Jan 26, 2022
नारीवादी

एकटी........

Read Later
एकटी........



रोज प्रमाणे संध्याकाळी राधा काकू फिरायला गेल्या, ओळखीच्या काकू भेटल्या रस्त्यात, जरा वेळ गप्पा करण्यात गेला, फिरून आल्या, बघता तरी घरी हास्य विनोद करत जेवण सुरू होत, त्या नाहीत जेवायला याची साधी कोणी दखल ही घेतली नव्हती, सूनबाई मुलगा त्यांची मूल मस्त जेवत होते 

काकू आत आल्या, अरे थांबले का नाही माझ्यासाठी, कोणी लक्ष दील नाही, स्वतःच्या हाताने वाढून घेतल, तो पर्यंत सगळ्यांच्या जेवण झाले होते, ते आपल्या रूम मध्ये निघून गेले, काकूंनी एकटीने जेवण केल, 

नेहमीच होत हे, घरचे व्यवस्थित वागत नव्हते त्यांच्याशी, त्यामुळे राधा काकू सध्या खूप उदास असायच्या , त्या सध्या त्यांच्या दोन नंबर च्या मुलाकडे असायच्या रहायला, 

तीन मूल असलेल्या राधा काकूंच आधी खूप चांगल होत, घरात काका तीन मूल, सगळ भरपूर, काकूंनी मुलांना खूप शिकवल, काका मोठ्या पोस्ट वर होते, मोठा बंगला होता त्यांच्या, दाग दागिने भरपूर, कसलीच कमी नव्हती घरात, मूल मोठी झाली, लग्न झाले, त्यांनी त्यांचे वेगळे संसार उभे केले, काका काकू एकटे राहिले, तरी ठीक सुरू होत, वयामानाने अचानक एक दिवस काका वारले, 

त्यानंतर काकूंची खरी परवड सुरू झाली, कोणीच त्यांना सांभाळायला तयार होईना, सुरुवातीला त्यांच्या बंगल्यात मोठा मुलगा येऊन राहिला लागला , नंतर त्याने घराचा ताबा घेतला,  दोन भावांना सांगितले मी कायम आईला सांभाळणार नाही, तुमच्याकडे ही आईला चार चार महिने ठेवा, त्यानुसार काकू आपल समान घेवून कधी इकडे तर कधी तिकडे असतात रहायला, कोणाला त्यांच्या विषयी प्रेम नव्हत, उगीच अडगळ झाल्या होत्या त्या, सुना काम करून घ्यायच्या त्यांच्या कडून, बर एक चांगल होत की त्यांनी दागिने आणि कॅश बद्द्ल मुलांना माहिती दिली नव्हती, काकू सगळ सांभाळून होत्या 

आज राधा काकू लवकर उठल्या, सगळं आवरलं, देवपूजा केली, देवांना हात जोडले, आता आपली भेट होईल आठ महिन्यांनी तोपर्यंत मुलाला सांभाळ बाबा 

रूम मधून त्या बाहेर आल्या, सुनबाई ने चहा केला होता त्यांनी तो घेतला, 

सुनबाई आज खुशीत होती, कारण आज राधा काकूंची रवानगी मोठ्या मुलाकडे होणार होती 

राधा काकू ला तीन मुलं म्हणून चार चार महिने प्रत्येकाकडे राहायचं असं  मुलांनीच ठरवलं होतं 

काका वारले तेव्हा घर भाड्याने द्यायचा विचार होता काकूंनी, मोठा मुलगा राहायला आला, काकूंना वाटले आधार होईल आपल्याला, आई मी तुला दर महिन्यात घरभाडे देत जाईल, अजूनही एक रुपया ही त्याने दिला नव्हता, ते घर राधा काकूंच्या नावावर होत, ही एक जमेची बाजू होती, बाकीचे दोन वेगळे राहत होते 

"अहो रिक्षा बोलून घ्या, आईंना सकाळी सोडून या तिकडे" ,...... सूनबाई 

" आता कशाला दुपारून जाऊ आम्ही जेवून निवांत",..... मुलगा बोलला 

"त्याची गरज नाही, लवकर आईंना तिकडे सोडून या, आपल्याला दुपारून बाहेर जायचं आहे",....... सूनबाई 

