एका मीरेची गोष्ट भाग ५ .

This is the the last part of the story. Waiting for the reviews so that we can move forward in Meera's life.

एका मीरेची गोष्ट भाग ५

दिवस संपत आला तसा समीरचा मीराला message आला, 'Leaving now, will be there in 30 min'.message वाचताच मीराने काम संपवायला घेतली अर्ध्यातासात ती सगळं आटोपून ऑफिस मधून बाहेर पडली, समीर आधीच तिची वाट बघत थांबला होता. मीराने केस बन मध्ये बांधत समीर ला एक उदास smile दिल.तसतर समीर ला कालच कळलं होत कि मीराचं काहीतरी बिनसलंय पण त्याने आत्ताही मीराला काही विचारलं नाही. मीरा गाडीवरही गप्प होती. मग दोघांनी बाहेरच थोडास खाल्लं आणि ते समीरच्या फ्लॅट वर गेले. समीर fresh होण्यासाठी आत गेला, मीरा खिडकीत उभी होती, कदाचित तिला पडलेल्या प्रश्नांची उत्तर ती बाहेरच्या अंधारात शोधण्याचा प्रयत्न करत होती. समीर फ्रेश होऊन आला, त्याने मीराची तंद्री लागलेली पहिली. समीरने हळूच तिला मागून मिठीत घेतलं तशी मीरा  दचकून भानावर आली.समीरने त्याची हनुवटी मीराच्याखांद्यावर ठेवली तिला हळूच मानेवर kiss केल  तशी मीरा शहारली समीरच्या अजून जवळ गेली, समीरने त्याचे हात तिच्या भोवती गच्च करत विचारलं " माझ्याशी share करण्यासारखं नाही इतकं वाईट काही झालाय का?" मीरा त्याच्या पासून थोडं लांब जात म्हणाली "तस काही नाही " समीरने तिला स्वतःकडे वळवलं आणि तिला जवळ घेतलं, समीरची नजर मीरावर रोखलेली होती आणि मीराची नजर मात्र जमिनीवर समीरने तिच्या कमरे भोवतीचा एक हात हळूच काढून मीराने बन मध्ये बांधलेले केस मोकळे केले. मीरा समीरच्या अजून जवळ आली. पण आपण इथे का आलो आहोत हे अचानक लक्षात आल्याने ती गडबडून समीर पासून दूर झाली.मीराचं असं दूर जाणं समीरसाठी खूप नवीन होत. समीर शांत होता, मघाशी पासूनची मीराची तगमग त्याला काळात होती. त्याने शांतपणे मीराला खाली बसवलं आणि तिच्या केसातून हात फिरवत शांतपणे तिला म्हणाला "मीरा ..बोल" इकडे मीरालाही कळत नव्हतं कि सुरुवात कुठून करावी पण आज बोलणं गरजेचं होत. मीराने केस सावरले आणि  एक दीर्घ श्वास घेत बोलू लागली "समीर, तू फॉरेन ला जाणार हि खूप आनंदाची गोष्ट आहे. पण तू आपला विचार केलाय का? तू गेल्यावर मी एकटीच असेल. त्यात तू म्हणतोय कि तू परत कधी येशील हे पण नक्की नाही मग माझं काय?"  मीराने एका दमात बोलून टाकल, समीर एकटक मीराकडे बघत होता, बोलताना तिच्या डोळ्यातलं तिने लपवण्याचा प्रयत्न केलेलं पाणी त्याच्या नजरेतून सुटलं नाही. थोडा विचार करून समीर म्हणाला "तुझं काय म्हणजे? मी जाण्याच्या आधी आपण घरी बोलूया atleast engagement करूया, तुझा visa टाकू approval  साठी. तोपर्येंत मी तिकडे settle होईल . visa approve झाला कि मी परत येईल,मग आपण लग्न करू आणि मग मी तुला घेऊन जाईल तोपर्येंत तू तिकडे job शोधायला लाग". समीर सगळं planned असल्यासारखं बोलत होता. मीरा हरखून त्याच्या बोलणं ऐकत होती.समीर च बोलणं संपलं होत, मीरा तरीही विचारात होती. 

"मीरा ... कुठे हरवलीयेस ?"

