आम्हाला दोघांना एकांत हवाय

Ekant Hvay


विषय- आणि ती हसली...
लघुकथा..

"तू अजून बॉस ची परवानगी नाही घेऊ शकलास, अरे तुझे आता हे नेहमीचे झाले आहे.. तिकिटे काढायची आणि मग जाणे रद्द करायचे." शीतल रागात बोलत होती.

बॅग भरलेली पुन्हा काढली आणि रागातच सगळे कपडे फेकून दिले. आणि मनात एकटीच पुटपुटत होती स्वतःशी ,आता बस तसाच बॉसचा लाडका. आता तू किती ही म्हणाला तरी मी इथेच ठाण मांडून बसणार. तू आला आणि म्हणालास तरी मी गावाला जाणार नाही.

येऊदे त्याला आज तर मी आहे आणि तो असेल, म्हणेन बस बाहेर, मी आतून कडीच लावून घेणार आहे. शिक्षा देणार तर अशी की पुन्हा त्याने असे दहा वेळेस प्लॅन रद्द करण्याआधी हजारदा विचार करावा. तरीच आई म्हणत होती ,हे पोलीस वाले वाद्यांचे अजिबात पक्के नसतात ,तू लग्न करतेस खरे पण तू पस्तावशील ,तुला मग आईचे म्हणणे पटेल. घे आता मला ह्या बोलण्याची परिचित वारंवार येतच तर आहे. या माणसाने हाच प्लॅन पाच वेळा गुंढळला आहे. आणि मी वेड्यासारखी चार दिवसांपासून कपडे वारंवार भरते आणि वारंवार आहे ,होते त्या जागेवर पुन्हा नेऊन ठेवते.
इतकेच नाही आमच्या ह्या प्लॅन बद्दल 5 वेळा रजा घेऊन परत ती रद्द ही केली आहे..तर ह्यावर थांबले नाही ,तोंड बंद ठेवायचे तर मी हा प्लॅन सगळ्या ऑफिस भर सांगून बसले आहे, आणि दरवेळी जेव्हा ही हे प्रकरण रद्द होते आणि रजा रद्द करते तेव्हा तेव्हा आमच्या मोठ्या मॅडम माझ्या ह्या फुटक्या नशिबाची आणि फुटक्या प्लॅन ची हसून हसून गम्मत उडवतात...मला तर नको नको झाले आहे ह्याचा सोबत आयुष्य..जावे वाटते निघून दूर कुठे ही वाट सापडेल तिथे. जसे लग्न झाले आहे तसे ह्याने कसलीच सुट्टी घेतली नाही. फक्त आश्वासने आणि वचने मी ते ही खोटे. माहेरी गेलेले आता वर्षच झाले आहे जवळजवळ. आई बाबा तर किती वाट बघत होते त्या दिवशी आणि ह्यांनी गाडी काढली अर्ध्या वाटेत आलो,आणि लगेच पोलीस स्टेशन मधून फोन वर फोन येऊ लागले. त्यांना किती तरी टेन्शन. एकीकडे माज्या पडलेल्या चेहऱ्याचे टेन्शन घेत होते तर एकीकडे शहरात दंगल झाली असून मी मात्र गावाकडे पळ काढत असतांना वरिष्ठ त्यांना बिनकामा म्हणून सगळीकडे त्यांच्या नावाने ओरड करत होते मग शेवटी मलाच माघार घेऊन म्हणावे लागले,चला आता निघा माघारी, गाडी वळवावी..माहेरी पुन्हा कधी तरी जाऊ. आधी काम महत्वाचे. तुमच्या कर्तव्यात माझे लाड आणि, आईवडिलांच्या प्रति माझे कर्तव्य आड यायला नको. बघतील ते वाट,आणि बसतील शांत. त्यांना ही सवय करून घ्यायला हवी ह्या पोलिसी जावयाची. त्यांना भारी हौस होती. जावई कसा हवा तरी पोलीस खात्यातला, राजबिंडा,कामप्रति प्रेम आणि आस्था असलेला.. त्यांना कळू दे अशी ही त्यांची आस्था ,असे ही निष्ठा, असे हे कर्तव्य असे हे प्रेम...

ती खूप वैतागली होती. माहेरला जयला ही न मिळो अशी अपेक्षा ही ठेवू नये मी आता इथून पुढे. बस खूप झाले हे कर्तव्य निष्ठ नवऱ्यासोबत रहाणे. सगळे कर्तव्य कळते पण बायको प्रति कधीच नाही उमगणार..

