कातरवेळ...

Short Poem On Love


कधी कधी ....
धुंद अशा सायंकाळी
वेलीवरी बहरे
प्रेमाची कळी
या अशा कातरवेळी
सख्या तू ये जवळी...
अन् देऊन जा मजला
नव्या भावनांची आरोळी
मग फुलत जाईल त्यातुनी
तुझ्या माझ्या निखळ नात्याची
एक सुंदर चारोळी
एक सुंदर चारोळी
या अशा कातरवेळी
सख्या तू ये जवळी....

- कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे