अन्याय करिती

अन्याय करणारे मोकाट फिरती

पीडीतांचे जीवन उध्वस्त होती

वासनापूर्ती साठी करतात पाप

वासनेची शिकार होतात निष्पाप

काय समाधान मिळते असे करून ?

दुसऱ्याच्या जीवनाची वाट लावून

रोजचं होत आहे कोणावर तरी अन्याय

कधी मिळेल या सर्वांना न्याय?

कोठून येते यांच्यात एवढी हिंमत?

कठोर शिक्षा का नाही होत?

शिवाजी राजे देत असे नराधमांना कठोर सजा

जनतेला परत मिळावा असा राजा

शोषण करण्यापूर्वी लोक करतील विचार

वाईट कृत्याला जरब बसणार

निदर्शने करून काही होत नाही 

अनेक निर्भया बळी पडतात पण फरक पडतो का काही?

लाजेपोटी,भीतीपोटी सहन करतात अत्याचार 

वाटते शोषिताला

आधाराऐवजी उपेक्षाचं मिळणार!
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now