ती लगेच फोन लावते ,"हॅलो आई , (रडवेलया आवाजत बोलत) हॅलो, (मध्येच फुर फुर ,अश्रू ,आणि बोलणे ) आई तुम्ही म्हणत होतात सगळे तू विचार कर ,लगेच होकार देऊ नकोस ,पोलीस खात म्हणजे सुळावरीची पोळी, तुला वेळ असेल पण त्याला झोपण्याची ,खाण्याची, आणि मुख्य म्हणजे घरच्यांना भेटायची ही फुरसत नसणार, त्यात बायकोची खूप हाल होतात..तर तुम्ही ते अगदी खरे बोलत होतात ,आता मला ते कळत आहे..मी आता पस्तावत आहे...मला ह्या पोलीस नवऱ्यासोबत रहाणे कठीण होत चालले आहे.. त्यांना माझ्याशी बोलायला ही फुरसत नाही,मी थकले आहे ,खूप बोलायचे असते त्यांच्याशी पण त्यांना वेळच नसतो.ते ऐकायला ही वेळ देत नाही. मी खूप थकले...आता मला आराम हवाय. मी आत्ताच येते घरी तुमच्या सर्वांकडे. खूप मन मोकळे करेन. मी इथे राहणार नाही."

आई, "तुला जर असेच वाटत असेल आणि एकटेपणा सहन होत नसेल तर ये तू बिनधास्त घरी ,तुझ्यासाठी मी कधी ही मोकळी असेल, तुझ्या मनातील सगळे दुःख ,वैताग असतील त्याचे उपाय शोधू. पण तू अशी रडलीस तर मलाच खूप वाईट वाटेल. मग इकडे माझे ही मन उदास होईल. मला तर उलट खूप आंनद होईल तू घरी आलीस तर, हो पण त्यांना सांगून ये. नाहीतर तो टेन्शन घेईल ,तू घरी नसल्यावर त्याला ही खूप एकटे वाटते हे तुला माहीत आहे ना ,म्हणूनच तर तो तुला जाऊदे नाही कुठे. आपण लगेच राग आणि वैताग काढून मोकळे होऊन ही जातो पण त्याला तसे नाही जमत, हळवा आहे ,तुझ्यावर जीव ओतून टाकतो पण त्याला दाखवता येत नाही ,तरी मी तुझीच बाजू घेईन तू म्हणशील ते ऐकून घेईन, तुझ्याच बाजूने आहे मी..फक्त तू येशील तेव्हा त्याच्यासाठी चिट्ठी ठेव बरं.. आणि फोन वर ब्लॉक करू नकोस त्याला. "

----ओळख कशी झाली ह्या दोघांची...-------

ती स्पृहा नैतकची बायको ,नुकतेच त्यांचे लग्न झाले होते. तिला तो बघताच आवडला होता, राजबिंडा, आणि पोलीस खात्यात अधिकारी आहे हे समजल्यावर तिला सिंघमची आठवण झाली आणि तिला तो सिंघम वाटू लागला, त्याचे हस्य, त्याची गम्मत करण्याची लकब. स्त्रीयांप्रति आदर हेच मनात भरले ,आणि तो येऊन गेला त्यानंतर घरच्यांनी तिला समजावले, पोलीस मुलगा आम्हाला अजिबात चालणार नाही..आमचा ह्या स्थळाला नकार आहे. ह्याचा विचार ही करू नकोस.

स्पृहा रडायला लागली आणि म्हणाली, "आई, बाबा ,काका जर सिंघम सोबत लग्न झाले नाही तर मी इतर कोणाशी ही लग्न करणार नाही..मी वैतागले येणाऱ्या प्रत्येक स्थळाला, कोणी येणार आणि सतरा प्रश्न करणार ,जेवण करून जाणार, आणि पुन्हा म्हणार घरच्यांसोबत बोलून ठरवतो आणि कळतो, असे किती झाले असतील ,कमीत कमी 13 जण येऊन गेले ,प्रश्न विचारून गेले ,जेवण करून गेले ,येतो, सांगतो म्हणून गेले ते परत फिरकलेच नाहीत.त्यांचे उत्तर नाही, मग मी का झुरायचे आणि त्यांच्या होकाराची वाटत बघायची. मला ही मन आहे आणि ते मन आज ह्याने ओळखले आणि इथल्या इथे त्याने मला होकार दिला."