मुलगा राधा काकूंना घेऊन घराबाहेर पडला, तसा सुनबाईंनी मोकळा श्वास घेतला, रिक्षा मोठ्या मुलाच्या घरी थांबली, काकू बॅग घेऊन खाली उतरल्या, तसा नातू धावत आला, आजीची बॅग घेऊन आत गेला, 

मोठ्या सून बाईच्या कपाळावर आठ्या होत्या,......" एक दिवस ही जास्त राहू देत नाहीत, बरोबर चार महिने झाले की आल्या या इकडे"...... , बडबड करत तिने चहा केला, दोन नंबर चा मुलगा चहा घेऊन लगेच वापस गेला, तेवढ्यात हि त्याच्या बायकोचा दोन वेळा फोन येऊन गेला 

मुलगा गेला तसा राधा काकू त्यांच्या खोलीत जायला लागल्या, मोठ्या सुनेने टोकले,......." आई तुम्ही त्या खोलीत जाऊ नका, ती मुलांची खोली आहे आता, तुम्ही दिवसभर किचनमध्ये बसा आणि रात्री हाॅल मध्ये झोपा", 

"मी झोपेन अग मुलांच्या खोलीत काही अडचण नाही मला",...... राधा काकू 

"मुलांना अडचण आहे पण, मुल मोठी झाली, मुलांना अभ्यास होत नाही, तुम्ही बडबड करतात, तुम्ही हॉल मध्ये झोपा, तुमचं सामान किचन मधल्या मांडणीत ठेवा ",...... सूनबाई 

" पण माझी खोली आहे ना ती, तू अशी कशी मुलांना दिली",..... राधा काकूंनी बोलून बघितल 

"सगळ काय तुम्हाला विचारून करणार का आता, पटत असेल तर रहा ईथे, नाही तर रस्ता मोकळा आहे तुम्हाला, नाही तर कोणाची इच्छा आहे तुमच्या सोबत रहायची, आणि या पुढे माझ्याशी मोठ्या आवाजात बोलायच नाही सांगून ठेवते ",....... सूनबाई 

तणतणत सून आत गेली, राधा काकू रडायला लागल्या 

स्वतःच्याच घरात आज परत एकदा राधा काकू पोरक्या झाल्या होत्या, एकदम मन भरून आल होत त्यांचा, पण काय करणार? कोणाजवळ मन मोकळं करायला जागा नव्हती, कसं तरी आपलं सामान त्यांनी किचनमध्ये ठेवल, आणि त्या हॉलमध्ये येऊन बसल्या, समोरच काकांचा फोटो होता, फोटो कडे बघून त्यांना अजूनच रडायला यायला लागलं, 

किती सुखाचे दिवस होते काकांसोबत, एकाही मुलाची बिशाद नव्हती आपल्या पुढे बोलायची, काय झालं आहे हे, काही मार्ग सापडत नाही यातून, नको असलेली मी सारखी याघरून त्या घरी फिरत असते सामान घेऊन, मुल ही ऐकत नाहीत माझ, काही करता येईल का? मन खूप उदास झाल होत त्यांचं 

दुपारची जेवणं झाल, काकू जरा वेळ तिथेच हॉलमध्ये आडव्या झाल्या, तेवढ्यात बाजूच्या काकूंची मैत्रीण आली भेटायला, बऱ्याच वेळा दोघी गप्पा मारत होत्या त्यांनी काकूंना संध्याकाळी चहा च आमंत्रण दिलं 

चारच्या सुमारास काकू शेजारी गेल्या,... तिकडे गेल्यावर त्या रडायला लागल्या 

"काय झालं आहे राधा काकू, कशाला वाईट वाटून घेतात",..... बाजूच्या काकू 

"आपल्याच घरात पोरकी झाली आहे ग मी, काही उपाय आहे का",..... राधा काकू 

त्यांचा मुलगा बाजूलाच बसला होता,...... "हो आहे काकू उपाय, सरळ या मुलाला बाहेर काढा घरातून, बाकीच्या खोल्या भाड्याने द्या आणि तुम्ही रहा एका खोलीत, बाकीच्या खोल्यांच तुम्हाला भरपूर भाडं मिळेल आणि इकडे तिकडे जायची गरज नाही, आधाराचं म्हणाल तर आम्ही आहोतच, आम्ही तुम्हाला अंतर देणार नाही", 

