इतकचं सांगितलं.त्याच्या आवाजावरून काहितरी घडलं आहे. याचा अंदाज आला होता. रोहन अर्जुन विराज सगळे ताबडतोब रिक्षा करून गार्डन मध्ये पोचले. समोरचं दृश्य बघुन त्यांना मोठा धक्का बसला होता. समोर नित्या एका दुसऱ्याच मुलाच्या मिठीत ऊभी होती. अगदी चिटकुन.
त्या मुलाचे दोन मित्र आदित्यला मारत होते. त्याला त्या मुलांनी चांगलचं बूकलला होत. त्याला असं मार खाताना बघून सगळे त्यांच्यांवर तुटून पडले. त्या मुलांना हुसकावून लावले. तर नित्याच्या मित्राने आदित्यला कानाखाली वाजवली.
" नित्या माझी गर्ल फ्रेंड आहे. तिच्या कडे नजर वर करून बघायचं नाही. बघितलं तर डोळे फोडायला कमी करणार नाही."
असं म्हणून नित्याला मिठीत घेऊन तो चालू लागला. आदित्यला चांगलाच मार बसला होता. त्याला दवाखान्यात नेऊन आणलं. औषध उपचार करून सगळे जण हॉस्टेलवर पोहोचले होते. आदित्य तर शून्यात नजर लावून बसला होता.
आज त्या घटनेला घडून चार दिवस उलटून गेले होते.
आज त्या घटनेला घडून चार दिवस उलटून गेले होते.
या दिवसांत समजलं होतं की नित्या चे अजुन दोन बॉय फ्रेंड आहेत. ही गोष्ट आदित्यला सहन झाली नाही. त्याने तिला जाब विचारला. त्याच्या सोबत लॉयल राहायला हवं असं म्हणून चिडला. तिच्याशी भांडला देखील. रागाच्या भरात म्हणाला,
" तु जर मुलांना तुझं खेळणं समजतं असशील तर मी तुझं भांड तूझ्या त्या दोन याऱ्यांच्या समोर फोडेल."
तिने त्याच्या या धमकीचा वापर केला. तिच्या बॉय फ्रेंड ने आणि त्याच्या दोन मित्रांनी आदित्यला चांगलच बडवल होत. त्यामुळे आदित्यचा रडून रडून बेकार हालत झाली होती. एखाद्या लहान मुलाची आवडती वस्तू कोणी तरी तोडली आहे. त्याचं आवडतं खेळणं कोणी तरी मोडून टाकलं आहे. गेला दोन तासांपासून त्याच्या रडण्याचा कार्यक्रम चालू होता.
नित्या तिच्या बॉय फ्रेंड सोबत त्याच्या बाईक वर बसून आदित्यच्या समोर फिरायला निघून गेली होती. तो मुलगा आदित्यला चिडवून नित्याला मिरवत घेऊन बाहेर गेला होता. तेव्हां पासुन आदित्य ने सूर लावला होता. रडण्याचा सूर. तेव्हा पासून ते सगळे त्याला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्याला असं रडताना बघून अर्जुनचा राग वाढत चालला होता. त्याने जोरात टेबल वरची पाण्याची बाटली फेकली. एक अस्सल मराठी शिवी हासडली.
" मी त्या मुलांना सोडणार नाही. त्या दिवशी सुटले. परत एकदा भेटू दे त्यांना दाखवतो या अर्जुनचा इंगा. आद्या ही नित्या कसली चालु मुलगी आहे रे. तुला तर झुलवच शिवाय त्या दोन पोरांना पण फिरवतेय."
" एकदम स्मार्ट पोरगी आहे बघ. तीन तीन पोरांना फिरवते. ऐश करते. आणि हा आदया तिच्या मागे गोंडा घोळत फिरतो. तिने काही मागायचा अवकाश इच्छा पूर्ती करण्यासाठी असणाऱ्या दुता सारखा तिच्या इच्छा पुर्ण करण्यासाठी धडपडतो." त्याच्या या टिपणी सोबत सौरभ ने त्याच्या कडे रागाने बघितलं. सौरभ पण सारखा सारखा त्याच्या गर्ल फ्रेंड वर पैसे खर्च करायचा.त्याच्या या तिखट टिपणीवर आदित्य अधिकच रडू लागला. त्यामुळे अर्जुनचा राग वाढतच होता.
