प्रत्येकाला आयुष्यात कोणाचा तरी धाक हा असायलाच हवा.

प्रत्येकाला आयुष्यात कोणाचा तरी धाक हा असायलाच हवा याच्याने जीवण जगण्याला एक शिस्त अणि वळण ला?

प्रत्येकाला आयुष्यात कोणाचा तरी धाक हा असायलाच हवा

    धाक म्हणजेच वचक,दरारा,भीती इत्यादी असे अनेक समानार्थी शब्द आपण धाक हया शब्दासाठी वापरतो.अणि आयुष्यात प्रत्येकाला कोणाचा ना कोणाचा धाक हा असायलाच हवा.कारण जेव्हा आपल्याला एखादया व्यक्तीचा धाक असतो. तेव्हा आपण कधीच मोकाट सुटत नाही.आपण एका बंधनात जगत असतो.त्यामुळे आपल्या हातुन कधीच काही वाईट कृत्य घडत नाही,आपण वाममार्गाला जात नसतो.म्हणुन प्रत्येकाच्या आयुष्यात कोणाचा ना कोणाचा धाक हा असायलाच हवा.
      प्रत्येकाला आपापल्या जीवणात कोणाचा ना कोणाचा धाक हा असतोच.कोणाला वडिलांचा धाक असतो.कोणाला आईचा धाक असतो.कोणाला मोठया भावाचा धाक असतो.तर कोणाला काका,मामा,दाजी,इत्यादी कोणातरी वडिलधारया व्यक्तीचा धाक हा प्रत्येकाला असतोच.अणि तो असायलाही हवा. कारण तो नसला तर माणुस मोकाट सुटतो अणि कसाही वागतो,वाईट संगतीत जातो,वाईट व्यसनांच्या आहारी जातो कारण त्याला कोणाविषयी काहीच भीती राहिलेली नसते म्हणुन हे असे होते.
     जसे प्रत्येकाला आपापल्या आयुष्यात कोणाचा तरी धाक असतो.तसाच मलाही माझ्या आयुष्यात आहे तो म्हणजे माझ्या दोन नंबरच्या मोठया भावाचा.तसे पाहायला गेले तर मला दोन मोठे भाऊ आहेत.माझा सगळयात मोठा भाऊ फार गरीब,शांत,समजुतदार स्वभावाचा.त्यामुळे मला तो कधी जास्त बंधनात घालायचाही नाही.अणि अजुनही घालत नाही.माझ्यावर कोणत्याच प्रकारची रोकटोक लावायचाही नाही.अणि अजुनही लावत नाही.उलट तो माझ्याशी एका मित्रासारखाच वागायचा.अणि अजुनही वागतो.म्हणुन मला त्याची कधी भीती वाटलीच नाही.अणि अजुनही वाटत नाही.
        पण माझा दोन नंबरचा मोठा भाऊ माझे काही चुकले तर चारचौघात माझ्या मित्रांसमोरही मला दोन रटटे हाणायला मागेपुढे करायचा नाही.अणि अजुनही मी चुकलो तर मला तो काढीने बदडतोही.पण त्याच्या त्या बदडण्यात पण त्याचे प्रेमच दडलेले असते.कुठेतरी त्याला माझी काळजी आहे की आपला लहान भाऊ कोणत्याही वाईट मार्गाला जाऊ नये.चुकीच्या संगतीत जाऊ नये.तो वाईट व्यसनांच्या आहारी जाऊ नये.त्याचे सर्व चांगलेच व्हायला हवे.तसे पाहायला गेले तर मला घरात जीवही खुप तोच लावतो.त्यामुळे कधी आतापर्यत माझ्या केसालाही कोणाचा धक्का लागला नाही.कारण तो नेहमी त्याच्या मित्रांना सांगुन ठेवायचा की माझ्या लहाण्या भावाकडे लक्ष असु द्या.त्यामुळे त्याचे सर्व मित्र मला त्यांच्या लहान भावाप्रमाणेच मानायचे.अणि अजुनही मानतात.त्यामुळे मी मालेगावात कुठेही बिनकामी फिरताना दिसलो किंवा त्यांना वाटले की हा काही उंडारक्या करतो आहे.किंवा टवाळखोरपणा करतो आहे.तर ते मला लगेच हटकायचे की तु इथे काय करतो आहे?किंवा मला कोणी त्रास देऊ राहिले असे दिसले तर जो मला त्रास देताना दिसला त्याचा तिथेच सोक्षमोक्ष लावायचे.जेणेकरुन तो पुन्हा कधी माझ्या वाटेलाही जायचा नाही.अणि त्यांचा फोन लगेच माझ्या भावाला जायचा.की असे असे झाले आहे तुझा भाऊ इथे फिरताना दिसला किंवा त्याला अमुक व्यक्ती त्रास देत होता.अणि अजुनही मी कुठे बिनकामी फिरताना दिसलो टवाळक्या करताना दिसलो तर माझ्या भावाच्या मित्रांचा लगेच त्याला फोन जातो.की तुझा भाऊ इथे इथे दिसला होता. अणि हयाच्यासोबत होता.
