

पहिल्या पहिल्या प्रत्येक अनुभवाची जाणीव... फार नाजूक , वैयक्तिक आणि खास असते.सुखद असते.
जाणिव अस्तित्वाची, आईच्या उदरात होते.
जाणीव मी पणाची, सवंगड्यांच्या घोळक्यात होते.
जाणीव यशाची, शाळेच्या आवारात होते.
जाणीव स्त्री पणाची, पहिल्या रक्तस्त्रावात होते.
जाणीव पहिल्या प्रेमाची, नजरेच्या मिलनात होते.
जाणीव प्रणयाची, पहिल्या अलिंगनात होते.
जाणीव समर्पणाची, पहिल्या रात्रीत होते.
जाणीव मातृत्वाची, पहिल्या चिमुकल्यात होते.
जाणीव पितृत्वाची, पहिल्या बाळ स्पर्शाने होते.
जाणीव विरहाची, आईच्या क्षणिक नसण्याने होते.
जाणीव मृत्यूची ,प्रिय व्यक्तीच्या आकस्मिक जाण्याने होते.
पहिली जाणीव ही फक्त आणि फक्त तुमचीच असते...
खास असते...
?
पॅड