ओळख

Blog

अस्तित्व 


एका स्त्रीला पहिली प्राथमिकता आपली मुले, नंतर नवरा, नंतर घर आणि घरा साठी, संसार, सणवार, सासर, माहेर. या अनेक जवाबदाऱ्या उत्तम पार पाडणे. या मध्ये एक पाय अडकून गेलेला असतोच दुसऱ्या पायाने लंगडी घालतच स्वतःचे अस्तित्व, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपल्या पायावर उभं रहाण्याचा प्रयत्न करून आपले पाय घट्ट रोवून आपल्या क्षेत्रात चांगली कामगिरी करून दाखविली जाते. परिस्थितीशी जुळवून, झगडून आपले अस्तित्व "ती" निर्माण करते. अशा लढाई रोज अनेक जणी लढत असतात. सगळ्या लढाई, संघर्षाला सलाम.


क्षेत्र कोणतही असो संघर्ष करावा लागतोच. आपली ओळख निर्माण करण आपले अस्तित्व निर्माण करून टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न, शिक्षण, बुध्दीमत्ता, कौशल्य, श्रम, कष्ट यांचा कस लावून , घाम गाळून, रक्त आटवून, वेळ देऊन आपले अस्तित्व निर्माण केले जाते. यात मदत तर सोडाच आडवे जाणारेच खुपच असतात. त्यांना तोंड द्यावे लागते.स्त्री म्हणले की तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन.स्त्रीयांना नोकरीच्या ठिकाणी येणाऱ्या अनंत अडचणी असतात. सगळ्यांवर मात करून लढणारी, सगळ्या अघाड्यांवर जवाबदाऱ्या पार पाडणारी अष्टभुजा दुर्गा होऊन अस्तित्व निर्माण करणारी तुला सलाम.

सर्व क्षेत्रात आज स्त्रीया आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान, राजकारण असो. लष्करी अधिकारी असो. कलेक्टर, डाॅक्टर, इंजिनिअर, वकील असो. उद्योजिका, कवयित्री, लेखिका असो. खेळाडू, अभिनेत्री, गायिका असो. शिक्षिका, समाजसेविका असो. आपले अस्तित्व ओळख निर्माण करून , टिकवून चांगली कामगिरी करत आहे. आपले माहेरं आणि सासरं दोन्ही नाव पुढे नेत आहेत. कर्तृत्व सिद्ध केले आहे. समाज, देश पुढे नेत आहेत.

घरातल्या गृहिणी सुध्दा किती मल्टी टास्क पुर्ण करत. स्वयंपाक, घर कामं, घर सांभाळणं मोठ काम करत असतात. तिच अस्तित्व असते म्हणून घराला घरपण असतं. 


सौ.भाग्यश्री चाटी सांबरे