एका मीरेची गोष्ट भाग १०

Abir is about to play his card.

(गेल्या भागात मीरा अबीर सोबत बाहेर जाते आणि खूप दिवसाने मोकळी होते .....आता पुढे )

मीरा घरी आली. आज खरंतर ती खूप फिरली होती खूप थकली होती पण तरीही आज ती फ्रेश होती. बेड वर पडल्या पडल्या ती दोन दिवसापासून जे काही सुरु होत त्याचा विचार करत होती . आणि आज पहिल्यांदाच ती तिच्या ऑफिस शिवाय आणि कामाशिवाय अबिरचाही विचार करत होती. आज खूप दिवसानी तिला इतकी छान कंपनी मिळाली होती. आता पहिल्या सारखं ऐकत राहायचं नाही असं तिने ठरवलं आणि झोपून गेली. 

अबीरला हि आता खऱ्या अर्थाने माहिती होत कि मीराला फक्त प्रेमाची नाही तर चांगल्या सोबतीची गरज आहे. आणि त्याने मनोमन स्वतःलाच प्रॉमिस केलं की 'मीरा तू समीर वर केलंस तस प्रेम मला तुझ्यावर करणं जमेल की नाही, हे माहिती नाही पण तुझा चांगला मित्र बनून तुझी सोबत नक्की करेल. शेवटी तू खुश असं जास्त महत्वाचं आहे' आणि मीराचा आजचा मुक्त हस्तानाचा चेहेरा समोर आणत अबीरलाही झोप लागली. 

 दुसऱ्यादिवशी सोमवार होता, मीरा नेहेमी प्रमाणे फॉर्मल्स मध्ये तयार झाली पण आज तिने निघताना तिचा आवडता perfume लावला होता.आणि आज ती खूप उत्साहात ऑफिस ला निघाली. सकाळच्या मिटींग्स आणि बाकी कामहि आज लवकर संपली होती. मीरा तिच्या केबिन मध्ये मोबाइलला बघत बसली होती तेव्हा अबिरचा विचार तिच्या डोक्यात येऊन गेला. आज अबीर तिच्या ऑफिसला येणार नव्हता आणि त्याच ऑफिस फार काही दूर नव्हतं. ती स्मार्ट कार्ड घेऊन लगेच तिच्या चेअर मधून उठून बाहेर आली काही जुजबी सूचना दिल्या आणि हातातल्या घड्याळाकडे बघत लिफ्ट कडे निघाली. अबीरच्या ऑफिस मध्ये ती याआधी येऊन गेलेली त्यामुळे तीला तिथल्या बऱ्यापैकी गीष्टी माहिती होत्या. ती ID देऊन आत गेली आणि अबीरच्या केबिन बाहेर उभी होती. अबिरचा कॉल संपलेला पहिला आणि लगेच तिने केबिन च्या दारावर नॉक केलं आणि आणि आत डोकावली त्याने वर नबघतांच आत येण्याचा इशारा केला. मीरा अबीरच्या टेबल समोर उभी होती आणि अबीर मात्र कसल्याश्या फाइल्स मध्ये busy होता. वाऱ्याची झुळूक आली तसा मीराचा perfume केबिनभर पसरला आणि त्या सुगंध सरशी अबीरने वरती पाहिलं आणि समोर मीराला बघून त्याला जवळ जवळ शॉक बसला. मीरा मात्र त्याचा चेहेरा बघून हसत होती."मीरा...?"

"काय ?" ती हसत म्हणाली .

"तू ?.... I mean कशी काय ? ना मॅसेज, ना कॉल ......... आणि माझ्या माहिती प्रमाणे आज मीटिंग पण नाही. मग ?"

" अरे हो किती प्रश्न . by the way ... मि. अबीर केबिनमध्ये आलेल्या लोकांना बसायला सांगतात की फक्त प्रश्न विचारतात?"

तिच्या प्रश्नामुळे अबीरच्या लक्षात आलं की मीरा अजून उभीच आहे. 

"अगं बस ना .... I am sorry ..."

आणि मीरा त्याच्या समोरच्या खुर्चीत बसली .

"बोला मॅडम आज इकडे कुठे "अबीर त्याच्या खुर्चीत रिलॅक्स होत म्हणाला .

"nothing much , कॉफी साठी आले होते पण तू busy होतास आणि आता कॉफी ची वेळ नाही .so ठीके "

" yes , आता कॉफी ची वेळ नाहीये. If you don’t mind,lunch करूयात ?"

मीरानेही हातातल्या घड्याळाकडे बघत होकार दर्शवला आणि अबीरने लगेच समोरच्या फाइल्स आणि लॅपटॉप बंद करून डेस्क arrange केला आणि मीरासोबत बाहेर पडला. 

"कुठे जाऊयात जेवायला ?"

