प्रथमतः सर्वांचा मनापासून शतशः ऋणी आहे, माझा पहिलाच लेख आणि इतका मोठा प्रतिसाद दिल्याबद्दल.
आता आपण पुढे पाहू ..
मागून कोणतरी हाक मारण्याच्या आवाजाने दोघेही भानावर आले, इतका उशीर आपण भूतकाळात होतो हे लक्षात आल्यावर दोघेही मनमोकळेपणाने हसले.फार उशीर झाल्यामुळे दोघेही आता रूम कडे जायला निघाले, वैदेही ला पुढे करत ईशान तिच्या मागे जात होता आणि काही काळ जाताच ईशान ने वैदेहीला थांबवलं आणि म्हणाला तशीच थांब मागे वळू नको, आणि मग त्यानं सोनचाफ्याचं फुल तिच्या केसांमधे घातलं, फार सुंदर दिसत होती ती, आधीच ती सुंदर होती त्यात सोनचाफ्याची भर पडली आणि अजून सुंदर आणि मनमोहक दिसू लागली. अनेक स्वप्नांनी भरललेल्या तिच्या डोळ्यात त्याला अनेक जन्मांची ओळख असावी असा तो तिच्याकडे एकटक पाहत होता. हे पाहून ती जरा जास्तच गोड लाजली, तिने मान खाली झुकवली ,तिची हनुवटी वर करत असताना त्याला तिच्या सगळ्या स्त्री सुलभ भावना , आवेश आवेग, तिच्या डोळ्यात दिसत होते, तोही तिच्याकडे बेभान होऊन पाहता होता , तिला अजून जवळ ओढलं, ती लाजत म्हणाली रूम वर जाऊया का फार उशीर होतोय, त्यानं मानेनेच होकार दर्शवला , आणि ते रूम वर निघून आले,
दोघेही दमले होते फ्रेश होऊन मस्त पैकी कॉफीचा आस्वाद घेत गप्पा मारण्याचा मूड होता, ईशान पहिला फ्रेश होऊन वैदेहीची वाट पाहत होता ती बाहेर येताच त्यानं कॉफीचा मग पुढे करत म्हणाला या राणी सरकार हा आपल्यासाठी कॉफीचा मग, तुझं आपलं काहीतरीच म्हणतं वैदेही लाजत म्हणाली मी केली असती की तू कशाला केलीस, राहूदे ग नेहमी तर तूच करत असतेस आज मी केली म्हणून बिघडलं कुठे?? या आणि आशा शब्दांचा ,भावनांचा तिला फार मोठा आधार होता , तो तिला तिचं स्वतंत्र आयुष्य जगायला देतो, स्वतःच मत तिच्यावर लादत नाही,तो तीच स्वतंत्र अस्तित्व मान्य करत होता, तिला तीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य होत,त्याच्याकडे स्त्री दाक्षिण्य आहे याचा तिला फार अभिमान होता. कॉफी संपवता संपवता त्यांच्या गप्पा रंगल्या, ईशान थोडा रोमँटिक होत म्हणाला , मला मुलगी हवीय, तुझ्यासारखी गोड,प्रेमळ,लाघवी. यावर ती म्हणाली मला मुलगा हवाय तुझ्यासारखा कविमनाचा ,संवेदनशील. या अश्या गप्पा रंगत गेल्या , भविष्याबद्दल त्या रात्री त्यांनी खूप काही ठरवलं. रात्र फार झाली होती, झोपी जाण्याआधी वैदेही प्रेमाने म्हणाली
"कधी लयीत बंद होते,कधी मुक्त छंद असते, कळते मी ज्यास त्याला मी काव्य सखी सम दिसते, येण्याची मात्र ठरलेली वेळ नाही, या काव्य सखी समजपणे यमकांचा खेळ नाही, तू आर्जव करिती इतके तरी येईन म्हणते बरका, मज साठी गाशील का रे "सखी मंद झाल्या तारका"
त्यावर त्याच्या चेहऱ्यावर फक्त स्मितहास्य होत, त्यानं तिच्या केसांमधून फार प्रेमाने हात फिरवला , तिच्या माथ्यावर वर ओठ टेकवले, ती गोड हसली, त्याच्या गर्द मिठीत विसावली,आणि दोघेही सुखस्वप्नांत झोपी गेले ते उद्याची सोनेरी पहाट पाहण्यासाठी, .....
समाप्त
धन्यवाद..
शब्दांकन -
सुहास जयवंत गुरव (निळकंठ)
सुहास जयवंत गुरव (निळकंठ)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा