Login

एका ब्रेकअपची गोष्ट भाग १

एका ब्रेकअपची गोष्ट
आज खोलीतील वातावरण काहीसं सुन्न होत. एक मुलगा रडत होता.त्याच्या सुबकण्याचा आवज येत होता. एक मुलगा कॉट वर बसला होता. दयनीय नजरेने तो त्या मुलाकडे बघत होता. एक मुलगा त्याच्या समोर बसला होता.

त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होता.त्याच्या चेहेऱ्यावर वैतागलेले भाव दिसत होते. एक मुलगा स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. खरं तर त्याचे हात सळसळत होते. त्या रडणाऱ्या मुलाला बुकलून काढण्यासाठी.

" अरे आदित्य आता बास ना. किती रडशील ?"

रोहन आणि सौरभ खुप वेळा पासुन त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. तर अर्जुन जो इतका वेळ शांत होण्याचा प्रयत्न करत होता तो म्हणाला,

" सौरभ याचं रड थांबावं नाही तर मी याला बुकलुन काढेल."

किती बदलला होता आदित्य काही दिवसांपासून. तीन महिन्यांत पूर्वीच आदित्य त्याच्या वडिलांच्या सोबत हॉस्टेल बघायला आला होता. तेव्हा सौरभ आणि आदित्यची पहिल्यांदा भेट झाली होती. दोघं एकाच हॉस्टेल मध्ये राहणार होते. साहजिकच ओळख झाली. आदित्य एक हुशार विद्यार्थी होता. त्याला नीट ची परीक्षा द्यायची होती. त्यामुळें तो क्लासेस साठी पुण्याला आला होता. तर सौरभला लॉ करायचं होत. तर क्लॅट देण्यासाठी तो पुण्याला आला होता. त्या दिवशी आदित्यची अभ्यासातील कल बघून त्याच्याशी मैत्री अधिक घट्ट पकडून ठेवायची असं त्याने पक्क ठरवल होत. आणि त्याने ते जपलं होत.

सुरुवातीला त्याच्या अभ्यासा प्रती असलेली निष्ठा बघून त्याला भिती वाटायची. कारण ही तसचं होत. दिवसभर क्लास नंतर स्टडी मध्ये अभ्यास करून देखील शनिवार रविवार देखील हा पठ्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यात बसलेला आढळत.

या मजल्यावर शेजारची रूम मध्ये अर्जुन आणि सौरभ समोरच्या रूम मध्ये राहायला आले होते. ते दोघं सी ए करत होते. सौरभ हा नावाला अभ्यास करत त्याचा बराचसा वेळ बाहेर बाल्कनी मध्ये बघत बसण्यात जाई. वेळ जाणारं पण का नाही बाहेरच्या बाजूला समोर गर्ल्स रूम होती. गावाकडच्या वातावरणात राहिलेल्या या मुलाला सगळीकडे हिरवळ दिसतं होती. या गल्लीत तीन गर्ल्स हॉस्टेल होती. मोजून दोनच बॉईज हॉस्टेल होती.त्यांच्या नशिबाने एक गर्ल्स हॉस्टेल त्यांच्या हॉस्टेलच्या समोर होत.

वातावरण अगदी प्रसन्न होत. त्याला बघून वाटायचं त्या सगळया गोपिकांच्या मधील हा कृष्णच आहे जणु. शेजारच्या रूम मधील अर्जुन आमच्या चौकडीचा म्होरक्या म्हणजे बॉस होता. तसा एक जण होता ग्रुपचा हिस्सा असून देखील एकटा राहणारा. एकदम गंभीर स्वभावाचा. तो आय ए एस ची तयारी करत होता. आता देखील तो एकटाच कॉट वर बसला होता. समोर सुरू असलेली सर्कस बघत होता. तो म्हणजे विराज, दिसायला अगदी देखणा आणि हुशार.

रोहनला तो त्याच्या लहान भावासारखा समजतं. त्यामुळे रोहन कधी चुकला तर तो हक्काने त्याला ओरडत समजावून सांगत. कधी कधी त्याचं ते प्रेमळ समजावणं म्हणजे आईचे बौद्धिक उपदेशाचे डोस वाटतं. पण मनाने चांगला होता.

रोहन, आदित्य , सौरभ आणि अर्जुन सगळे एकत्र अभ्यासाला बसत.दिवसभर अभ्यास क्लास वगैरे करून थकलेले असल्यावर जरा वेळ बाहेर फिरायला जात.संध्याकाळी फ्रेश होऊन. मस्त पैकी केसांची स्टाईल करून परफ्यूम वगेरे मारुन पुणे फिरायला जातं. क्वचितच कधी तरी विराज त्यांच्या सोबत यायचा.