"समीर तू बोलतोयस हे बोलण्याइतकं सोपं नाहीये ना!, तुला सगळं माहितीये मग तरीही तू........." आता मीराला अश्रू अनावर झाले आणि ती दोन्ही हाताच्या ओंजळीत चेहेरा लपवून ओक्सबोक्शी रडू लागली . तिची भीती खरी झाली होती. तिला असं एकाएकीच रडताना बघून समीरलाही अचानक काहीतरी आठवलं....हा विषय या आधीही झाला होता तेव्हा मीराने सांगितलं होत कि तिला अजून चार वर्ष तरी परदेशात जण शक्य नव्हतं. बाबांची नाजूक ताब्यत आणि लहान भाऊ यांच्या जबाबदारीत तिने स्वतःला बांधून घेतलं होत. समीरचा काही प्रॉब्लेम झाला नसता तिच्या घरी, पण जबाबदारी झटकून निघून जाणारी ती नव्हती. समोर मीरा रडत होती आणि situation समीरच्या हातात नव्हती. एरवी प्रत्येक गोष्टीवर शांतपणे solution शोधणारा समीर आज हतबल होता.नेमकं काय आणि कोण चूक आहे याच गणिताचं त्याला काळात नव्हतं. नंतर कितीतरी वेळ मीरा खिडकीत दूरवर कुठेतरी नजर लावून बसली होती आणि समीर एकटक तिच्याकडे बघत बसला होता. दोघांचही सगळं हरवण्याचा वाटेवर होत. पुढे अंधार होता.

समीरच्या घरात वातावरण खूप हसतखेळत होत , तो घरात मोठा होता,आणि family शी खूप connected होता पण तरीही त्याने परदेशात अनिश्चित काळासाठी जाण्यासाठी आई बाबाना मनवल होत कारण इतकी मोठी संधी सोडणं त्याच्या साठी फार अवघड होत. इकडे मीराही घरात मोठी होती.घरात वातावरण तिच्याही छानच होत पण लहानपणापासून काही घटना अश्या घडत गेल्या ज्यामुळे ती खूप जास्त प्रॅक्टिकल झाली होती आणि भावनांपेक्षा जबाबदारीला जास्त प्राधान्य देत होती. आता प्रश्न होता पुढे काय? 

त्या रात्री उशिरा केव्हातरी दोघांनाही झोप लागली. पहाटेच मीराला जाग आली तशी ती उठली आवाज नकरता fresh झाली आणि जाताना समीरसाठी एक नोट ठेऊन गेली ज्यावर लिहिलं होत "समीर जे होत ते चांगल्यासाठीच ...!"

समीर सकाळी उठला सगळीकडे शांतात बघून मीरा नाहीये याचा अंदाज त्यालाही आलाच तेव्हाच त्याला मीराची नोट मिळाली. ती वाचून समीर कोड्यातच पडला.यातून मीराला काय सांगायचं होत तेच त्याला कळत नव्हतं. आज दोघांचीही सुट्टी होती पण तो त्याच्या घरी आणि ती तिच्या घरी.....बर्याच वेळानी समीरने मीराला फोन केला ...

"hi ... ठीक आहेस ना ?" 

मीरा होईल तेव्हडा नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत होती.

"हो" 

"मग  मला सांग त्या नोट वर जे लिहिलंस त्याचा अर्थ काय?"

"हं sss... अर्थ सरळ आहे ना समीर, तूच नेहेमी सांगतो ना जे होत ते चांगल्यासाठीच, कदाचित तू  USA ला जाणं माझ्यासाठी आणि मी इथे राहणं तुझ्यासाठी चांगलं असेल "

समीर एकदम blank झाला ....

"काय ......? म्हणजे ..... there is no we anymore....???"

समीर खूप पॅनिक झाला  होता.

"मीरा हे बिकूल बरोबर नाहीये, सगळं तुझ्या मनासारखं नाही होऊ शकत ... तुला वाटलं तू  I love you म्हणालीस आज तुला वाटतंय तर तू हे असं काहीतरी बोलतीयेस..."

मीरा गळ्यात आलेला आवंढा कसाबसा गिळत म्हणाली 

"समीर मला वाटतंय म्हणून नाहीरे. परिस्थितीचा आपल्याला जास्त त्रास होऊ नये म्हणून"

"म्हणजे ?"

"समीर कितीही मनात असलं तरीही मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही ना मी तुला थांबवू शकते जाण्यापासून मग सांग मी काय करू. तुला वाटत का हे सगळं माझ्यासाठी सोपंअसणार आहे. पण ...."