"हो आणि आधी रडणे थांबव बाई ." काका म्हणाले मी तुझ्या मताशी सहमत आहे कोणी नसले तरी, कारण मी ही बघत आहेच ,जे मला आवडत नाही नेमके तेच होत आहे ,13 जण बघून जाणार ,आणि तुझ्या मनाची परीक्षा घेणार ,हे आता ह्या घरात मुळीच होणार नाही, मला ही सिंघम आवडला आहे.मी शब्द देतो आपल्या स्पृहाचे लग्न ह्याच मुलाशी होणार, मी लावून देणार.कोणाला काही बोलायचे , आणि असले तरी मी एकही एक ऐकणार नाही "

काकांचे हे आश्वासक बोलणे ऐकताच स्पृहा काकांच्या गळ्यात पडली आणि रडत रडत पुन्हा हसू लागली...

सगळे उपस्थित म्हणून लागले, "आणि आमची स्पृहा हसली , सिंघमच्या प्रेमात पडली "

पण तिने जेव्हा ठरवले होते की ,लग्न करेन तर ह्याच्यासोबत हे माझे ठरले आहे. हाच माझा सिंघम आहे हे शेवटचे सांगते. तेव्हा कोणाचे काही चालेना, मग बाबा पुढे आले आणि म्हणाले मला ही स्पृहाचे मन समजले नाही जितके ह्या मुलाला. तर माझे मत ही ह्या मुलासाठी आहे. आता तर बाबा काका ही सोबत उभे राहिले म्हंटल्यावर भाऊ ,आई ,काकू ह्यांना ही हळूहळू मुलगा पसंत पडू लागला..

आई हळूच म्हणाली,"बाकी काही असो मला मुलाचे नाव खूप आवडले , आणि मुलगा ही आवडला आहे. "

काकू, " मला तर बघताच आवडला होता, पण कोणाचा ही होकार नव्हता हे पाहून मी गप्प बसले होते "

काका ,"चला म्हणजे सगळ्यांचा नकार आता होकारा मध्ये बदलत आहे तर, चला तर मग तारीख काढू ."

तारीख ठरली आणि लग्न ही पार पडले..

-------------


आज ती बाकी सगळे सोडून घरी थेट रिक्षा करून आली, दारात पोहचली नाही तोच आई बाहेर आली, आणि तिच्या वरून भाकर तुकडा ओवाळला... दृष्ट काढली...तिच्या गालाचा एक पापा घेत तिला हात धरून आत नेल...


तिला अजून ही काही समजत नव्हते आपण त्याला काही सांगून ,कळवून आलो नाहीत ,पुन्हा एक टेन्शन घेऊ घरी आलो आहोत. निदान किती ही राग येवो मी न सांगता नको यायला. ह्यामुळेच नको ते भांडण होईल ,तो चिडणार, आणि घरी कोणी नाही हे पाहून पुन्हा पोलीस स्टेशन ला निघून जाणार आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी घरी येणार. मी नाही घरी हे पाहून घरी येताच पोलीस स्टेशन गाठणार. त्यापेक्षा आईकडे थोड्या वेळ थांबते आणि घरी परतून जाते. तो आज तरी नक्की येईल. रागावले आहे मी हे समजल्यावर येईल फिरून माझ्याकडे. तर मी घरी असायला हवे. त्याचे घरात एक हसू देऊन स्वागत नाही जमले तरी रुसलेल्या मनाने तरी स्वागत करून आत घेईल..

आई, "अग ये ग, सारखे सारखे हे चिडणे बरे नाही ग वाटत ,तू कशी होतीस आणि कशी झालीस ते बघ ग. जरा मन शांत ठेवत जा आता तू ही पोलीस अधिकाऱ्यांची बायको आहेस, नवऱ्या सोबत तिला ही ताण झेलवा लागतो ,म्हणून तू खचून जाता कामा नये ,मी ही ह्या सगळ्यातून गेले आहे..तरीच मी तुला लग्न ठरण्या आधी सांगायला आले होतेच की ,तुला हा माझा मुलगा आवडला जरी असला तरी पुढे तुला हे दिव्य सांभाळून घ्यायचे आहे. तुला त्याची सपोर्ट सिस्टिम व्हावे लागणार आहे, बॅक अप ही तुलाच व्हावे लागणार आहे, तर बघ तुला हे पार पाडणे जमेल का ?? तर तेव्हा तुला ह्या खात्याची आणि होणाऱ्या नवऱ्याची जरा ही कल्पना नसल्याने तू लगेच हो म्हणाली होतीस... आठवतंय ना तुला. मग आता हातपाय गळून कसे होईल. जितका तो हिम्मत वाला नाही तितकी तू हिम्मत वाली होशील ,तुला व्हावेच लागणार आहे. सतत सतत वेळ देत नाही, बोलत नाही हे कसे म्हणून चालेल. मी तर म्हणते तू आता त्याची रणरागिणी आहेस.. काळ जाऊ दे तो ही वेळ काढायला शिकेल ,देईल तो तुला वेळ.पण त्यासाठी वेळ जाऊ दे.."