" आदित्य आसा काय रडतो आहेस ? जसं काही आयुष्यातील सगळं काही संपलं आहे. अरे वेड्या अजुन तर आयुष्य पडलं आहे.आयुष्यात किती तरी लोकं येतात आणि जातात. मग काय सारखा सारखा रडत बसणार आहे का ?"
" त्या स्वार्थी मुली साठी स्वतःच परीक्षेचं नुकसान केलं आहेस ते वेगळचं ! "
" मुलींवर विश्वास कसा काय ठेवलास ? ती तुझा खिसा रिकामा करत आहे हे लक्षात आलं नाही का तूझ्या ? "
" आज याच्या कडे माझे नखरे उचलण्याची ताकद आहे तर लगेचच त्यांना त्या पोरातल्या उणिवा जाणवू लागतात."
" हे बघ ते हिंदी सिनेमा मधे दाखवल आहे ना, मुलीच्या प्रकरणात अडकून नाही राहायचं. एक गेली दूसरी येईल." रोहन ने त्याला इश्क सिनेमातल्या हिरोची ॲक्टिंग करुन दाखवली.
" आद्या जे घडलं ते विसरून जा. समज ती तूझ्या साठी देवाने बनवलेली नव्हती. तु तिला विसर तूझ्या करिअर वर लक्ष दे." अर्जुन त्याला समजावत म्हणाला.
" आद्या आधी त्या पोरीला एफ बी वर ब्लॉक कर. तिच्या सोबतचे फोटो डिलीट कर." रोहन ने त्याला सल्ला दिला.
त्या सगळ्यांनी त्याला भरीला घातलं. नित्या शी निगडित असलेल्या वस्तू फोटो सगळे एकत्र करून कचऱ्यात फेकले. जणु काही आदित्यच्या आयुष्यातून तिचं अस्तिव गायब करायचं आहे.
इतक्यात एक ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणारा माणूस आला होता. विराज ने सगळ्यांच्या साठी पिझ्झा कॉल्ड ड्रिंक ऑर्डर केलं होतं. सौरभ ने केक ऑर्डर केला होता.
इतक्यात एक ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणारा माणूस आला होता. विराज ने सगळ्यांच्या साठी पिझ्झा कॉल्ड ड्रिंक ऑर्डर केलं होतं. सौरभ ने केक ऑर्डर केला होता.
" अलेक्सा प्ले ब्रेक साँग " विराज ने अलेक्साला ऑर्डर दिली.
" आदित्य ती तुला आयुष्यातील महत्त्वाचा धडा शिकवायला आली होती. तु तूझ्या धेय्या पासुन दुर झालास तर तुझी अवस्था काय होईल ? आता तुला ठरवायचं आहे चुक झाली हे मान्य करून नव्याने उभं राहायचं की त्या चुकीला कुरवाळत बसायचं ? "
" चल ऊठ. ब्रेक अप झाला तर रडू नको. नव्याने आयुष्याला सुरुवात करायची. त्याचं सेलिब्रेशन करायचं. "
विराज चे शब्द त्याच्या वर जादू करुन गेले. ते सगळे ब्रेक अप साँग वर डान्स करत होते. नव्याने सुरुवात करण्यासाठीं तयार झाले होते. ते सगळे अलेक्साने लावलेल्या ब्रेक अप साँग वर थिरकत होते.
समाप्त
© ® वेदा
कथा आवडल्यास कॉमेंट मध्ये सांगा.
या कथेचा वापर यू ट्यूब किंवा इतर कुठेही आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
तुमचं मत कॉमेंट मध्ये सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा