एका मीरेची गोष्ट भाग ७

This part gives hint about the upcoming situations in Meera's life.

(मागील भागात मीरीला समीर चा भास झाला आणि तिची ओळख अबीर सोबत झाली, आता पुढे) 

मीटिंग संपली.या प्रोजेक्टसाठी मीरा आणि अबीरच्या टीम सोबत काम करणार होत्या त्यामुळे टीम मधल्या लोकांच्या जुजबी ओळखी झाल्या आणि दिवस संपला. अबीर देखणा, रुबाबदार, महत्वाकांक्षी आणि तितकाच जबाबदार तरुण. वय वर्ष ३१.उंच, गोरा आणि भारदस्त, कोणीही त्याच्यावर भाळेल असा. नजरेत जरब, वागण्यात शिस्त आणि सतत पुढे जाण्याची धडपड.म्हणूनच इतक्या कमी वयात इतक्या मोठ्या पोसिशनवर पोचला होता तो. त्याचा नेहेमी हट्ट असायचा कि त्याने सुरु केलेलं काम हे परफेक्ट आणि त्याच्या प्लांनिंग प्रमाणेच असलं पाहिजे आणि त्यासाठी मुळात तो स्वतःच कितीही कष्ट घ्यायला तयार असायचा. 

काम सुरु झालं होत. अबीर दर दोन दिवसांनी मीराच्या ऑफिस मध्ये असायचा आणि मीराला तो दर वेळी तितकाच वेगळा वाटायचा. कॉफी टेबल वरचा त्याचा फ्रेंडलीनेस असो नाहीतर मीटिंग रूम मध्ये सगळे सिरीयस असताना वातावरण हलकं आणि healthy राहावं यासाठी प्रयत्न असो, अबीर दरवेळी वेगळा आणि तितकाच अनोळखी वाटायचा. आज शुक्रवार, मीरा डोक्यात दिवसभराचं planning करून ऑफिसला निघाली आणि आज परत तेच झालं. परत तोच व्यक्ती, पाठमोरा.... 'समीर ...!' असं म्हणत मीरने करकचून ब्रेक दाबला आणि तिला काही कळायच्या आत ती पाठमोरी व्यक्ती गर्दीत गायब झाली. 'मी समीरचा फार विचार करत नव्हती मग असं का व्हावं' या विचारात मीरा ऑफिस ला पोहोचली अबीर तिच्या आधी तिच्या कॅबिनमध्ये तिची वाट पाहत होता. 

"hi मीरा , good morning "

"good morning , sorry for being late "मीरा हातातल्या घड्याळाकडे बघत म्हणाली.

"no no ,मीच लवकर आलो, काही mails इथे येऊनच बघावे म्हणलं"

"oh sure . coffee ?"

"हो चालेल ."

अबीर दिलखुलास होता पण मीरा नेहेमीच त्याच्याशी जुजबी आणि कामापुरतेच बोलायची आणि हेच अबीरला पटायचं नाही. त्यातून आज मीरा जरा upset आहे हेही त्याला जाणवलं होत म्हणून त्याने शांत राहणंच योग्य समजलं.  

दिवस तर सुरु झाला खरा पण मीराचं मात्र कामात लक्ष नव्हतं. तिचेच काही जुने हिशेब तिला आज लागत नव्हते, 'एक - दोन वेळा भर होऊ शकतो, नेहेमी कसा भास होईल जेव्हा मला माहितीये कि ती व्यक्ती लाखो किलोमीटर दूर आहे आणि आता माझ्याकडे परत येईल याची काही शाश्वती नाही.' ती या विचारात ती काम करत होती.आज तिच कामात लक्ष नव्हत तिची होनारी चिडचिड अबीर पाहात होता आणि न राहून तो मीराला म्हणाला

"मीरा,come with me,काहीही प्रश्न नविचारता,बोलायचय जरा. "

मीरा गप्प होती आणि अबिरच्या पाठी चालू लागली. तिच्या सोबत काय होतय हेच तिला कळत नव्हतं 'दीप्ती ला इतकं ओरडण्याची खरंच गरज होती का?' याच विचारात असताना कसल्याशा आवाजाने ती भानावर आलीआणि आपण ऑफिसच्या बाहेर आलो आहोत हे तिच्या लक्षात आलं. 