आणि पुढे काही बोलायच्या आत तिनेच फोन कट केला. समीर समजून गेला आता मीरा परत रडत असेल ...त्याने बराच वेळ तिला फोन करण्याचा प्रयत्न केला पण मीराने एकही कॉल receive केला नाही. बोलणं गरजेचं आहे हे तिलाही कळत होत पण त्याच्या समोर रडणं त्याच्या पायात बेड्या ठोकण्यासारख होत हेही तिला माहिती होत .  तिला तिच्यामुळे समीरने अडकून राहायला नको होत. त्या दिवशीपासून ते दोघे एकमेकांसमोर 'सगळं ठीक आहे' असं  भासवत होते. नात्यात distance येत होत. मुळात नातं कितपत राहील होत हेच ठरत नव्हतं. आणि दुसरा धक्का बसला जानेवारीत समीरचे टिकेट्स confirm झाले.समीरने हि बातमी मीराला सांगितली. मीरा आतून तुटत होती पण समीरसाठी strong राहणं तिला गरजेचं होत. आणि समीरने ही तेच करायच ठरवल होत. 

आणि समीरचा निघण्याचा दिवस आला. आदल्यादिवशी समीर आणि मीराची शेवटची भेट होती. दोघे एकमेकांच्या समोर बसलेले होते, बोलत कोणीच नव्हतं आणि यानंतर कधीच बोलणार नव्हते कारण तसाच ठरलं होत. ती शांतता तोंडात मीरा बोलली "समीर... All the best, या नंतरची भेट कधी, कुठे, कशी होईल माहिती नाही म्हणून हा perfume , मी नाही तर माझा आवडता सुगंध सोबत राहील सुरुवातीला." तिने आणलेलं gift तिने समीरला दिल. समीरला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. चल निघते म्हणून मीरा तिच्या जागेवरून उठली, तसा समीर लगेच म्हणाला " थांब मी सोडतो" त्यावर पडलेल्या चेहेर्याने मीरा ओठांवर खोटं हसू आणत  म्हणाली " नको, आता याचीही सवय व्हायला पाहिजे ना " आणि समीर ला एक शेवटची मिठी मारण्यासाठी त्याच्या जवळ गेली. त्यानेही तिला अलगद मिठीत घेतलं. तिच्याहि नकळत तिच्या डोळ्यातलं पाणी त्याच्या छातीवर पडलं तिच्या ओल्याझालेल्या पापण्या आणि थरारते ओठ त्याला ओरडून सांगत होते 'राहा इथे असाच माझ्यासोबत कायमचा, मला असच तुझ्या मिठीत राहायचय' पण ते आता शक्य नव्हतं. मीराचा इतका निरागस चेहेरा पाहून समीरला राहवलाच नाही त्यांनी त्याची मिठी अजून घट्ट केली.तो आवेग, तो क्षण समीर मीरा एकमेकात हरवून गेले होते. तेव्हड्यात समीरच्या आई चा फोन आला आणि दोघेही भानावर आले आणि वेगळे झाले ते कदाचित कायमचे. 

समीर निघून गेला. आज कितीतरी दिवस उलटले समीरला जाऊन. समीरच्या मिठीत मीरा रडली ते शेवटचं. त्यानंतर ती कधीच रडली नाही आणि त्यानंतर ती कधी जागलीच नाही. आज दोघांच्याही जवळजवळ सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या होत्या. आजही जेव्हा जेव्हा समीरची आठवण येते तेव्हा मीरा तिच्या झोपाळ्यात बसून दूर कुठे तरी नजर लावून बसते. समीरही मीराच्या आठवणीत कॉफी चे कप संपवतो. कधी आठवण फारच अनावर झाली तर जातो एकमेकांना unknown नंबर वरून फोन आणि मग एक हॅलो आणि तासभर फक्त शांतता बोलते त्यांच्यात. आता समीर मीरा मध्ये काय झालं ,का झालं , चूक नेमकं कोण होत थोडा वेगळा निर्णय घेता आला असता हे सगळं गौण होत कारण ते सोबत होते तेही प्रेमाने आणि वेगळे झाले तेही प्रेमाने. कधी कधी परिस्थिती नसते आपल्या हातात. पण निस्वार्थ प्रेम करणं ते आजही आपल्या हातात आहे आणि नेहेमीच राहील.

प्यार कबका निकल पडा अपनी राह पे,

दर्द सुनेहेरे ये बाकी है ...

बात तो साफ केह दि थी हमने,

लेकिन ये इश्क अभि भी बाकी है .

(कथा लहान आहे.जर तुम्हला या कथेचा शेवट वेगळा पहायचा असेल आणि जर मीरा समीर च्या आयुष्याचे पुढचे काही पैलू  उलगडून पाहायचे अस्तिल तर तुम्ही reviews मध्ये लिहू शकता किंवा तुमच्या comments  थेट मला mail करू शकता 

gayatri.blog22@gmail.com  मी तुमच्या review आणि mail ची वाट बघतीये.)

धन्यवाद. 

 गायत्री 

🎭 Series Post

View all