रोहन आणि सौरभ तर काय शहरातील चमक धमक आणि पोरी बाळी बघत. त्यांना वाटायचं निदान एखादी तरी मुलगी त्याला लाईन देईल ? पण तसं घडत नव्हत. मुली विराज वर लाईन मारायच्या. तो बिचारा लाजून लाल व्हायचा. सौरभला तर एक गर्ल फ्रेंड पण भेटली होती. तो तिचे खुप लाड करायचा. नखरे उचलायचा. तिच्या साठी तर तो एक जादूगार होता. म्हणेल ती इच्छा पुर्ण करणारा. विराज ने त्याला एकदोनदा टोकलं पण होत. पण त्याने सपशेल दुर्लक्ष केले होते.
कधी कधी त्याला गर्ल फ्रेंड भेटली याचा हेवा वाटायचा तर कधी त्याच्या रिकामा होणारा खिसा बघून वाईट वाटायचं.

अशातच एक दिवस सौरभ बाल्कनी मध्ये बसलेला असताना आदित्य त्याला बोलवायला गेला होता. सकाळचे साडे आठ वाजले होते. हॉस्टेल मध्ये नस्ताची वेळ झाली होती. तरी देखील हा हिरो अजुनही बाल्कनी मध्ये उभा होता. त्याची नजर खिळली होती समोर उभ्या असलेल्या सुंदर मुलीवर.

आदित्यला नित्या पहिल्या नजरेतच आवडली, ती मॉडर्न ड्रेस घातलेली सुंदर तरुण मुलगी होती. तिने फिकट निळ्या रंगाची जीन्स आणि त्यावर पांढरा क्रॉप टॉप घातला होता. गळ्यात एक नाजूक चांदीची चेन होती आणि हातात एक स्टाइलिश घड्याळ होतं. तिचे मोकळे, खांद्यांपर्यंत रुळणारे केस आणि चेहऱ्यावर एक गोड हसू यामुळे तिचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं. तिच्या साध्या पण आकर्षक व्यक्तिमत्त्वाने आदित्यचं लक्ष वेधून घेतलं.

आता तो देखील सौरभ सारखा रूम मध्ये कमी आणि बाल्कनीत जास्त वेळ घालवू लागला. तिच्याच विचारात हरवलेला असायचा. त्याला तिच्या वर पहिल्या नजरेतले प्रेम झालं होत. ना त्याला त्याच्या अभ्यासाची काळजी होती ना खाण्या पिण्याची शुद्ध. शेवटी त्याच्यातल्या या घायाळ प्रेमविराला त्याच्या बाकीच्या चौघांना त्याची दया आली. सौरभची गर्ल फ्रेंडची एक मैत्रीण त्या हॉस्टेल मध्ये राहत होती. मग तिच्या मदतीने या चौकडी ने आदित्य आणि नित्या ची भेट घडवून आणली.

आता त्यांच्यात दोन मित्र असे होते ज्यांना त्यांच्या गर्ल फ्रेंडस भेटल्या होत्या. बाकीचे लोक अजून गर्ल फ्रेंड भेटण्याची प्रार्थना करत होते. तर झालं असं की, क्लासेस चालु होऊन पहिली प्रॅक्टिस टेस्ट येणार होती. सगळे जण अभ्यासात बिझी झाले होते. पण आदित्य काही अभ्यासात लक्ष द्यायला तयार नव्हता. त्याला नित्या सोबत फिरण्यात इंटरेस्ट होता. त्याचं क्लास बंक करायचे प्रमाण पण वाढले होते. त्याचा व्हायचा तो परिणाम झालाच. आदित्य प्रॅक्टिस टेस्ट मध्ये फेल झाला.

आता गणपती उत्सव येणार होता. तर सगळे जण आपल्या आपल्या घरी जाणारं होते. पण आदित्यने कोणालाही जाऊ दिले नव्ह्ते. पुण्यातील गणेश उत्सव खुप चांगला आहे. आपण इथच एन्जॉय करू म्हणत सगळे पुण्यातच राहीले. त्यावेळी संधी साधून सगळ्या मित्रांनी सौरभ आणि आदित्यची शाळा घेतली होती. अभ्यास करायला सगळे आलो आहोत. तर अभ्यासा कडे लक्ष दे. इतर गोष्टी करण्यासाठीं आयुष्य पडलं आहे. पण आदित्य नित्या मध्ये गुंतला होता. तो तर वेडा म्हणत होता, वेळ आली तर मेडीकलचं करिअर सोडायचं.

त्याच्या या मतावर सगळ्यांनी डोक्याला हात लावले होते. तो पक्का तिच्या वर लट्टू आहे. हे सगळ्यांना कळून चुकलं होतं. अशातच एक दिवस संध्याकाळी अर्जुन आणि रोहन चहा पीत बसले होते. इतक्यात त्यांच्या एका मित्राचा फोन आला.

" रोहन अर्जुनला आणि बाकीच्यांना घेउन ये. ताबडतोब महाजन गार्डन मध्ये ये."


🎭 Series Post

View all