"wait अबीर आपण बाहेर का आलो आहोत?"

"मी सांगितलं ना प्रश्न विचारायचे नाहीत"

आणि अबीर तिला घेऊन शेजारच्याच कॉफी शॉप मध्ये गेला. दोन hot कॉफी ऑर्डर करून तो मीराच्या समोर बसला.

"अबीर हे काय आहे आणि आपण काम सोडून इथे काय करतोय?"

"हम्म, काम सोडून नाही हा...मी माझं कामच करतोय"थोडं रिलॅक्स होत अबीर म्हणाला .

"म्हणजे ?"काहीच नसमजून मीरा म्हणाली 

"मीरा माझ्या कामाशी निगडित प्रत्येक व्यक्तीच्या अडचणी समजून घेणं मी माझं कामच समजतो, मी तुला सकाळीच विचारणार होतो काही प्रॉब्लेम आहे का, पण तुझा काही बोलण्याचा मूड दिसला नाही म्हणून काही बोललो नाही पण आत्ता तू जे काही वागलीयेस ती मीरा मला माहितीच नाही"

"हम्म , I dont think तू मला तितका ओळखतॊस."

"exactly म्हणूनच आत्ता तुझ्या समोर आहे ना. मला जाणून घ्यायचंय, काय प्रॉब्लेम आहे"

"Im sorry अबीर पण मला काहीच डिसकस नाही करायचंय"

"मीरा see you are a big girl.तू तुझे प्रॉब्लेम्स स्वतः सोडवू शकतेस. पण कधीकधी कोणाशीतरी बोलल्याने मन हलकं होत. कधीकधी सोलुशन आपल्या हातात असत पण आपण पाहू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं त्रास होतो चिडचिड होते ते आपण गोष्टी सोडून देत नाही म्हणून, आपण धरून ठेवतो ना गोष्टी आणि त्या कधीच संपलेल्या असतात हि गोष्ट जास्त त्रास देते"

अबीर बोलत होता, मीरा फक्त शांत बसून त्याच ऐकत होती. इतक्या दिवसात रेवा सोडली तर तिला इतकं कोणीच समजावलं नव्हतं.

"hello कुठे हरवली .."

"नाही काही नाही"

"मीरा तुझा client म्हणून नाही, टेम्परोरी असणारा सहकारी म्हणून नाही मित्र म्हणून, काहीही प्रॉब्लेम असेल तर तू माझ्याशी बोलू शकतेस"

मीरा फक्त हसली आणि कॉफी चा शेवटचा घोट संपवत म्हणाली

"thank you ...! for coffee "

आणि ते दोघे परत ऑफिस ला आले मीरा दिप्तीला सॉरी बोलली आणि परत कामात बुडून गेली. 

मीरा काम संपवून निघाली तोच तिला अबीर दिसला, यावेळी मीराने छान हसून त्याला bye केलं त्यावर त्यानेही 'you owe me a coffee ' अशी आठवण करून दिली आणि मीरा निघून गेली. बऱ्याच दिवसांनी मीरा खुश होती कारण बऱ्याच दिवसांनी मीराने कोणाकडे मित्र म्हणून पाहिलं होत.

अबीरहि घरी निघून गेला. रात्री तो मीराचाच विचार करत होता. 'पहिल्यांदा प्रेसेंटेशनमध्ये दिसली ती मीरा एकदम डॅशिंग, कॉन्फिडन्ट आणि तिखट. ऑफिसमध्ये वावरते ती मीरा एकदम सॉफ्ट, आपुलकीची आणि आज दिसली ती मीरा किती फरक आहे . आज पहिल्यांदाच मीरा अगदी लहान मुली सारखं सगळं फक्त ऐकत होती' त्याला एकदम मीराचे डोळे आठवले, फक्त काजळाची एक रेघ ओढलेले तिचे डोळे आणि तो मनाशीच हसला. मीरा बद्दल त्याला खूप काही जाणून घ्यायचं होत पण सरळ जाऊन विचारणं योग्य नव्हत म्हणूनच त्याने patience ठेवायचे ठरवलं आणि पांघरून घेऊन तो झोपून गेला. 

