Feb 26, 2024
नारीवादी

इस प्यार को क्या नाम दुँ

Read Later
इस प्यार को क्या नाम दुँ
            का जीव तोळा तोळा
तुझ्यासाठी झुरतो...
उगाच मागे मागे तुझ्या भिरभिरतो...
हरवूनी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का
नाव तुझे गूणगुणते...

         कानात हेडफोन घालून आदिती मस्त गाणे
ऐकत बसली होती... आपल्याच विश्वात हरवली होती. म्हणतात ना...

" सोळाव वरीस धोक्याच गं "
हे काही खोट नव्हेच.

           आदिती काॅलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या तिसर्‍या वर्षाला शिकत होती. आदिती काॅलेजमध्ये सर्वांमध्ये फेमस असणारी मुलगी. ती एकदम बिनधास्त राहायची. कुणालाही घाबरत नसायची तिला कुणी नडलाच त्याला सोडत नसे त्यामुळे सगळे तिच्यापासुन दोन फुट लांबच राहायचे. ही आदिती श्रीमंत घरातील मुलगी होती. दिसायला खुप सुंदर होती. तिचा हेअर कट केलेला सिल्की केस नेहमी मोकळेच असायचे. ती सुंदर असली तरी तिला नटायच वेडच नव्हत. जीन्स पँट आणि टाॅप घातला की ती आपल्या कारने काॅलेजला उतरते तस तिला सगळे पाहतच राहतात... आदिती जस जस पुढे जाते तसे सगळे तिलाच पाहत होते तिने उतरल्यावर ब्लॅक कलरचा चष्मा घातला, आपले हेअर सेट केले आणि बॅग अडकवून ती पुढे निघाली. आशितोष तर तिलाच पाहत होता... आज आदितीने नवीन ड्रेस घातला होता, प्रत्येका
ची नजर तिच्याकडे जात होती.आशुतोषसमोर जात तिने चुटकी वाजवली तरी तो तसाच तीला बघत होता. तिने त्याच तोंड मिटल आणि म्हटल,

" आशु काय यार माशी जाईल ना तोंडात , काय बघतोस तु मलाही दाखव त्याच्या खांद्यावर हात टाकत ती म्हटली " , तसा आशु एकदम भानावर आला... त्याची बाजु सावरत म्हटल....


" आदी, चल ना यार सगळे तुझीच वाट बघत आहे आणि तु उशीर केलास खुप "
ते दोघे कँटीनमध्ये बसलेल्या त्यांच्या ग्रुपकडे निघाले.


         आपल्याच नादात निघालेल्या आदीतीचा धक्का चुकुन एका मुलीला लागला नि तिच्या हातातली वही खाली पडली... नकळत घडल सगळ आदितीच घाबरली... " साॅरी... आय एम रियली साॅरी... मी ते पाहीलच नव्हत... "
आदिती हरवली त्या डोळ्यांत....
हिरवट रंगाची छटा असलेले मोठे मोठे डोळे सगळ्यांच्याच आकर्षणाच केंद्र होते. गोरा पान रंग , नाजुक गूलाबी ओठ आणि सोनेरी कुरळे केसांनी तिला अक्षरशः वेड करून सोडल होत. ति एकटक तिलाच पाहत होती. हे तिच्या मैत्रीणीला सोनियाला आवडल नाही.

समोरची व्यक्ती काही बोलली नाही पण तिच्या सोबतची मैत्रिणीने चुटकी वाजवली नि आदीतीच लक्ष जागेवर आणल...
" ये लक्ष कुठे होत तुझ, बघुन चालता येत नाही का... सकाळीच धडकता एवढही दिसत नाही "
पण ती मात्र गप्पच होती...

" सोनिया, जाऊ दे मला वाटत त्यांनी बघीतल नसेल चुकुन धक्का लागला... " , आरोही.

" अग पण आरू बर झाल वही पडली नाहीतर तुला काय लागल असत ना मग हिला बघीतल असत.... " , सोनिया रागाने म्हणाली.

     आरोहीलाच वाईट वाटल की सोनिया त्या मुलीला एवढ बोलली.... त्या दोघी निघून आल्या तरी आदितीची मात्र विकेट पडली होती ति अजुनही तिलाच बघत होती...

" किती छान नाव आहे आरोही... तिच्या तोंडुन एकदम बाहेर पडल आरू... "

" ये आदि, इथेच थांबणार आहेस का की नाश्ता करायला येणारही आहेस कँटीनमध्ये " , अंजलीने
अस म्हटल्यावर आदितीच्या लक्ष्यात आल सगळे आपली वाट बघताय. तिने आपल्याच केसांमधुन हात फिरवला... चेहर्‍यावर एक स्माईल आणि ती कँटीनमध्ये गेली.


         सगळे कँटीनमध्ये नाश्ता करत होते. अंजली, मनिषा, केतकी तिच्या मैत्रीणी आणि
आशुतोष, निल, विक्की तिचे मित्र आणि आदिती सात जणांचा ग्रुपच होता. सगळे गप्पा मारत होते. पण आदितीच काही लक्षच नव्हत. आज तिला पाहिल्यावर मला अस का फिल झाल एकदम जवळची असल्यासारखी... किती सुंदर दिसत होती यार... एका क्षणासाठी वाटल हृदयच बंद पडेल की काय माझ... !

" ओय जानेमन, कहाँ खो गयी हो तुम ", अंजुने तिला हलकेच मारल... "

तशी आदितीच्या चेहर्‍यावर वेगळीच स्माईल आली. सर्वांच खाऊन झाल, पण आदीतीच खाण संपलच नव्हत. सगळे उठले ती अजुनही खात बसलेली. कारण ती हरवली होती मनाने त्या आरोहीमध्ये...

" यार आज चित्त ठिकाण्यावर नाही आहे, ये खादाड कुठली उठ ना बेल होईल टाईम झाला "
आशु तिला डोक्यात हळुच मारत म्हटला.

" ये थांब तुला आता बघतेच ", आदितीही त्याच्या मागे पळायला लागली. सगळे म्हणत होते या दोघांना ना काही कारणच लागत नाही यार भांडायला... कुठेही सुरू होतात दोघेही... " , अंजु म्हणत होती. खर होत आशुतोष आणि आदीती खुप जवळचे फ्रेंन्ड्स होते. दोघांच नात म्हणजे
टाॅम ॲन्ड जेरीसारख... तुझ माझ जमेना तुझ्यावाचुन करमेना... दोघेही खुप मस्ती करायचे. एक जरी दोघात शांत असला तर दुसरा बोलायला लावायचा. अशी त्यांची मैत्री होती.


        आरोही काॅलेजमधुन घरी आली होती. जेवण करुन ती सोफ्यावर टिव्ही बघत बसली. अचानक तिला काॅलेजमध्ये घडलेला प्रसंग आठवला... " कोण होती ती... अचानक मलाच धडकली... तिच्यामुळे माझ हृदय जास्तच स्पीडने धडधडत होत... किती छान होती, निरागस. अस वाटत तिचे डोळे मला काही सांगु पाहत होते आणि
छान होता तिचा ड्रेस आणि तिची स्टाईलही एकदम हिरोईन सारखी दिसत होती... " मला आवडली होती. काय माहीती परत आमची भेट होईल की नाही. ती इथेच शिकत असेल का की दुसर्‍या काॅलेजला असेल ?  ति तिच्याच विश्वात हरवली होती.


    दारावरची बेल वाजली. तशी ती तिच्या वेगळ्या दुनियेतुन बाहेर आली. दारात शैलेशला पाहुन आरोही खुप घाबरली...

                      
                                       क्रमशः


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//