ती ,"म्हणजे मीच समजून घेत नाही आई ?, मलाच समजत नाही का ?? मला वेळ हवा आहे ,खास त्यांना समजून घेण्यासाठीच, त्यांना किती त्रास होतो हे मला माहित आहे ,तरी ते ह्या दिव्यातून मला समजून घेतात , हे समजण्यासाठी मला त्यांचा छोटासा फक्त माझा आणि त्यांचा असा वेळ हवाय, मला त्यात माहेरचे ही नकोत आणि बाकी कोणी ही नकोत ,त्यांचा आलेला ताण दूर करण्यासाठी मी वेळ मागते ,ह्यासाठीच मी धडपडते...तर काय मी चूक करते..??"

आई ( सासुबाई ) ," तू आली नाहीस का त्याला सांगून, मी तुला सांगितले होते ना ,का तू असे केलेस, अशी का वागतेस राणी, एकीकडे किती जीवापाड ओळ्खतेस ,किती प्रेम करतेस आणि एकीकडे बोलणे ही सोडून देतेस...नको ना असे करू..."

स्पृहा ,"आई मी चुकले ,पण मी लगेच जाऊन चूक सुधारते ,ते आले नसतील ,त्यांची अजून वेळ झाली नाही, पण वचन देते मी तुम्ही सांगाल त्या पावलावर चालेल, फक्त त्यांना ताण येऊ नये हे लक्षात ठेवेन...जरा हळवेपणा कमी करेन म्हणजे जरा धीट होईल.."

आई, "स्पृहा तुला काही लागले तर मी तुझी सपोर्ट सिस्टिम कायम तुझ्या पाठीशी असेन, तुझा बॅकअप मी असेन, तुला हिम्मत मी देत राहीन, फक्त माझ्या मुलासाठी तू हो. "

स्पृहा घरी जायला निघते आणि जातांना सासूबाईचा एक \"पापा घेऊन निघते ..

तो घरी येऊन उभा असतो ,तिची वाट बघत बाहेरच..थकलेला असतो खूप पण तरी ती येतांना दिसताच तो खुश होतो ,त्याच्या चेहऱ्यावर आंनद दाटून येतो...आणि तिच्या गळ्यात आलिंगन देतो...सरप्राईज.."आज 10 दिवसांची सुट्टी शेवटी घेऊन आलो आहे , उद्या आपण क्रुजने ह्या दहा दिवसांसाठी आपल्या एकांतासाठी गोव्याला निघणार आहोत...जिथे फक्त तू आणि मी आहोत, माझा सगळा वेळ ह्या दहा दिवसांसाठी तुझाच असणार आहे ,पुन्हा तुला अशी तक्रार करण्याची वेळच येऊ देणार नाही...कधीच नाही.. आणि हो आज आत्ता सगळी बॅग मी पॅक करणार आहे.."

स्पृहा, "खरंच का ?? मला चिमटा काढ बरं ,कारण मला अजून ही हे जे ऐकले ते खरे वाटत नाही रे "


नैतिक, "अगदी, हो अगदी " असे म्हणत म्हणत हळूच चिमटा काढतो.. आणि तिला उचलून घरात घेऊन जातो...आणि तिचे मनावरील ओझे सहज उचलून घेताच आणि तणाव दूर होताच ती हसली.


बायकांना किती मर्यादा येतात लग्नानंतर नवरा असा वागतो ,त्याचा त्रास ही होतो, सहन ही होत नाही, आणि आई वडिलांना सांगता ही येत नाही ,त्याचा राग ही येतो ,पण त्याच्याबद्दल कोणती तक्रार ही करावी वाटत नाही ,त्याची अडचण ही समजते ,आणि त्याची अडचण समजून ही त्याच्यावर चीड ही येते...आणि सासरी कोणाला सांगायला गेले की ते ही त्याचीच बाजू घेतात. पटतंय ना तुम्हाला ही..


संघ... मुंबई

लेखिका... अनुराधा आंधळे पालवे