इकडे मीरा ही विचार करत होती, तिच्या वागण्याचा. ' या आधी कधीच असं झालं नव्हतं, मग आज का ?अबीर म्हणतो तस मी खरंच काही गोष्टी उगाच धरून बसलीये का? भूतकाळात जमा झालेल्या गोष्टींचा मी वर्तमानावर वाईट परिणाम करून घेते आहे का?' असे कितीतरी का डोक्यात फिरत होते तितक्यात मीराचा फोन वाजतो आणि ती भानावर येते

"रेवा कित्ती दिवसांनी यार"

रेवा मीराची शाळेपासून ची मैत्रीण

" हो ... atleast मी कॉल तरी केला तू तेही करत नाहीस "

"अग… . "

"अग काही नाही, काय म्हणतीयेस, "

"काही नाही गं, पण तू नेहेमी सारखा वेळेवर फोन केलास, मला बोलायच होतच तुझ्याशी"

"हो मग telepathy.. बोल आता लवकर"

मीराने आज दिवसभर जे काय घडल ते सगळ रेवाला संगीतलं. 

"मीरा मीही तुला हेच सांगत आलिये ना, एखाद्या गोष्टच्या किंवा व्यक्तीच्या आहारी जान कधीही वाईटच ना. शेवटी आपल्या हातात फक्त मनस्ताप उरतो बघ. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते बघ,एकदाका ती वेळ निघून गेली की सगळ संपत आणि तुला माहीत आहे मी कशाबद्दल बोलतीये"

बराच वेळ बलून मीराने फोन ठेवला. रेवाशी बोलून मीरा जरा शांत झाली. नविन आठवडा सुरू झाला, कामात दिवस संपत होते, पण आता थोडं वेगळेपण होत. मीरा अबीर सोबत थोड मोकळ वागायला लागली होती. हळूहळू त्यांच्यात कामाव्यतिरिक्त बोलण व्हयला लागल होत. 

 एक दिवस मीरा कामात असताना तिच्या मोबाईल वर एका unknown number चा message होता. मीरा तो वाचला आणि ती जवळजवळ दचकली. धक्का, आश्चर्य, आनंद काय होत आहे हेच तिला कळत नव्हतं कारण message असा होता… … 

 'Hi meera, Sameer here. Yes, I'm here in pune. बाकी भेटल्यावर बोलू. 'आणि सोबत ते नेहेमी भेटायचे त्या cafe चा पत्ता होता. 

मीराला मिनीटभर लागला असेल हे सगळं खर आहे हे पचायला. खर तर तिला खूप आनंद झाला होता आणि हे तिला कोणाला तरी सांगायच होत, तिला अबीर ची आठवण झाली पण, तिने त्याला सांगण टाळल. कारण अजून अबीर ला तिच्या या बाजू विषयी काहीच माहीती नव्हत. तिने होता होईल तितक शांत राहाण पसंत केल आणि संध्याकाळ होण्याची वाट पाहू लागली. 

 मीराचे प्रश्न संपणार का? की समीरच येणं मीराच्या आयुष्यात नविन पर्व सुरू करनार? 

क्रमशः

(हा भाग लिहायला बराच उशीर झाला त्या बद्दल क्षमस्व. या भागात अबीरचे काही पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला आहे, त्या साठीच वर्णन आणि परिस्थिती दाखवण गरजेच होत आणि म्हणूनच हा भाग इतर भागांपेक्षा मोठा आहे. तुमच्या प्रतिक्रिया कायम महत्वच्या आणि मार्गदर्शक असतील. तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट बघतीये gayatri.blog22@gmail.com वर.) 

🎭 Series Post

View all