एकाच नाण्याच्या दोन बाजू

Its abt comparison between working mother and housewife

आई....... एक working.... आणि दुसरी homemaker.....

घर सांभाळून ऑफिस ला जाणारी आई..... सकाळी लवकर उठून ज्या स्पीड ने शक्य असेल तसं आवरून..... डब्बे तयार करून ही आई स्वतः पण एकदम छान तयार होऊन निघते कामावर.... जाताना आपल्याला तिची एक बाजू दिसते...  पण दुसरी बाजू तिचं मन....काही वेळेला छोटं  बाळ पाळणाघरात नाहीतर घरी मावशींकडे सोपवून मनाचा हिय्या करून तिला बाहेर पडावं लागतं.......मनावर  दगड ठेवूनच बाहेर पडते ती घराच्या..... कधी कधी आर्थिक गरज म्हणून तर कधी मानसिक गरज म्हणून..... तुम्ही म्हणाल अहो मानसिक गरज काय असते... एवढं शिक्षण घेतलेलं असतं तिने........ मूल होण्याआधी काही कष्ट करून एका हुद्द्या पर्यंत पोचलेली असते ती का बरं सोडावी तिने तिची नोकरी? ही मानसिक गरज असते तिची.... पैशापेक्षाही जास्त...   

आता आपण homemaker आईच्या बाजूचा विचार केला तर..... तिच्याकडून घरच्यांच्या खूप अपेक्षा असतात आणि ती त्या पूर्ण करण्याचा जीव तोडून प्रयत्न करत असते. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत पूर्णपणे packed असते ती ❣️

मुलांचा अभ्यास घेण्यापासून तर त्यांना entertain करण्यापर्यंत अगदी तत्परतेने करत असते सगळं !!!

बरं घरी आहे म्हणून बँकेपासून तर झाडांना पाणी घालण्यापर्यंत, सगळ्याच अपेक्षा.... म्हणजे घरातल्यांच्याच असं नाही तिच्याही स्वतः कडून.. !!!!

यात कोणाचंच चुकतं असं नसतं....' आई '

च्या दोन बाजू आहेत या !!!समजून घ्यायला हव्या प्रत्येकाने तिचं मन !

इथे कुठल्याही आईची तुलना होऊच शकत नाही. नोकरी करणारी आणि नोकरी नं करणारी दोघीही working च आहेत, अगदी full time working !!!कामाचं स्वरूप प्रत्येकीचं वेगळं असलं तरिही भावना त्याच असतात. आपलं मूल, आपला संसार कसा किनारी लावायचं हे ती तिच्यापरीने ठरवत असते आणि पार पाडत असते.

एकाच नाण्याच्या दोन बाजू असलेल्या या दोन स्त्रिया खूप निगुतीने सगळं करत असतात. उगाच त्यांचं comparison करणं चुकीचं ठरेल, उलट त्यांचा गौरव केला तर त्यांनाही प्रेरणा, उत्साह मिळेल. हा सगळा सन्मान एखादीला देण्यासाठी स्त्री नेच  पुढाकार घ्यायला हवा. एका मैत्रिणीचा दुसरीला अभिमान असायला हवा. नाण्याच्या दोन्ही बाजू दोघीनींही तेवढयाच प्रेमाने, सन्मानाने बघायला हव्या. आणि प्रत्येक आईला जपायला हवं ❣️