एकटा मुलगा हवाय 2

लग्नासाठी एकटा मुलगा हवाय
"चूक झाली जी तुम्हाला स्थळ आणली, यापुढे नाही आणणार...आणि काय अडचण आहे हो तुम्हाला एकत्र कुटुंबाची? आपली संस्कृती हे शिकवते का आपल्याला?? उलट एकत्र कुटुंबात सर्वजण गुण्यागोविंदाने नांदतात, एकमेकांना मदत होते, सुनेला प्रेम मिळतं... आणि तुमचं आपलं भलतंच.."

"संस्कृती? संस्कृतीचं एवढंच म्हणत असाल तर पूर्वी मुलाचं लग्न झालं की आई वडील यात्रेला निघून जात, संसाराच्या व्यापातून मुक्त होत..आई वडील जपताय का ही संस्कृती? उलट मुलांची लग्न झाली की त्यांच्या संसारात अजूनच रस निर्माण होतो त्यांना..."

"तुमच्या अश्या विचारांमुळे आजकाल समाज अधोगतीकडे चाललाय.."

"समाजाचं माहिती नाही, पण माझ्या मोठ्या मुलीच्या वाटेवर माझ्या लहान मुलीला जाऊ देणार नाही." असं म्हणत त्यांनी भिंतीवर हार लटकवलेल्या फोटोकडे बोट दाखवला.

मध्यस्थी उठून उभा राहिला...घाबरला..

"ही माझी मोठी लेक..आता या जगात नाही.."

वडील डोळे पुसत म्हणाले,

"माफ करा, पण हे कसं झालं??"

"एकत्र कुटुंबाचं स्थळ आलेलं, घरात सासू सासरे नणंद दिर आणि हिचा नवरा, सर्वजण एकत्र राहत..आम्हाला मुलगा आवडला होता. मुलीला मात्र खंत होती की एवढ्या सगळ्यात आपलं कसं होणार? तेव्हा आम्ही तिला याच संस्कृतीच्या, एकत्र कुटुंबाने गुण्यागोविंदाने राहण्याच्या गोष्टी शिकवल्या...एकत्र कुटुंबाचं सुंदर स्वप्न तिच्यासमोर साकारलं. तीही त्यात हरवून गेल. प्रेम करणारा नवरा, जीव लावणारी सासू, मैत्रिणीसारखी नणंद...तिला ते चित्र आवडू लागलं आणि ती लग्नाला तयार झाली..माझी मुलगी मोठ्या हुद्द्यावर होती हो नोकरीला..तिला सांगितलं की एकत्र कुटुंब आहे, कामात विभागणी असल्याने तुझ्यावर फारसं काही पडणार नाही..."

"लग्न झालं..सासरी गेली तसं घरच्यांनी तिला सगळ्या कामात पुढे केलं. सासूने सोफा पकडला, नणंद दिवसभर कॉलेजमध्ये, नवरा अन दिर ऑफिसमध्ये... सगळी कामं हिच्यावर. पण तिने कधी तक्रार केली नाही, आनंदाने सगळं केलं. सकाळी लवकर उठून झाडझुड, फारशी, भांडी, कपडे, स्वयंपाक, साफसफाई.. घर मोठं असल्याने 6 ला उठलेल्या तिचं काम दुपारी 2 ला संपे. संध्याकाळी 5 पासून कामाला सुरुवात करावी लागे.

एवढी मेहनत केल्यावर सर्वजण आनंदी होणार असतील तर कष्टाला काही वाटत नव्हतं तिला, पण झालं उलटंच.. कौतुक तर सोडाच, तिच्या प्रत्येक कामात कुरापत निघे..पोळ्या अमुकच बनतात, भाजी पांचट लागते, फरशीवर अमुक एक डाग राहिला, तिकडे तमुक एक पसारा झाला..

तिची सुट्टी संपत आली आणि तिने नोकरीवर जायचं ठरवलं. तिने जसं घरी सांगितलं तसं घरच्यांनी आकांडतांडव केला..

🎭 Series Post

View all