"हो तुमची फरफट आता अशी बघवत नाही आता",....... बाजूच्या काकू , 

" पण हे अस करण मला जमेल का? मूल ऐकतील का?, आज सूनबाई किती बोलली मला, घाबरायला होत भांडण म्हंटल की आता हल्ली",........ काकू विचार करत होता 

" का नाही जमणार काकू, नाही तरी आता तुम्हाला कसल सुख आहे ",........ 

" दुखलं-खुपलं आजारी असलं तर कोण बघेल मला, कारण मुलांशी वाईटपणा घेतला तर ते नंतर येणार नाहीत",....... राधा काकू 

" असेही नाही तरी कोणी तुमच्याकडे लक्ष देत नाही, तुम्ही तुमचं ठरवा काय करायचं आहे ते, अस किती दिवस त्रास सहन करणार ",....... काकू 


 काकू विचार करत होत्या...... 

जरा वेळाने त्या फिरायला निघाल्या, जवळ बगीचा होता पूर्वी रोज येत असत इकडे काका काकू, त्यांचा नेहमीचा ग्रुप आज ही हजर होता, त्यांना बघून काकूंना खूप भरून आलं किती बोलू किती नको अस झाल होत 

त्यांनी त्यांच्या प्रिय मैत्रिणी आशा काकूंना सगळ सांगितलं, ग्रुप मधील कर्वे काकांचा मुलगा वकील होता, त्यांनी उद्या मुलाला विचारून सांगतो सकाळी अस सांगितल 

काकू समाधानाने घरी गेल्या 

घरी जेवणाची तयारी सुरू होती नेहमी प्रमाणे किचन मधे मदतीला न जाता काकू हॉल मध्ये बसुन होत्या, त्यांच्या वाटेच्या पोळ्या करायचा काम सुनेने बाकी ठेवल होत, काकूंनी साफ दुर्लक्ष केले तिकडे, काकू आल्या म्हणजे पोळ्या आणि भांडी त्यांना घासावी लागायची, आता हल्ली काम होत नसे काकूंकडून, 

सुनेने बघितला काकू पोळ्या करत नाहीत, तिचा तोंडाचा पट्टा सुरू झाला, आल्या फुकट च गिळायला, इथे राहायच असेल तर थोडे फार काम करावे लागतील, 


जेवण झाल तिथेच हॉल मध्ये काकू काकांच्या फोटो समोर आडव्या झाल्या आज त्यांनी भांडे घासायला मदत केली नव्हती, काही करू शी वाटत नव्हत त्यांना, हे घर जरी त्यांचे होत तरी माणस परकी वाटत होती, 

दुसर्‍या दिवशी बागेत कर्वे काका भेटले,...... "इथे जवळ माझ घर आहे, माझा मुलगा घरी आहे, तुम्ही चला घरी बोलून घ्या त्याच्याशी" , 

काकू घरी गेल्या कर्वे काकांच्या मुलाने सगळा प्रोब्लेम ऐकुन घेतला, 

" तुमची तयारी आहे ना काकू एकट रहायची, कारण या नंतर मूल तुम्हाला भेटणार नाही",......... वकील 

"हो आहे मी तयार",..... राधा काकू 

" प्रोपर्टीचे पेपर कुठे आहेत", ...... वकील 

" आहेत माझ्या कडे", ....... राधा काकू 

"ते संध्याकाळी घेवून या, तुमचा स्त्री धन कुठे आहे", .... वकील 

" माझ्या लॉकर मध्ये आहे", .......... वकील 

" कोणाला माहिती नाही ना त्याबद्दल", .... वकील 

नाही... 

