एका मिरेची गोष्ट भाग १

Meera is a sorted girl and the story is about her journey with her love.

            एका मीरेची गोष्ट... 

'आज उशीर होणार' या विचाराने तिने डोळ्यात एक काजळाची रेघ ओढली, स्वतःला शेवटचं आरशात न्याहाळलं आणि पळत जाऊन रिक्षा पकडली. रिक्षावाल्या काकाला उतरण्याचं ठिकाण सांगत स्वतःला सावरून बसली. 

मीरा,महानगरात राहणारी, स्वतंत्र विचार असलेली मुलगी. प्रत्येक गोष्टींमध्ये स्पष्ट विचार असल्यामुळे तिचा गोंधळ नाही होत तसा. पण आज तिच्या विचारांची गाडी थांबायलाच तयार नव्हती, नेहेमी confident असलेली मीरा आज मात्र nervous होती. डोक्यात असंख्य प्रश्न आणि त्यावर तिची स्वतःचीच असलेली उत्तर, जगभरची उलथापालथ सुरु होती आज. या सगळ्यात तिचा फोने तिसऱ्यांदा वाजला आणि समोरून समीरने प्रश्न विचारला 'आहेस कुठे?' त्याच्या प्रश्नाला उत्तर देत तिने फोने ठेवला आणि उगाचच पण रिक्षातून येणारी वाऱ्याची झुळूक तिच्या चेहऱ्यावर एक स्मित देऊन गेली.

समीर, एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणारा,पंचविशीतला तरुण, मनमिळाऊ पण स्पष्ट, हत्ती ,एक्ससिटेड पण तितकाच बॅलेन्सड. चेहऱ्यावरची क्लीन सामील आणि डोळ्यात ओसंडून वाहणारा खोडकरपणा त्याला इतरांपासून वेगळं बनवतात. मीराच्या भाषेत सांगायचं झालंच तर परफेक्ट टेबले छंगिंग स्किल्स असलेला पण तरीही थोडासा वेडा असा. इतकं सगळं असूनही त्याच्या डोक्यात काय सुरु आहे याचा अंदाज कोणीही घेऊ शकत नाही. 

तर समीर, ठरल्या ठिकाण मीराची गेल्या एका तासापासून वाट बघत होता. मीराची रिक्षा थांबली,तस तिने एकदा स्वतःकडे पाहिलं, रिक्षाचे पैसे देत छान हसू चेहऱ्यावर आणण्याच्या प्रयत्नात रिक्षातून उतरली

समीर आणि मीराची ओळख तशी गमतीच, social media वर कुठल्याश्या कारणाने भेटले, कॉन्टॅक्ट वाढला, नंबर्स exchange झाले, मग कधी what's app कधी कॉल असं बोलणं सूरु झालं आणि त्यातूनच हा भेटण्याचा घाट घातलेला. पण कुठल्याही नवीन व्यक्तीला भेटताना वाटावी त्यापेक्षा जास्त भीती मीराला वाटत होती, भीती की Nervousness नेमकं काय होत ते सांगणं अवघड. 

तो हात उंचावून तिला हाय करत होता, त्याच मोकळं हसू, चेहऱ्यावरची चंचलता आणि आत्ता असलेली कमालीची अस्वस्थता चेहऱ्यावरून कळत होती, डोळ्यात कालच जागरण स्पष्ट दिसत होत पण तरीही त्याच्या presence मध्ये एक energy होती. त्याला समोर पाहिलं आणि मीराच जगच थांबून गेलं, एकीकडे त्याच्या perfume चा सुवास आणि त्याच smile तिच्यावर असा काय परिणाम करत होत कि तिला स्वतःला सावरणं अवघड झालं होत आणि दुसरीकडे त्याला समोर बघून ओळख झाली तेव्हापासून आत्तापर्यंतचा सगळं प्रवास तिच्या नजरेसमोरून जाऊ लागला. 'हाय' तो तिला भानावर आनतं बोलला. तिनेही भानावर येत त्याला प्रतिउत्तर दिल आणि गप्पा सुरु झाल्या, वेगवेगळे विषय, एकमेकांच्या सवयी, आवडीनिवडी आणि बराच काही. त्याच्या प्रत्येक वाक्याला कानात साठवत मीरा त्याला अजून समजून घेण्याचा प्रयत्न करू लागली. संध्याकाळ झाली तशी दोघांचीही पावलं परतीच्या दिशेला निघाली. त्या परतीच्या अख्ख्या प्रवासात मीराच्या डोक्यात तिच्या आवडत्या गाण्यातलं आवडत कडवं घोळत होत 

'शमा कहे परवाने से परे चला जा, 

मेरी तरहा जल जाएगा, 

यहा नहीं आ। 

वो नहीं सुनता, उसको जलाना होता है। 

हर खुशी से हर गम से बेगाना होता है। '

मीरा आणि समीर तिच्या राहण्या च्या ठिकाणी पोहोचले तस तीच स्वतःशीच भांडण सुरु झालं, कारण एका मनाला तिने स्वतःला लिमिट्स घालून घ्यायला पाहिजे होत्या आणि दुसऱ्या मनाला तो निरोप नको होता कारण या नंतर परत भेट होईल कि नाही rather परत भेट होण्याइतकं काही त्यांच्यात आहे का हाच मोठा प्रश्न होता आणि समोर उभ्या असलेल्या समीरचा मात्र या सगळ्याशी काहीही संबंध नव्हता. ' चल बाय भेटू परत' असं म्हणत तो निघाला खरा, पण तो आला का होता त्याच उत्तर मीराला मिळालं नव्हतं. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत ती त्याला नजरेत सामावून घेण्याचा प्रयत्न करत होती आणि मास्तमौला तो मात्र तिच्या जवळ ओढ, हुरहूर आणि असे कित्तेक भाव सोडून पुढच्या प्रवासासाठी निघाला होता...!   

क्रमशः

(P.s. या situation मध्ये मीरा ने काय केले पाहिजे, तुमचे मत नक्की कळवा reviews मध्ये किंवा mail करु शकता gayatri.blog22@gmail.com या  mail id वर) 

🎭 Series Post

View all