        त्यामुळे मी आधीपासुनच माझ्या भावाच्या खुपच धाकात होतो.अणि अजुनही आहे.त्यामुळे मी कधीच कोणत्या वाईट मार्गाला,वाईट संगतीत,वाईट व्यसनाच्या आहारी गेलो नाही.मी अणि माझा अभ्यास एवढेच भले ही माझी रोजची दिनचर्या असायची.कारण माझ्या मनात कुठेतरी धाक असायचा की आपल्या भाऊचे मित्र आपल्याला पाहुन घेतील अणि ते त्याला फोन लावुन देतील.मग घरी गेल्यावर आपली काही खैर नाही.म्हणुन माझे मित्रही कधी त्यांच्यासोबत मी असताना मला कधी म्हणायचेही नाही की तु पण एक पुडी खा किंवा सिगारेट ओढ.किंवा दारू पी.कारण त्यांना माहित असायचे याला जर आपण वाईट व्यसनाला लावले अणि याच्या भावाला कळून गेले तर तो काही आपल्याला सोडणार नाही.
        तसे पाहायला गेले तर मी सर्व प्रकारच्या मुलांमध्ये राहायचो अणि अजुनही राहतो व्यसनी,निर्व्यसनी,टवाळखोर,गुंडगिरी करणारे,हुशार,अभ्यासु इत्यादी सर्व प्रकारच्या.मुलांमध्ये मी अजुनही राहतो.पण त्यांच्या संगतीत राहुन मी कधीच वाईट व्यसन केले नाही किंवा अजुनपर्यत करण्याचा प्रयत्नही केला नाही. याला कारण माझ्या मनात माझ्या भावाचा असलेला धाकच कारणीभुत आहे.मी व्यसन करण्याचा प्रयत्नही केला अणि माझ्या भावाच्या ओळखीचे कोणी व्यक्तीने पाहिले तर तो त्याला फोन लावुन देईल.म्हणुन मी व्यसन करण्याचा विचारही कधी मनात आणायचो नाही.अणि अजुनही आणत नाही.अणि मित्रांसोबत राहुन व्यसन करण्याची ईच्छा जरी मला झाली तर लगेच मला आठवायचे की मला जर व्यसन करताना कोणी बघून घेतले तर लगेच माझ्या भावाला फोन जाऊन लागेल.त्यामुळे कित्येकदा मित्रांसोबत बारमध्ये बसुन पण दारु पिण्याचा किंवा सिगारेट ओढण्याचा,पुडी खाण्याचा,तंबाखु मळण्याचा विचारही माझ्या मनात कधी आला नाही.
       एवढेच काय तर मागील मार्च महिन्यात माझ्या एका मित्राचे गोरज मुहुर्तावर अजंग वडेल येथे लग्न होते.तिथे त्याच्या लग्नात माझ्या डिप्लोमाच्या सर्व मित्रांनी दारू पिली होती.पण मी दारुला हात लावण्याचा विचारही मनात आणला नाही.याला कारण माझ्या मनात माझ्या भावाचा असलेला धाकच कारणीभुत होता. 