"पैसे कॅश वगैरे आहे का", ... वकील 

"हो आहेत, कोणाला सांगितल नाही मी त्या बद्दल", .... राधा काकू 

" बर झाल माहिती दिली नाही ते", ..... वकील 

तुम्ही सामान घेवून इकडे या रहायला थोडे दिवस, 

घरी जावून काकूंनी घराचे पेपर बँकेच पास बूक सगळ चुपचाप घेतल, त्यांची बॅग भरली, मैत्रिणी कडे जाते आहे सांगून त्या निघाल्या, 

मी करते तर आहे हिम्मत, काय होईल माहिती नाही, एकट राहव लागेल, नाही तरी मूल ज्या प्रकारे मला वागणूक देत होते, त्या पेक्षा एकट राहिलेले बर, जे होईल ते बघुन घेवू आता 

कर्वे वकिलांनी एक पेपर तयार करून दिला, तो पेपर काकूंच्या मुलाला पाठवून दिला, घर 8 दिवसात खाली करायची नोटिस आहे ही, जर नाही खाली केल तर दुप्पट भाडे सुरू होईल 

"मुलगा नोटिस वाचून घाबरून गेला आई कुठे आहे ",....... 

"त्या मैत्रिणी कडे गेल्या सकाळी", ..... सूनबाई 

"आपल्याला घर खाली करायला सांगितला प्लस 4 वर्षा च भाडे म्हणून ती रक्कम आई च्या अकाऊंटला जमा करायची आहे, नाही तर फौजदारी गुन्हा दाखल होईल",.... मुलगा.......... 

" किती होतील पैसे? अस कस वागू शकते आई, तू काही बोलली का तीला? ", ..... मुलगा चिडला होता 

" नाही हो, मी कश्याला बोलू काही, त्या आधीच काही ठरवून आल्या असतिल, तुम्ही जावून त्यांना घेवून या घरी ",....... सूनबाई 

कुठे गेली आई? कोणती मैत्रीण? पत्ता काय? 

नाही माहिती.... 

जरावेळाने एक मुलगा नोटिस घेवून दारावर लावून गेला

गेट वर ही रूम भाड्याने देण पाटी लावली

आता मोठा मुलगा खूप घाबरून गेला, त्याने दोघी भावांना फोन लावले, सगळ्यांना सुचत नव्हत काय कराव ते

"मी तुम्हाला बोलत होते, आई अश्या आहेत, तुम्ही आमच ऐकत नाही",....... सूनबाई , 

"हो ना, लोकांच्या घरचे किती करतात मुलांसाठी, आपल्या आई आपल्यावर फौजदारी गुन्हे दाखल करतात",.... दुसर्‍या सूनबाई 

"कुठे तोंड दाखवायला जागा नाही",...... तिसर्‍या सूनबाई 

गप्प बसा,......... तुमच्या मुळे ही वेळ आली आहे, जरा घरी नीट वागता येत नाही का तुम्हाला, आधी त्रास द्यायचा मग त्यांनी प्रतिकार केला की अजून उलट बोलायच, होवुन जाऊ दे आई च्या मनाच मी घर खाली करतो fd आहेत एक दोन, आईच घरभाडे देवून देईन 

हो हि आपल्या कर्माची फळं आहेत दादा, आईला खूप त्रास झाला असेल अस वागताना 

4-5 दिवसात मुलाने घर खाली केल, घरभाडे आई च्या अकाऊंट वर जमा केल, चावी शेजारी ठेवून ते निघून गेले 

राधा काकू आता एका खोलीत राहतात, बाकीच्या तीन खोल्या कॉलेजला जाणार्‍या मुलींना भाड्याने दिल्या आहेत, खूप चांगल्या आहेत मुली काकूंना जीव लावतात, काकू खूप खुश आहेत सध्या, मस्त दिनक्रम आहे त्यांचा, काही लागल तर त्यांच् मित्रमंडळ आहेच साथीला,

काकूंचा निर्णय बरोबर होता, आनंदी राहणे हा प्रत्येकाचा हक्क आहे, थोडसं धाडस गरजेच आहे, काकू मजेत आहेत सध्या..... त्यामुळे की काय काकांचा फोटो ही हसरा वाटतोय सध्या ......... 


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now