एका मीरेची गोष्ट भाग 12

Meera is moving on.

(मागच्या भागात मीरने अबीर ला मिठी मारली आणि काय होतंय हे कळण्या आधीच मीरा पार्किंग मधून लिफ्ट कडे पळत गेली. आता पुढे )
मीरा लॉक उघडून घरात गेली, आज ती खूप खुश होती. ती विचार करत होती 'काय पाहिजे होत आयुष्यात कोणीतरी आपल्यावर जीव ओतून प्रेम करावं इतकी माफक अपेक्षा होती मग आज अबीर जेव्हा समोर उभा आहे मग मी का या प्रेमाचा स्वीकार करू नये.' त्या रात्री तिने ठरवलं अबीरला हो म्हणायचं आणि त्याच्या सोबत नवीन सुरुवात करायची. फक्त हे surprise अबीरला द्यायचं कस ते तिला कळत नव्हतं. पुढे काही दिवस नेहेमी सारखेच गेले पण या काही दिवसात मीराच्या वागण्यात बराच बदल झाला होता.ती नबोलता जमेल तस अबीरला खुश करण्याचा प्रयत्न करत होती, त्याच्यासाठी छान तयार होणं ऑफिसनंतर अबीरची वाट पाहून या गोष्टी आपसूकच होत होत्या. आणि शेवटी तो दिवस आला.रविवारी मीरा सकाळीच सगळं यावरून अबीरच्या घरी गेली. पाचेक मिनिटं बेल वाजवल्यानंतर त्याने दार उघडलं. नुकताच शॉवर मधून टॉवेल गुंडाळून बाहेर आलेला अबीर, एका हाताने केस पुसत होता.मीरा त्याच्याकडे बघताच राहिली.अर्थात असा view तिला रोज कुठे बघायला मिळणार होता. मीराला समोर बघून अबीर अवाकच झाला. नेव्ही ब्लू कलर चा सिल्क कुर्ता त्यावर क्रॉस कॉम्बिनेशन मध्ये लोगिन, अर्धे केस pinup केलेले, चेहेऱ्यावर मोकळ्या असलेल्या केसाच्या दोन बटा वाऱ्यावर खेळात होत्या, कानात मॅटचिंग earings , डोळ्यात काजळ ,डाव्या हातात घड्याळ आणि तिचा नेहेमीचा perfume . अबीर मीराला डोळ्यात साठवत होता. मीरा मात्र अबीरला असं बघून लाजली होती.
"आता असं दारात उभं करणार का ?" मीरा चेहेऱ्यावरचे केस कानामागे सरकवत म्हणाली.
"अ.... हो, I mean नाही, ये ना आता ."
"कस ?तू मधून सरकलास तर आत येत येईल मला " आणि मीरा हसायला लागली . अबीर स्वतःच्याच वेडेपणावर हसला आणि बाजूला झाला.
" सॉरी, तुला असं बघायची सवय नाहीये ना ?" अबीर खाली मान घालून उभा होता. 
"हो ना म्हणूनच म्हणलं आज surprise द्यावं "
"हम्म, चल मी पटकन कॉफी ठेवतो आणि तुला घर दाखवतो "
"अरे wait कॉफी ठेवते मी तू आधी कपडे घालून ये " आणि दोघेही हसले. अबीर ने मीराला किचन दाखवलं आणि तो बेडरूम मध्ये निघून गेला. तो तयार होऊन आला तेव्हा मीरा कप शोधत होती. मीराला त्याच्या किचन मध्ये बघून अबीर मनोमन खुश झाला होता. 'मीरा आपली रोजची सकाळ मला तुला असं माझ्यासाठी कॉफी करताना बघायचंय' आणि स्वतःच्याच cheesy विचारावर जीभ दाबत तो समोर आला तस तिने त्याच्या हातात कॉफी चा कप दिला.अबीर ने तिला गॅलरी मध्ये नेलं.अबीरचा १८ व्या मजल्यावर प्रशस्थ फ्लॅट होता. आणि गॅलरी पण बरीच मोठी होती.अबीर तिला घराबद्दल बोलत होता, ती मात्र चोरट्या नजरेने त्याला न्याहाळत होती. 
"अबीर, इथे गॅलरी मध्ये झुला बसवून घे ना ." मीरा अबीरच बोलणं तोडत म्हणाली. 
तीच बोलणं नकाळाल्याने त्याने मीराकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. तस मीरा अबीरच्यासमोर त्याच्या खूप जवळ आली इतकी कि त्याच्या हृदयाची वाढती स्पंदने तिला जाणवू लागली आणि अबीरच्या डोळ्यात बघून हळूच म्हणाली,
"आवडतो मला ..."काही क्षण निरव शांतता आणि मीरा त्याच्या हातातला कप घेऊन आत निघून गेली.अबीरच्या श्वासात अजूनही मीरा दरवळत होती , नेमकं काय झालं आत्ता हे त्याच्या लक्षातच आलं नाही तो मीराच्या मागे घरात आला ,
"मीरा ...काय म्हणालीस, काय आवडत तुला ?"अबीर गोधळलेला होता .
"अरे झुला , मी झुल्याबद्दल बोलत होते" मीरा चेहेऱ्यावरचा हसू लपवत म्हणाली.
मीराचं हसू अबीरच्या लक्षात आलं आणि ती तिकडून निघत असताना अबीर ने तिचा हात पकडला ,
