Login

एकामागून एक रिलेशन बदल़णारे फक्त स्वत:वर प्रेम करतात

लेख
प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमच आमच सेम असतं फक्त
बोललं जात पण बघायला गेलं तर कोण time pass म्हणून  प्रेम करतं तर कोण एकटं राहून बोरं झालं म्हणून प्रेम करत
कोण आपल्याला मित्र रिलेशनशीप मध्ये आहे आपण का असू नये म्हणून दाखवायला प्रेम करतं कोण खरच प्रेम करतं कोण खोट प्रेम करतं कोणाचं प्रेम एकतर्फी असतं तर कोणाचं दोन्ही बाजूनी सेम असतं प्रत्येकांची प्रेमाकडे बघण्याची पद्धत वेगळी असते कोण खोट्या प्रेमाला बळी पडतो तर कोण खर्या प्रेमाला दूर लोटतो...

असंच काहीसं तुमच्या आमच्या आयुष्यात घडत असेल किवा या सगळ्यातून प्रत्येक जन गेला असेल कोणाला प्रेम भेटल असेल ,तर...कोणाला दुख कोण लैला मजनू झाले असतील तर कोण देवदास...

वाटतयं ना थोड फील्मी पण हे खरं आहे बहूतेक हे असचं होत असेल प्रत्येकांचा आयुष्यात

प्रेम अगदी सहज होत नाही आणि एकदा झालंच तर त्यातून माणूस लवकर बाहेर पडत नाही एका मागून एक रिलेशन्स बदलणारी माणसे फक्त स्वतःच्या प्रमात असतात जोपर्यंत त्याच गोड कौतूक होत असतं प्रत्येक हट्ट पुरवला जात असतो तोपर्यंत ही मंडळी त्या नात्यांत आनंदाने राहातात जरा कुठे वर खाली चढ उतार झाले की हे लगेच पळ काढतात म्हणुनच या आशा लोकांमुळे 90टक्के लोकांना त्याच खर प्रेम मिळत नाही कारण समोरची व्यक्ती त्याच्याशी प्रामाणिक वागत नसते

हे प्रेम वगैरे नसतं बर का? याला म्हणतात स्वतःची हौसमौज पुरी करून घेणं आपल्या गरजांसाठी हवी तशी माणसं वापरणं आणि मन भरताच दूर लोटून देणं आशा उथळ गोष्टी करण्यासाठी जिगर नाही लागत अशा लोकांना ,

ही माणसं स्वत:चा फुटकळ इगो ego कुरवाळत असतात चुका घडल्या तरी कधी माफी मागत नसतात समोरच्याने प्रत्येक वेळी माफी मागावी अशी त्याची अपेक्षा असते माफी मागायला लावणारे प्रेम हे खरं कधी नसतं ती व्यक्ती फक्त आपल्याला नतमस्तक करून  स्वत;चा आनंद लूटतं असते मुळात आपण चुकतोय हेच त्यांना मान्य नसतं ही माणसं नात्यांत लपवाछपवी करतात आणि आपल्या जोडीदाराला याची कुणकुण लागली की स्वतःच कांगावा करतात अगदीच डोळ्यात डोळे घालून खोट सुद्धा बोलतात.
नातं तोडून जाताना आशा लोकांना तितका सा त्रास किवा वेदना होत नाही
आशा नाजूक श्रणी ते बरोबर दुसरा आधार शोधतात
एकदा बाहेर पडले की मागे वळून पाहात नाही त्याना फरक पडत नाही कारण? त्याच्यावर प्रेम करणारे मनातून तुटले असतील तरी...कारण ते फक्त स्वत:वर प्रेम करतात आयुष्यभर साथ देण्याची त्याची तयारी नसते वेळेवर पलटी मारून स्वत:ची सुटका करून घेणं त्याना चांगलं जमतं
तुमच्या आमच्या आपल्या सगळ्याच्या आयुष्यात असच घडत असावं असं मला वाटतं असं म्हणतं नाही की सगळेच प्रेम करणारे खोटं प्रेम करतात पण....हे ही तितकच खर आहे की सगळेच खरं प्रेम करतात असही नाही.

आता तर तर इंटरनेट चा वापर करून 
facebook,whatapp, instagram, sherchat,आशा अनेक सोशल साईड वर मैत्री करतात .मैत्रीच रूपातंर प्रेमात आणि फक्त या नात्याला timepss म्हणुन बघतात.मी अस म्हणतं नाही की मुलगी दोषी आहे किवा मुलगाच दोषी आहे या इथे कधी मुलगी बरोबर असते किवा मुलगा प्रत्येकांचा वागण्यावर अवलंबून असते ही परिस्थिती ,

असा एखादाच नशीबवान असेल की ज्याला सोशल साईड वर खरं प्रेम भेटत असेल. ...
काही आहेत जे फक्त प्रेमाचा अपमान करतात...
असं म्हणत नाही की  facebook,whatapp, instagram, sherchat,आशा अनेक सोशल साईड वर मैत्री प्रेम करू नका करा पण कोणतही नातं जोडायचं आहे ते खरं जोडा.जेणे करून प्रेम आणि मैत्री आशा निर्मळ नात्यावरून कोणाचा विश्वास उडणार नाही

कारण जिथे शब्द दिला जातो तिथे विश्वास निर्माण होतो
फक्त स्वत:वर प्रेम करावं पण समोरच्याच पण मन असतं हे ही बघाव

🎭 Series Post

View all