      अणि आज जेव्हा मी विचार करतो की जर माझ्या आयुष्यात जर मला कोणाचा आज धाकच नसता.तर मी ही इतर मुलांप्रमाणे वाईट वळणाला लागलो असतो,वाईट व्यसनांच्या आहारी गेलो असतो.इतर मुलांप्रमाणे मुलींमागे दिवसभर फिरत बसलो असतो.व आपले आयुष्य खराब करुन घेतले असते.पण माझ्या भावाच्या धाकात मी आजपर्यत आहे त्यामुळे मी कधी वाईट मार्गाला,वाईट वळणाला,वाईट व्यसनाला लागलोही नाही.कुठेतरी त्याच्या धाकामुळेच आज मी अभ्यासात हुशार आहे.कारण त्याच्या धाकामुळेच मी जास्त बाहेर मित्रांसोबत फिरतही नाही.माझे मित्रही मोजकेच आहेत.ज्यांना माझे घरचेही ओळखतात.अणि जे चांगल्या घराण्यातीलच आहेत.अणि खरे पाहायला गेले तर माझा जास्तीत जास्त वेळ हा वाचन करण्यातच जायचा अणि अजुनही जातो.अणि त्याच वाचण करण्याचा मला आज हा फायदा होतो आहे की मी आज स्वता लिहितो आहे.इतरांनी लिहिलेलेच फक्त वाचत बसत नाहीये तर स्वताही लिहितो आहे.अणि कुठेतरी माझ्या मनात माझ्या भावाविषयी असलेल्या धाकामुळेच हे सर्व घडुन आले आहे.कारण तो घरी आल्यावर लगेच आईला विचारतो योगेश कुठे आहे?कुठे गेला आहे?कोणाबरोबर गेला आहे?त्यामुळे मी अणि माझा अभ्यास यातच मी गुंग असायचो अणि अजुनही असतो.कुठेतरी आज माझ्या लेखक बनण्यामध्ये खुप मोलाचा वाटा माझ्या भावाचाच आहे.
       अणि आज मी एवढा एम ए च्या दुसरया वर्षात शिकतो आहे.मोठा झालो आहे.पण अजुनही मला कोणी बाहेर त्रास दिला किंवा मला काहीही समस्या असली,मी बाहेर काहीही उपदव्याप करुन आलो तर मी निमुटपणे त्याच्याजवळ जाऊन सांगुन देतो की माझ्याकडुन अशी अशी चुक झाली आहे.कारण त्याची मला सक्त ताकीद असायची.की तुला कोणी बाहेर त्रास देते आहे.किंवा तु बाहेर काही टवाळक्या करतो आहे,काही उपदव्याप करुन आला आहे हे जर मला बाहेरुन मुलांकडुन कळले तर मी पहिले तुझ्याच कानफडीत दोन लावेल.तु स्वता कोणाचे नाव घ्यायचे नाही.कोणाशी भांडण करायचे नाही.कोणाला स्वताहुन त्रास द्यायचा नाही.बाकी तुला कोणी स्वताहुन त्रास दिला तर मी आहे ना तुझ्या पाठिशी.मला सांगत जा.तु फक्त तुझ्या अभ्यासाकडे लक्ष देत जा.बाकी तुला काहीही समस्या असली तर मला येऊन सांगत जा.
        म्हणुन आयुष्यात प्रत्येकाला कोणाचा तरी धाक हा असायलाच हवा.आयुष्याला एक चांगले वळण लाभते.एक शिस्तप्रियता लाभते.अणि सगळयात महत्वाचे म्हणजे याच्याने आपण एखादया मोकाट सोडलेल्या जनावराप्रमाणे जीवण जगत नाही.एका विशिष्ट नियमावलीत जगतो.एका विशिष्ट बंधनात राहुन जगतो.
          म्हणुन प्रत्येकाला आयुष्यात कोणाचा ना कोणाचा धाक हा असायलाच हवा.