"अजून काय काय changes पाहिजेत ते आत्ताच सांग." आपली चोरी पकडली गेली हे मीराच्या लक्षात आलं, तिने आपला हात सोडवला आणि गॅलरीच्या दाराशी उभी राहिली.
 अबीरला मात्र कुठलीच घाई नको होती. त्याला आत्ता ती  त्याच्या नजरे समोर होती , आनंदी होती आणि मुळात आज तिने  स्वतःहून त्याच्याकडे पाहिलं पाऊल टाकलं होत.
"आज वातावरणात खूप गारवा आहे,नाई..!" काहीतरी बोलायचं म्हणून मीरा वळून गेली .
"हो ना ."
"मीरा २ मिनिट थांब, मी कपडे बदलून येतो ." 
"परत .... का ?"
"चल जरा बाहेर जाऊन येऊ."
"कुठे ?"
"मीरा ...! तुलाना प्रश्न खूप असतात . "
असं  म्हणून अबीर कपडे बदलून आला आणि त्याने जवजवळ मीराला हाताला ओढून बाहेर आणलं आणि लिफ्ट मध्ये नेत बटन दाबलं.अबीरने गाडी काढली , गाडी पुण्याच्या ओल्या रस्त्यावरून धावू लागली तरीही नेमकं कुठे जातोय हे मीराला कळायला काहीच मार्ग नव्हता. गाडी रांजणगावच्या दिशेने चालली होती, बाहेर पावसाची रिमझिम सुरु होती, वाऱ्याची झुळूक मातीच ओलं अत्तर पसरवत होती . कोणीच कोणाशी बोलतं नव्हतं आणि गणपती मंदिराबाहेर गाडी थांबली. मीराने प्रश्नार्थक नजरेनेच अबीरकडे पाहिलं. त्याने फक्त एक smile केलं. दर्शन झालं आणि काहीतरी खायचं म्हणून ते थांबले .
"काय रे आज अचानक बाप्पा कसे आठवले ?"
"काही नाही ग. आज सकाळी सकाळी तुझा प्रसन्न चेहेरा दिसला ना, म्हणलं बाप्पाला thank you म्हणावं ."
यावर मीरा खुप हसली. पण आज तिची कुठलीही हरकत अबीरला वेड लावत होती, पावसात जादूच असते तशी .
आजूबाजूला फिरून पार्टीला निघाली तेव्हा संध्याकाळ झाली होती आणि पावसाने खोडी केली. रिमझिम पडणारा अचानक धो -धो कोसळू लागला.मीराने हट्टाने गाडी थांबली आणि ती गाडीतून उतरून पावसात भिजू लागली . 
मीरा आज पर्येंत पाऊस लांबून बघायची पण आज तिला मनमुराद भिजत होती जणू पाऊस तिला रिक्त करत होता आणि ती मनापासून सगळे पाश तोडून मोकळी होत होती. अबीर तिला फक्त लांबून बघत होता. त्याला हेच कळत नव्हतं कि मीरामध्ये अजून किती गोष्टी अश्या आहेत ज्या अजून त्याला कळायच्या आहेत. शेवटी नराहून हो गाडीतून उतरला अन मिरच्या दिशेने त्याची पाऊल चालू लागली. मीरा त्याच्या समोर होती. पावसात चिंब भिजलेली मीरा, भिजलेले केस मानेशी लगट करू लागले, पावसाच्या धारा तिच्या केसातून कपाळावर आणि मग वळणंघेत नाहीशा होत होत्या. त्याच एक मन कधीच फितूर झालं होत आणि दुसरं अजूनही त्याला त्याची पायरी सोडू देत  नव्हतं . एका मनाला तिला आत्ता मिठीत घ्यायचं होत. तिच्यात सामावून जायचं होत तर दुसरं मन तिला disurb करायला तयार होत नव्हतं, त्या मनाला तिला असच मुक्त बघायचं होत. अबीरच स्वतःशीच द्वंद्व सुरु होत तेव्हा वीज कडाडली आणि दोघंही भानावर आले . दोघंही भिजलेले, आणि चोरी पकडल्या सारखे, अवघडलेले. मीराचा ड्रेस भिजून अंगाला चिकटला होता हे तिला कळताच ती अजून अवघडली . अबीर ने शांत पाने तिला गाडी कडे आणलं आणि त्याच जॅकेट तिला घालायला दिलं आणि गाडी वेगात रास्ता कपात निघाली . आजचा तो एक क्षण, खरंतर खूप काही घडू शकलं असत पण अबीरने स्वतःचा तोल दळू दिला नाही या एका विचारानेच मीरा मनोमन सुखावली आणि एक वेगळंच समाधान तिच्या चेहेऱ्यावर होत. भिजल्यामुळे कडकडणाऱ्या मीराला अबीरने तिच्या घरी सोडलं. 'काळजी घे, भेटू उद्या' इतकंच म्हणाला आणि निघून गेला. मीरा मात्र अजूनही तिथेच त्याच एका क्षणात अडकली होती. गरम पाण्याने अंघोळ करून तिने खाण्यासाठी maggie बनवली आणि फोने हातात घेतला त्यावर अबीर चा मेसेज होता 'Reached ..!’
एक दीर्घ श्वास घेऊन तिने डोळे झाकले आणि आजचा पूर्ण दिवस तिच्या डोळ्यांसमोरून फिरत राहिला. आणि काहीतरी निर्धार करून मीरा आपल्या रूमकडे निघाली.

🎭 Series Post

View all