एका मीरेची गोष्ट भाग ९

New journey of meera's life is starting.

(मागील भागात मीरा समीरला वचन देऊन कॅफे मधून बाहेर पडते. आता पुढे ..) 
मीरा निघाली होती . रिकामी ओंजळ आणि डोळ्यात पाणी घेऊन . समीर ला भेटायला जातानाच मीराला माहिती होत की आता सगळं पूर्वी सारखं नसणार. प्रेमात खोटं द दोघांच्या ही नव्हती पण life is unpredictable. 
मीरा निघाली , डोकं बंद होत जसा रस्ता समोर दिसेल गाडी तस वळण घेत होती. मीराच्या डोक्यात मात्र एकच विचार सुरु होता ' का? , का हे सगळं इतकं गुंतागुंतीचं आहे ' विचारातच आसताना तिने एका ठिकाणी गाडी थांबवली, ती गाडीतून उतरली तशी वाऱ्याची एक झुळूक हळुवार तिच्या चेहेऱ्यावरून गेली त्यासरशी तिला तिच्या गालावरून ओघळणारे तिचे अश्रु जाणवले. आधीही तिचे अश्रू पुसायला समीर होताच असं नाही , मुळात तो असताना त्याला रडलेलंच आवडायचं नाही .पण मनात खोल कुठेतरी एक आशा होती कि कधीतरी तो असेल आणि आता सगळं संपलं होत. आता समीर आधीसारखा कधीच नसणार होता. या विचारातच ती जवळच्या बाकावर बसली. अश्रू मात्र आज त्याच काम प्रामाणिक पणे करत होते. 
  त्याच रस्त्यानी अबीर जात होता. रात्रीचे १० वाजत आले होते, त्याने मीराला पाहील. मीरा या भागात एकटी तीही अशी कुठेतरी हरवल्यासारखी.. अबीर घाईतच गाडीतून उतरला. मीराच्या जवळ जाऊन मीराला त्याने हाक दिली. "मीरा ... " मीराने फक्त मान वळून एकदा अबिरकडे पाहिलं . पण त्या काही क्षणात मीराचे भरून आलेले डोळे अबीर ला खूप काही सांगून गेले. तिच्या डोळ्यातलं पुसलेला काजळ काहीतरी सांगू पाहात होत. पण नेमकं काय हे विचारायची ती वेळ नव्हती. 
अबीर मीराला बघून स्तब्ध झाला. ऑफिस मधली कॉन्फिडन्ट,सरळ आणि साधी असणारी मीरा मनात वादळ घेऊन वावरते याचाच अबीर ला धक्का बसला. तो शांतपणे मीराच्या शेजारी बसला आणि त्याने फक्त मीराच्या हातावर आश्वासकपणे थाप दिली जणू काही तो तिला सांगू पाहत होता की 
' तू घाबरू नको कितीही मोठं काही बिघडलं असेल तरीही तू ते परत उभं करू शकतेस आणि मी आहे तुझ्या बरोबर.'
नंतर बराच वेळ मीरा फक्त रडत होती , मनातल्या कितीतरी साठवून ठेवलेल्या गोष्टींना वाट करून देत होती आणि अबीर , तो फक्त तिच्या सोबत बसून तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याला फक्त तिने मोकळं व्हायला पाहिजे होत. नंतर बराच वेळ मीरने रडून घेतलं. तिला मोकळं वाटलं तेव्हा ती अबीरकडे नबघता म्हणाली
 "निघते मी"
 "मी सोडू का?"
 "नाही नको, मी जाईल ."
म्हणत मीरा निघून गेली. 
मीरा तिथून जाईपर्येंत अबीर तिच्या फक्त बघत होता. मीरा गेली अबीरही घरी निघून गेला. अबीरला आज त्याच्या रोजच्याच बिछान्यात झोप लागत नव्हती . सात तो रोजच मीराचा विचार करायचा पण आज तो अस्वस्थ होता. मीराचा उतरलेला चेहेरा आणि भरलेले डोळे त्याच्या नजरेसमोरून जाताच नव्हते. ' काय झालं असेल ? ती इतकी का रडत होती' याच विचारात त्याला कधीतरी झोप लागली. इकडे मीरा घरी पोचली . तिला आज ती मीरा आहे याच गोष्टींचा राग येत होता. पण आता रडत बसायचं कि जे आहे ते स्वीकारून पुढे जायच हे मीराला ठरवायचं होत.
आणि शुक्रवार संपला . दुसऱ्यादिवशी . मीरानी जुनी सगळी जळमट काढायला घेतली होती , तीन ठरवलं होत आता खऱ्या अर्थाने जगायचं. तिची पोकळी तिलाच भरून काढायची होती. अबीर ची सकाळ मात्र काहीशी अस्वस्थ झाली. तो मीराच्या घरी जावं का याच विचारात होता. नराहून त्याने तिला भेटायला जायचं ठरवलं. आणि तो चारच्या सुमारास तिच्या घरी पोहोचला. दारावरची बेल वाजली आणि मीरा जरा आश्चर्यानेच दाराकडे गेली कारण तिला आज कोणीच expected नव्हत. दारात अबीरला बघून तिला अंदाज आला की तो का आला असेल. 
तिने त्याला हसून घरात घेतल. इकडच तिकडच्या गप्पा झाल्या. शेवटी अबीरने तिला धीर करून विचारलं, 
"मीरा, if you don't mind telling me, काल काय झाल?"
अबीरच्या या प्रश्नासरशी शांतता पसरली. पण अबीर हे कधीना कधी विचारणार हे ही तिला माहीती होत, म्हणून ती तयार होती. 
"सांगते, पण त्याआधी… अजून एक coffee घेणार? "
"चालेल? "
म्हणत दोघेही kitchen मध्ये गेले. आणि मीरा सांगू लागली. कालच्या प्रसंगा पर्यंत तिने अबीर ला सगळ सांगीतल. तिलाही कोणाजवळ तरी मोकळ होण्याची गरज होतीच. 
मीराचं बोलून झालं होत आणि आता ती अबीरच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होती. अबीर ने हातातला कप खाली ठेवला आणि हसून म्हणाला 
"मीरा , उद्या रविवार आहे. And I hope तुझे काहीही plans नसतील. So be ready at 9 in morning. "
"म्हणजे? "
"म्हणजे आपण बाहेर जातोय उद्या. See you tomorrow."आणि तो निघून गेला. अबीर मीराच्या flat मधून बाहेर आला आणि मागे वळून मनातच हसून म्हणाला… .  

