एकटी ... भाग 2

दुखलं-खुपलं आजारी असलं तर कोण बघेल मला, कारण मुलांशी वाईटपणा घेतला तर ते नंतर येणार नाहीत


एकटी ... भाग 2

©️®️शिल्पा सुतार
........

मुलगा राधा काकूंना घेऊन घराबाहेर पडला, तसा सुनबाईंनी मोकळा श्वास घेतला, रिक्षा मोठ्या मुलाच्या घरी थांबली, काकू बॅग घेऊन खाली उतरल्या, तसा नातू धावत आला, आजीची बॅग घेऊन आत गेला,

मोठ्या सून बाईच्या कपाळावर आठ्या होत्या,......" एक दिवस ही जास्त राहू देत नाहीत, बरोबर चार महिने झाले की आल्या या इकडे"...... , बडबड करत तिने चहा केला, दोन नंबर चा मुलगा चहा घेऊन लगेच वापस गेला, तेवढ्यात हि त्याच्या बायकोचा दोन वेळा फोन येऊन गेला

मुलगा गेला तसा राधा काकू त्यांच्या खोलीत जायला लागल्या, मोठ्या सुनेने टोकले,......." आई तुम्ही त्या खोलीत जाऊ नका, ती मुलांची खोली आहे आता, तुम्ही दिवसभर किचनमध्ये बसा आणि रात्री हाॅल मध्ये झोपा",

"मी झोपेन अग मुलांच्या खोलीत काही अडचण नाही मला",...... राधा काकू

"मुलांना अडचण आहे पण, मुल मोठी झाली, मुलांना अभ्यास होत नाही, तुम्ही बडबड करतात, तुम्ही हॉल मध्ये झोपा, तुमचं सामान किचन मधल्या मांडणीत ठेवा ",...... सूनबाई

" पण माझी खोली आहे ना ती, तू अशी कशी मुलांना दिली",..... राधा काकूंनी बोलून बघितल

"सगळ काय तुम्हाला विचारून करणार का आता, पटत असेल तर रहा ईथे, नाही तर रस्ता मोकळा आहे तुम्हाला, नाही तर कोणाची इच्छा आहे तुमच्या सोबत रहायची, आणि या पुढे माझ्याशी मोठ्या आवाजात बोलायच नाही सांगून ठेवते ",....... सूनबाई

तणतणत सून आत गेली, राधा काकू रडायला लागल्या

स्वतःच्याच घरात आज परत एकदा राधा काकू पोरक्या झाल्या होत्या, एकदम मन भरून आल होत त्यांचा, पण काय करणार? कोणाजवळ मन मोकळं करायला जागा नव्हती, कसं तरी आपलं सामान त्यांनी किचनमध्ये ठेवल, आणि त्या हॉलमध्ये येऊन बसल्या, समोरच काकांचा फोटो होता, फोटो कडे बघून त्यांना अजूनच रडायला यायला लागलं,

किती सुखाचे दिवस होते काकांसोबत, एकाही मुलाची बिशाद नव्हती आपल्या पुढे बोलायची, काय झालं आहे हे, काही मार्ग सापडत नाही यातून, नको असलेली मी सारखी याघरून त्या घरी फिरत असते सामान घेऊन, मुल ही ऐकत नाहीत माझ, काही करता येईल का? मन खूप उदास झाल होत त्यांचं

दुपारची जेवणं झाल, काकू जरा वेळ तिथेच हॉलमध्ये आडव्या झाल्या, तेवढ्यात बाजूच्या काकूंची मैत्रीण आली भेटायला, बऱ्याच वेळा दोघी गप्पा मारत होत्या त्यांनी काकूंना संध्याकाळी चहा च आमंत्रण दिलं

चारच्या सुमारास काकू शेजारी गेल्या,... तिकडे गेल्यावर त्या रडायला लागल्या

"काय झालं आहे राधा काकू, कशाला वाईट वाटून घेतात",..... बाजूच्या काकू

"आपल्याच घरात पोरकी झाली आहे ग मी, काही उपाय आहे का",..... राधा काकू

त्यांचा मुलगा बाजूलाच बसला होता,...... "हो आहे काकू उपाय, सरळ या मुलाला बाहेर काढा घरातून, बाकीच्या खोल्या भाड्याने द्या आणि तुम्ही रहा एका खोलीत, बाकीच्या खोल्यांच तुम्हाला भरपूर भाडं मिळेल आणि इकडे तिकडे जायची गरज नाही, आधाराचं म्हणाल तर आम्ही आहोतच, आम्ही तुम्हाला अंतर देणार नाही",

"हो तुमची फरफट आता अशी बघवत नाही आता",....... बाजूच्या काकू ,

" पण हे अस करण मला जमेल का? मूल ऐकतील का?, आज सूनबाई किती बोलली मला, घाबरायला होत भांडण म्हंटल की आता हल्ली",........ काकू विचार करत होता

" का नाही जमणार काकू, नाही तरी आता तुम्हाला कसल सुख आहे ",........

" दुखलं-खुपलं आजारी असलं तर कोण बघेल मला, कारण मुलांशी वाईटपणा घेतला तर ते नंतर येणार नाहीत",....... राधा काकू

" असेही नाही तरी कोणी तुमच्याकडे लक्ष देत नाही, तुम्ही तुमचं ठरवा काय करायचं आहे ते, अस किती दिवस त्रास सहन करणार ",....... काकू


काकू विचार करत होत्या......

जरा वेळाने त्या फिरायला निघाल्या, जवळ बगीचा होता पूर्वी रोज येत असत इकडे काका काकू, त्यांचा नेहमीचा ग्रुप आज ही हजर होता, त्यांना बघून काकूंना खूप भरून आलं किती बोलू किती नको अस झाल होत

त्यांनी त्यांच्या प्रिय मैत्रिणी आशा काकूंना सगळ सांगितलं, ग्रुप मधील कर्वे काकांचा मुलगा वकील होता, त्यांनी उद्या मुलाला विचारून सांगतो सकाळी अस सांगितल

काकू समाधानाने घरी गेल्या

🎭 Series Post

View all