"जिथून लवकर वापस येऊ तिथे. postlunch मीटिंग आहे एक "

"okay "

रेस्तोरंट मध्ये गेल्यावर मीरने लगेच कॉर्नर टेबल कडे पाहिलं आणि मग अबीर तिच्या मागून तिच्या समोर बसला. वेटर आला तेव्हा मीराने लगेच ऑर्डर दिली. अबीर तिच्याकडे बघताच राहिला 

"मॅडम मला पण विचारा काय खाणार म्हणून "

"आज मी दिलेली ऑर्डर खा . तसाही तू मलाच विचारलं अस्तास ना ऑर्डर साठी. मी आधीच देउनटाकली"

अबीरने तिला फक्त एक प्रश्नार्थक लुक दिला. तस मीरा वेटर कडे बघत म्हणाली स्टार्टर आणि डेसर्ट सरांना विचारा. आणि गालातल्यागालात हसली.  वेटर गेल्यावर अबीर म्हणाला 

"बोल आता"

" अबीर .... actually मला तुला thanks म्हणायचं होत" मीरा टेबल वर ठेवलेल्या तिच्याच बोटांशी चला करत म्हणाली .

" थँक्स ..? मला ... का?"

"काल साठी ."

"ohh बर"

"हो.काल खूप दिवसांनी इतकं एन्जॉय केली मी. खार सांगायचं तर मी मला एका कोशात बंद करून घेतलं होत. पण तुझ्यामुळे त्यातून बाहेर येण्यासाठी atleast एक पाऊण टाकली मी. म्हणून थँक्स"

"बापरे ...कित्ती बोलतेस ग .आणि एक पॉल वैगेरे काही नाही सगळी बाहेर येऊन जगात नाहीस तोपर्येंत मी तुला एकटं सोडणार नाहीये हे तुझ्या हुशार मेंदूत ठेव कायमच."  यावर दोघेही हसले आणि ऑर्डर आली , त्यांनी जेवायला सुरुवात केली.

"काय ग , perfune नवीन वाटत ?"

"नवीन नाही रे जुनाच आहे ."

"मला नाही आठवत आधी कधीच "

"हा perfume पण एक गोष्ट आहे जी मी सोडली होती."

"by the way ,कोणता आहे ?"

"blue orchid "

"मस्त आहे. म्हणून आज इतकी फ्रेश आहेस का ?"

"तस म्हण पाहिजे तर, किंवा माझा नवीन मित्र मला खूप आवडला असं म्हण "

" anything for you darling " मीराच्या डोळ्यात बघत म्हणाला आणि त्याने वेटर ला बिलासाठी खून केली.

यावेळी मात्र बिल मी देणार म्हणत मीराने हट्ट केला जो अबीर ने पूर्ण केला.तिला तिच्या ऑफिस जवळ सोडून तो निघून गेला . आणि दोघेहि कामात busy झाले. त्यानंतर मात्र कामाशिवाय ते दोघे भेटू लागले दिवभराच्या गोष्टी एकमेकांना सांगत होते. कधी कॉफी, कधी lunch तर कधी dinner आणि खूप साऱ्या गप्पा. हळू हळू अबीर तिला त्याच्या मित्रांमध्ये घेऊन जाऊ लागला अबीर चे मित्र मैत्रिणी मीराला इन्व्हॉल्व्ह करून घेत होते. पण मीरासाठी त्यांच्यात मिक्स होणं इतकं सोपं नव्हतं कारण तिला इतके लोक सोबत असण्याची सवयच नव्हती.मग तिला विचित्र वाटू नये म्हणून अबीरपण तिला फोर्स करत नव्हता.जेव्हाकेव्हा अबीर कडे वेळा असेल तेव्हा तो मीराला वेळ द्यायचा.तिला फार लोकांमध्ये मिक्स व्हायला आवडत नाही म्हणून त्यानेही weekend parties आणि फ्रेंड्स कमी केले होते. एका शुक्रवारी डिनर करून येताना अबीर ला त्याच्या मित्राचा कॉल आला. अबीर च्या बोलण्यावरून मीराला थोडा अंदाज आला होता. मीराने विचारलं 

"काय झालं ... इतकं नाही कशासाठी सुरु होत." 

"काही नाही ग ,weekend प्लॅन करत आहेत सगळे."

"व्वा मग नाही का म्हणतोयस "

"काही नाही असच. तू येशील का ? "

"अबीर .... मला ......."

"बघ असं आहे तुझं ."

"पण तू जा ना .'

"मग तुझा weekend बोर जाईल "

"चालेल. पण तू असं फ्रेंड्स ना नाराज करू नको."

अबीर फक्त ऐकत होता मीराला आणि त्याच्या कुरापती डोक्यात एक कल्पना आली .

क्रमश :

(अबीर च्या डोक्यात नेमकं वाक्य शिजतंय ते पाहूया पुढच्या भागात )

🎭 Series Post

View all