ठरल्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी मीरा तयार झाली तिने सिम्पल  टॉप आणि ट्रॉवसेर घातली होती . डाव्या हातात घड्याळ ,केसाचा बन , डोळ्यात काजळ आणि हलकासा लीप बाम  . अबीरने तिला कॉल केला तेव्हा ती खाली आली . अबीर तिला पहील्यांदाच casuals मध्ये पाहात होता. ती येउन बसली गाडी त्याच्या शेजारी बसली. तशी तिही त्याला casuals मध्ये पहिल्यांदाच पहात होती आणि तो खरच handsome दिसतो हे तिने आज पाहील. खरं तर तिने त्याला निरखून आजच पाहिलं होत. तिने त्याला एक स्मित दिल आणि विचारलं 
"कुठे जातोय आपण ? " 
" चल तर " म्हणत अबीर मोकळा हसला . आधी गणपती दर्शन करून पुढे दिवस सुरु झाला. मीरा अबीर सोबत खुप फिरली. पुण्याच्या जवळ इतकी ठिकाण आहेत हेच तिला आज कळलं होत. भोवतालचा निसर्ग ती मनातून अनुभवत होती. आज फक्त formality म्हणून नाही तर ती मनातून हसत होती. एका धबधब्या जवळ एका हातात फोन  दुसऱ्या हातात चप्पल आणि वाऱ्यामुळे चेहेऱ्यावर येणाऱ्या तिच्या केसाच्या बटा हे सगळं सांभाळताना तिची चाललेली कसरत पाहून अबीर हसू लागला 
"अबीर तुला फार हसू येतंय ना.  त्यापेक्षा माझी थोडी मदत कर ते जास्त बरं होईल " 
पडत्या फळाची आज्ञा मिळाल्या सारखं अबीर समोर गेला त्याने मीराचा हात पकडला आणि तिच्या चेहेर्या वरून केसाची बट कानामागे खोचली.रात्री दोघांनी जेवणे केले आणि अबीरने मीराला तिच्या घरी सोडलं . 
"Thanks अबीर. मला खरच गरज होती या dayout ची"
" I know dear. मला तुला सल्ला नाही द्यायचाय. तु जे काही करशील त्यात तुझ्या सोबत आहे मी"
मीरा मनोमन त्याला thanks म्हणून निघून गेली. अबीर आज खुप खुश होता कारण त्याला मीराच्या आयुष्यात स्थान मिळाल होत. मीरसाठी परत कोणवरही विश्वास ठेवण सोप नव्हत हे तो जाणून होता. त्यामुळे त्याला घाई नकोच होती. मीराच्या building कडे बघत तो हसला आणि मनात म्हणाला, 
'पुरा होना किस्मत है इस अधूरे किस्से की, 
क्युकी अभी मोहोब्बत करनी बाकी है हमे हमारे हिस्से की'.
आणि निघून गेला. 

क्रमश:


( नमस्कार , हा भाग जरा जास्तच लहान आहे. कधी कधी कथेची  आणि चालू असलेल्या परिस्थितीची गरज म्हणून ते करावं लागत. काही लोकांना कथानक रटाळ वाटू शकत पण मीरा तुमच्या माझ्या इतकीच नॉर्मल आहे म्हणूनच तिच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी फार रंजक आणि मसालेदार नाहीत तर मी मीरा असते तर माझ्या आयुष्यात घडल्याअसत्या इतक्या सध्या आहेत. आणि म्हणूनच तुमच्यातले बरेच वाचक मीरासोबत  स्वतःला relate करू शकत असतील. मी नेहेमीच जे आपल्या आजूबाजूला , आपल्या मैत्रिणी सोबत ओळखीत कोणाही सोबत जे घडत ते मांडण्याचा प्रयत्न करत असते.आजूबाजूला पाहील्यावर लक्षात आलं की व्यक्ती आयुष्याच्या कोणत्यही वळणावर असला तरीही सोबतीची गरज प्रत्येकालाच असते आणि प्रत्येकालाच हक्क आहे आनंदी आयुष्य जगण्याचा हाच विचार मांडण्याचा एक प्रामानिक प्रयत्न केला आहे. मीराही माझी पहिलीच कथा मालिका आहे. आणि याला तुम्ही जो प्रतिसाद देताय तो माझ्यासाठी खूप महत्वाचा आणि मौल्यवान आहे. तुमच्या comments अशाच माझ्या पर्यंत पोचवत रहा gayatri.blog22@gmail.com  वर) 

🎭 Series Post

View all