अनुभव स्पर्धेचा

स्पर्धेच्या निमित्ताने लेखनाला मिळालेल प्रोत्साहन आणि साहित्याची जाणीव
नमस्कार,
ईरा म्हणजे समर्पित.
लेखनाला समर्पित असणाऱ्या सह-ह्रदयींचा सहवास म्हणजेच ईरा ग्रुप होय़.
गेले दोन महीने आपल्या ग्रुपवर सक्रीय होतांना आनंद झालाच पण सोबत समज आणि आकलन वाढत गेले याचा जास्त आनंद आहे.काही तरी लिहीनं आणि जाणीवेनं लिहीनं यातलं अंतर ईरा वर आल्यानंतर कमी झालेलं जाणवलं .
लघुकथेच्या अनुषंगाने सुरू झालेला प्रवास वाद-विवाद स्पर्धेच्या अंतापर्यंत येऊन कधी पोहचला हे समजलंच नाही. या प्रवासात माहिती पेक्षा आकलन आणि ज्ञानाची समज आली.या साठी मी मनोमन धन्यवाद देतो ते , नामदेव सरांना कारण त्यांच्या कडून, पाठीवर हात ठेवून लिहीण्यासाठी मिळालेलं प्रोत्साहन, प्रियांका ताई,मुक्ता ताई यांचं निर्दोष लेखनासाठीचं मार्गदर्शन, सारंग सर,रिना ताई,सारिका ताई,म्रुणालिनी ताई,म्रुणाल ताई यांची मिळालेली वाहवा, हे माझ्यायल्या लेखनाला मिळालेले आशीर्वाद होते.पण मी हे सर्व करु शकलो आणि ईराशी तादात्म्य पावलो ते फक्त आणि फक्त किशोर सोनटक्के सरांमुळे.किशोर सर नेहमीच माझ्यातल्या सुप्त गुणांना संधी देत राहीलेत,त्यांच्या मुळे मी घडतो आहे.
बाकी ग्रुपवरील ईतर सदस्यांचं ,लेखनाबद्दलचं मार्गदर्शन मोलाचं होत,आहे.
असं म्हणतात की
"ज्ञानाची शिदोरी सरते ना कधी
पेरते व्हा आधी मनोमनी"
आणि ही ज्ञानाची शिदोरी मला सापडली ईरा ग्रुपवरती.
मुळात दोन स्पर्धां मध्ये सहभागी होतांना, लेखनाचे कौशल्य आणि माणूस समजून घेणं म्हणजे काय?याचा बोध झाला.लघुकथा लिहीतांना ,विषय, आशय,आणि संदेश याचं कौशल्य आत्मसात करता आलं.आणि वाद-विवाद स्पर्धेतुन,विषयाचं सखोल ज्ञान ,आकलन,आणि अभ्यास याची गती मिळाली, कारण एखादा प्रश्न समजून घेतानां त्याचा चोहोबाजूंनी विचार करण्याची व्रुती बळावली, समस्या, उपाय आणि उत्तरदायित्व कशा प्रकारे अभ्यासावं याचं आकलन झालं.कोणतही साहित्य समजून कसं घ्यावं याचं सकल ज्ञान ईराच्या माध्यमातून मला मिळालं आणि हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं.बाकी सर्वांसोबत लेखक म्हणून मिरवण्याचा आनंद वेगळाच आहे म्हणून व्यक्त होतांना मनातल्या भावनांना शब्दात उतरवताना वाटतं की,
"मागतो संवाद आता
टाळतो मी वाद आता
माणसाच्या अंतराला
घालतो मी साद आता
पांगलेल्या माणसांना
जोडतो अल्हाद आता "
आणि माझ्या साठी माणसं जोडण्याचा अनुभव म्हंटलात तर
"ओझरता सुवास मिळाला
पळभरचा मधुमास मिळाला
आपुलकी होतीच अशी
मायेचा सहवास मिळाला "
मंडळी ईरांनं, ईतकं दिलं,ईतकं दिलं,खर सांगतो माणूस केल मला
सर्वांचे मनपुर्वक धन्यवाद आणि आभार
विजयानंद लंबे, ईचलकरंजी
9225806099