एकटी ... भाग 3 अंतिम

राधा काकू आता एका खोलीत राहतात, बाकीच्या तीन खोल्या कॉलेजला जाणार्‍या मुलींना भाड्याने दिल्या आहेत,


एकटी ... भाग 3 अंतिम

©️®️शिल्पा सुतार
........

घरी जेवणाची तयारी सुरू होती नेहमी प्रमाणे किचन मधे मदतीला न जाता काकू हॉल मध्ये बसुन होत्या, त्यांच्या वाटेच्या पोळ्या करायचा काम सुनेने बाकी ठेवल होत, काकूंनी साफ दुर्लक्ष केले तिकडे, काकू आल्या म्हणजे पोळ्या आणि भांडी त्यांना घासावी लागायची, आता हल्ली काम होत नसे काकूंकडून,

सुनेने बघितला काकू पोळ्या करत नाहीत, तिचा तोंडाचा पट्टा सुरू झाला, आल्या फुकट च गिळायला, इथे राहायच असेल तर थोडे फार काम करावे लागतील,

जेवण झाल तिथेच हॉल मध्ये काकू काकांच्या फोटो समोर आडव्या झाल्या आज त्यांनी भांडे घासायला मदत केली नव्हती, काही करू शी वाटत नव्हत त्यांना, हे घर जरी त्यांचे होत तरी माणस परकी वाटत होती,

दुसर्‍या दिवशी बागेत कर्वे काका भेटले,...... "इथे जवळ माझ घर आहे, माझा मुलगा घरी आहे, तुम्ही चला घरी बोलून घ्या त्याच्याशी" ,

काकू घरी गेल्या कर्वे काकांच्या मुलाने सगळा प्रोब्लेम ऐकुन घेतला,

" तुमची तयारी आहे ना काकू एकट रहायची, कारण या नंतर मूल तुम्हाला भेटणार नाही",......... वकील

"हो आहे मी तयार",..... राधा काकू

" प्रोपर्टीचे पेपर कुठे आहेत", ...... वकील

" आहेत माझ्या कडे", ....... राधा काकू

"ते संध्याकाळी घेवून या, तुमचा स्त्री धन कुठे आहे", .... वकील

" माझ्या लॉकर मध्ये आहे", .......... वकील

" कोणाला माहिती नाही ना त्याबद्दल", .... वकील

नाही...

"पैसे कॅश वगैरे आहे का", ... वकील

"हो आहेत, कोणाला सांगितल नाही मी त्या बद्दल", .... राधा काकू

" बर झाल माहिती दिली नाही ते", ..... वकील

तुम्ही सामान घेवून इकडे या रहायला थोडे दिवस,

घरी जावून काकूंनी घराचे पेपर बँकेच पास बूक सगळ चुपचाप घेतल, त्यांची बॅग भरली, मैत्रिणी कडे जाते आहे सांगून त्या निघाल्या,

मी करते तर आहे हिम्मत, काय होईल माहिती नाही, एकट राहव लागेल, नाही तरी मूल ज्या प्रकारे मला वागणूक देत होते, त्या पेक्षा एकट राहिलेले बर, जे होईल ते बघुन घेवू आता

कर्वे वकिलांनी एक पेपर तयार करून दिला, तो पेपर काकूंच्या मुलाला पाठवून दिला, घर 8 दिवसात खाली करायची नोटिस आहे ही, जर नाही खाली केल तर दुप्पट भाडे सुरू होईल

"मुलगा नोटिस वाचून घाबरून गेला आई कुठे आहे ",.......

"त्या मैत्रिणी कडे गेल्या सकाळी", ..... सूनबाई

"आपल्याला घर खाली करायला सांगितला प्लस 4 वर्षाच भाडे म्हणून ती रक्कम आईच्या अकाऊंटला जमा करायची आहे, नाही तर फौजदारी गुन्हा दाखल होईल",. मुलगा

" किती होतील पैसे? अस कस वागू शकते आई, तू काही बोलली का तीला? ", ..... मुलगा चिडला होता

" नाही हो, मी कश्याला बोलू काही, त्या आधीच काही ठरवून आल्या असतिल, तुम्ही जावून त्यांना घेवून या घरी ",....... सूनबाई

कुठे गेली आई? कोणती मैत्रीण? पत्ता काय?

नाही माहिती....

जरावेळाने एक मुलगा नोटिस घेवून दारावर लावून गेला

गेट वर ही रूम भाड्याने देण पाटी लावली

आता मोठा मुलगा खूप घाबरून गेला, त्याने दोघी भावांना फोन लावले, सगळ्यांना सुचत नव्हत काय कराव ते

"मी तुम्हाला बोलत होते, आई अश्या आहेत, तुम्ही आमच ऐकत नाही",....... सूनबाई ,

"हो ना, लोकांच्या घरचे किती करतात मुलांसाठी, आपल्या आई आपल्यावर फौजदारी गुन्हे दाखल करतात",.... दुसर्‍या सूनबाई

"कुठे तोंड दाखवायला जागा नाही",...... तिसर्‍या सूनबाई

गप्प बसा,......... तुमच्या मुळे ही वेळ आली आहे, जरा घरी नीट वागता येत नाही का तुम्हाला, आधी त्रास द्यायचा मग त्यांनी प्रतिकार केला की अजून उलट बोलायच, होवुन जाऊ दे आई च्या मनाच मी घर खाली करतो फिक्स डिपाॅझीट आहेत एक दोन, आईच घरभाडे देवून देईन

"हो हि आपल्या कर्माची फळं आहेत दादा, आईला खूप त्रास झाला असेल अस वागताना",..

4-5 दिवसात मुलाने घर खाली केल, घरभाडे आई च्या अकाऊंट वर जमा केल, चावी शेजारी ठेवून ते निघून गेले

राधा काकू आता एका खोलीत राहतात, बाकीच्या तीन खोल्या कॉलेजला जाणार्‍या मुलींना भाड्याने दिल्या आहेत, खूप चांगल्या आहेत मुली काकूंना जीव लावतात, काकू खूप खुश आहेत सध्या, मस्त दिनक्रम आहे त्यांचा, काही लागल तर त्यांच् मित्रमंडळ आहेच साथीला,

काकूंचा निर्णय बरोबर होता, आनंदी राहणे हा प्रत्येकाचा हक्क आहे, थोडसं धाडस गरजेच आहे, काकू मजेत आहेत सध्या..... त्यामुळे की काय काकांचा फोटो ही हसरा वाटतोय सध्या .........

शेवटी हरवले ते पुन्हा गवसले, काकूंनी मिळवले .....


🎭 Series Post

View all