एका मीरेची गोष्ट भाग २

Part 2 of meera's dayout

    एका मीरेची गोष्ट भाग २

समीर मीराला सोडून गेला तेव्हा रात्रीचे ७:३० वाजले असतील.रविवार होता तो पुण्यातले रस्ते भरून वाहतात traffic ने असं म्हणलं तरी हरकत नाही.त्या गोंगाटातही मीरा हरवलेली अशी रस्त्याच्या बाजूला उभी होती, विचारात मग्न होती. Roommateच्या कॉल ने मीरा भानावर आली आणि समीर कधीच निघून गेलाय हे लक्षात येऊन ती स्वतःच्याच डोक्याला हात लावत हसली. मीरा रूममध्ये अली तसा तिच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरु झाला आणि तो होणारच होता, कारण सकाळी निघताना लंच पर्येंत येते असं जेव्हा तिने तिच्या roommateला सांगितलं तेव्हा तिची roommate डोळे मिचकवत मीराची गम्मत घेत होssssका असं म्हणाली. त्यावर उगाच पण मिरच्या चेहेऱ्यावर गोड स्मित येऊन गेले आणि तिनी उत्तर दिल "हा means it depends , company चांगली मिळाली तर बघू नाहीतर lunch च्या आधीच टाटा बाय बाय"सकाळच्या dialouge ची आठवण करून देत दोघी मैत्रिणी खूप हसल्या.आणि जेवणे आटोपून झोपण्याची तयारी झाली. असं म्हणतात आपण झोपलो तरी आपला मेंदू मात्र सतत विचार करत असतो, मीरा तरी वेगळी कशी असेल आता ती ह्या विचारात मग्न होती कि तिला भेटून समीरला काय वाटलं असेल.इकडे समीर थकून शांत झोपला होता. या weekend ने संपताना या दोघांना नवीन सुरुवात करून दिली होती.....

        Monday morning .....! ७च्या जवळपास मीराचा फोने वाजला, मीरा अजून झोपेतच होती, डोळे उघडणं पण अवघड होत तिला,तिने नंबर नबघतांच कसाबसा फोन recieve केला समोरून "Good Morning " असा एकदम फ्रेश विष आलं. मीरने झोपेतच "Morning "असा रिप्लाय दिला. तसा समोरून रिप्लाय आला " झोपलीआहेस अजून? उठ यावरून घे, आज ऑफिस आहे, चल उठ बघू " आणि फोन कट झाला. तो Morning कॉल समीर चा होता हे लक्षात येताच मिरची झोपच उडाली, तिने लगेच बेड मधून उठून परत एकदा फोन चेक केला आणि खरंच समीर चा कॉल होता, ते तीच स्वप्न नव्हतं. 

 समीरचा दिवस मिरच्या आधी सुरु झाला होता, आज Monday होता, त्यामुळे दोघेही खूप busy असणार होते .समीर सकाळची lined up असलेली सगळी काम पूर्ण करून bornvita चा ग्लास घेऊन खिडकीत उभा होता . कडक क्रिझ चे फॉर्मल्स,पायात crocodile shoes, trim केलेली beard आणि fremless specs आणि चेहेऱ्यावरचे शांत भाव. कोवळ्या सूर्य प्रकाशात तो जरा जास्तच handsom दिसत होता.समीर ग्लासच्या कडांवर बोट फिरवत विचार करू लागला ,मीरा चा ....!'अशी कशी हि मुलगी, ना काही हट्ट,ना कसल्या अपेक्षा,इतकी साधी, अगदी प्रत्येक टेस्ट मध्ये पास.हे खरंच असं आहे कि मला मीरा आवडली म्हणून मला तस वाटतंय.इतक्यात समीरच्या मित्राने त्याला आवाज दिला आणि त्याची विचारांची chain भंगली. दिवस पुढे सरकत होता, एकेक काम हातावेगळी होत होत आणि मधल्या वेळेत समीरच्या विचारात मीरा डोकावत होती. तीच दिलखुलास हसन, हसताना गालावर पडणारी पुसटशी खळी, आधीच बोलक्या असलेल्या डोळ्यावर रेखीव लावलेलं लिणेर, सगळं सगळं आठवत होत आणि मग अचानक समीर विचारातून बाहेर यायचा आणि स्वतःशीच हसत केसातून हात फिरवायचा आणि परत कामात डोकं घालायचा.मागे एकदा असच whats app वर बोलत असताना, समीर मीरा ला म्हणाला होता,'तू अगदी मला हवी तशी आहेस,मग आपण लग्न करूया का?' त्यावर हसत मीरा म्हणाली होती 'Mr . Smart ,you are not asking me for a coffee date . लग्नासाठी विचारतोयेस, वेडाच आहेस' असं म्हणत' स्वतःशीच हसली होती. तो मिरच्या प्रेमात पडला होता कि नाही माहिती नाही पण त्याला तिचा ennocence भावला होता

इकडे मीराचंही काही वेगळं नव्हतं. समीर सोबतच प्रत्येक क्षण तिच्या मनात घोळत होता.कामाच्या व्यापात भेट नाही पण त्यांचं बोलणं रोज व्हायचं.एकमेकांच्या सवयी आणि secrets share होऊ लागली, समीरच्या cigarrete पासून ते पार्टी मध्ये drinks च्या limit पर्येंत गोष्टी मीराला माहिती व्हायला लागल्या. हि phase दोघांनाही आवडत होती.दोघंही enjoy करत होते. पण... हा पण नेहेमी येतो आयुष्यात आणि सगळी equations च बदलून जातात. एकदिवस मीरा खूप सिरीयस होऊन विचार करत होती. समीर ला सांगू का? कि नको सांगू त्याला काय वाटेल माझ्या बद्दल, will he judge me ? असे कित्तेक प्रश्न तिच्या डोक्यात थैमान घालत होते .त्यात तिने ३ - ४ वेळा type केलेला message सेंड न करताच clear केला.समीर सोबत हि नीट बोलत नव्हती. शेवटी समीरने विचारलंही तिला १ - २ वेळा काही बिनसलंय का पण त्याला नाही असं सांगून मीरा गप्प बसली. दुसऱ्या दिवशी, मीरा ने मनाचा निर्धार करून समीर message केला “See I want to tell you something, please dont judge me on this, but I love you” 

या message वर समीर आधी उडालाच कारण त्याला मीरा कडून इतकं डायरेक्ट confession expect नव्हतंच.पण मीरा अगदीच sorted मुलगी आहे , समजदार आहे आणि मुळात likes आणि love मधला फरक तिला माहिती आहे त्यामुळे ती उगाच काहीही बोलणार नाही. तिला जे वाटलं, जे फील झालं त्याची प्रांजळ कबुली देऊन ती मोकळी झाली होती .मीराचा प्रांजळपण त्याला मनातून आवडला.

पण गोष्टींसोबत वाहवत जाणारा तो हि नव्हता, त्याला गोष्टी इतक्या पटकन व्हायला नको होत्या कारण एक तर मीरा त्याच्या पेक्षा लहान आणि म्हणूनच थोडी अल्लड होती आणि त्याला मीरा सारख्या मुली सोबत timepass करायचा नव्हता, पण मीरा काही misunderstand करण्या आधी situation सांभाळणं त्याला जास्त महत्वाचं होत .

क्रमशः

(पुढे काय होईल मीरा आणि समीरच ,तुम्हाला काय वाटत ते नक्की कंमेंट्स मध्ये सांगाव. तुम्ही तुमच्या comments, views, पाठवू शकता gayatri.blog22@gmail.com या mail वर) 

🎭 Series Post

View all