एका चाकावरचा संसार.....

nyc story

रोहित एक चांगला मुलगा.....इंजिनीरिंग केले आणि एका मोठ्या कंपनी मध्ये कामाला होता...सर्व चांगले पण लग्नाच वय झाले तरी मुलगी मिळत नव्हती....त्याच्या घरी त्याचे बाबा आणि तो दोघे रहात होते....अगदी छान होते सर्व....त्याने कळायला लागल्या पासून आईला कधी बघितले नव्हते....आणि त्याचे बाबा एवढे कराचे त्याच्या साठी कि त्याला कधी आठवण झालीच नाही....त्याच्या मनात खूप प्रश्न होते....पण विषय काढला की बाबा गप्प व्हायचे म्हणून त्याने प्रश्न विचारणे बंद केले....शेवटी हो नाही करता करता ऑफिस मध्ये काम करत असलेल्या संदीपची बहीण सारीका सोबत त्याचे प्रेम जमले.तो संदीप च्या घरी अधून मधून जात असे, त्याने तिला विचारले आणि तिने होकार दिल्यावर....बाबांना सांगून मागणी घालायला त्यांच्या घरी गेले....संदीप ची आई बाबांना ओळखत असावी...तिने बाबांना बघितल्यावर साफ़ तोंडावर नकार दिला....

रोहितला काही कळेना....तो तिथे गप्प बसला...पण घरी आल्यावर....परत प्रश्न....

तो म्हणाला, बाबा  आज मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत??? संदीप ची आई तुमच्याशी अशी का वागली??? काय लपवत आहात??? कोण आहे माझी आई आणि मी कोण आहे??? माझ्या आईचा एक पण फोटो नाही इथे.....असे का??? ती का सोडून गेली??

आज सगळ्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत मला??? माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे???
बाबा म्हणतात ऐक, सगळे सांगतो....
संदीप ची आई....म्हणजे कसे सांगूं....मी त्यांची माफी मागेनच...

बाबा आता प्लीज़ सांगा लवकर....
माझे प्रेम होते....सुमन वर...तिची बहिण म्हणजे संदीप ची आई....आमच्या दोघांचे खूप प्रेम होते...आम्ही लग्न करणार होतो....पण त्या आधी मला नोकरी नव्हती त्या शोधात मी फिरत होतो....तीच्या आईला म्हणजे संदीप च्या आईला माहीती होते सर्व....आणि मला ही नोकरी लागली....पण नोकरी आरोग्य खात्या मधील असल्यामुळे सर्व टेस्ट करून मग् फायनल होणाऱ होती....अन त्या टेस्ट करताना रिपोर्ट आला की मी कधीच बाप होऊ शकत नाही...मला सुमन ला फसवायचं नव्हते...पण मी तिला कसे सांगूं मला कळंत नव्हते...शेवटी मी तिला भेटायला बोलवले आणि सर्व खर सांगून टाकले...तिला म्हणालो की तूझा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल....
आणि ती निघून गेली ती परत मला अजूनही भेटली नाही मला, मी ही तिला त्रास नको म्हणून परत कधी संपर्क केला नाही.... रोहित चा चेहरा परत लाल झाला....आणि मी कोण आहे मग???

सांगतो अरे ऐकून घे...तुझी आई म्हणजे माझी बहिण... तुझे आई बाबांचा  accident झाला, बाबा त्यामध्ये गेले, आई कोमात गेली...तुमच्या घरच्या सर्वानी दुर्लक्ष केले...

तुझ्या आजीला माझे लग्न करायचे होते तुझ्या साठी...पण मी प्रत्येक मुलीला तेच सांगितलं....आणि मग् माझे लग्न जमेना झाले..लोकं काही बाही बोलू लागले...म्हणून आम्ही तें घर विकून इकडे लांब राहायला आलो...तू खूप लहान होतास...कळायला लागले आणि मला बाबा म्हणून हाक मारलीस....

म्हणुन मी आणि तुझ्या आजी ने लपवून ठेवले...दत्तक पत्र करून घेतले...आणि एका वर्षात तुझी आई गेली...
तू मोठा होत गेलास आणि मी तुझ्यात गुंतून गेलो....आजी पण गेली तू थोडा मोठा झाल्यावर...आणि मग् हा संसार मी पुढे नेला....एकट्यानं....एका चाकावर संसार हा सगळा....
संदीप च्या आईचा गैरसमज झाला असेल त्यांना वाटत असेल मी फसवलं...पण तसे नाही आहे रे....
रोहित रडू लागला...बाबा मला माफ करा....हे लग्न नाही झाले तरी चालेलं...पण तुम्ही मला हवे आहात...
संदीप च्या घरी जाऊन त्यांनी सर्व सांगितले...आणि माफी मागितली....सुमन पण तिथेच होती तिने लग्न केले नव्हते...
ती त्यानंतर दोन वर्षाने त्यांच्या घरी गेली पण तिला समजले की त्यांनी बाळ लहान असल्यामुळे घर बदलून दुसरीकडे राहायला गेले....त्याच्या कंपनी मधल्या कॉलनी मध्ये त्याच्या बहिणीला सर्व त्याची बायको समजले म्हणून हा गोंधळ झाला...सुमन ला तिथल्या लोकांनी हे पण सांगितलं की त्याची बायको गेली....आणि मुलाला घेऊन तें दुसरीकडे गेले...

आता सर्व खरी गोष्ट समजली आणि शेवट गोड झाला...
आता दोन लग्न होणाऱ होती....आणि जवळचा मुहूर्त काढून ती झाली....आणि एवढे वर्ष एकट्याने ओढत नेलेला संसार खर्या अर्थाने पूर्ण झाला...

शुद्ध लेखनाच्या चुकांसाठी माफी????
अजून लेख वाचत राहण्या साठी मला फॉलो करायला विसरू नका.....
लाइक आणि कंमेंट करत रहा.....
सूचनांचे स्वागत....
????© अनुजा धारिया शेठ....