एका आईच्या मनाची घालमेल भाग २

True love is everything

राधा तयार झाली,छान नटली होती...रमेशने तिच्यासाठी आणलेला ड्रेस तिच्या सौंदर्यात अजूनच भर घालत होता..हलकासा मेकअप ,त्यावर छान केश रचना केली होती....रमेश तर तिला पाहातच बसला....मुद्दामून तिला चिडवू लागला ,"काय मॅडम आज काय ,घायाळ केलेस की."

हे ऐकून राधा हसू लागली.....
रमेश बोलला "मॅडम आता काय क्लीन बोल्ड करता का काय तुमच्या हास्याचा अदाने आम्हाला??

राधा:रमेश काय आपलं तुझं , लहान मुलासारखं ??किती ती ओव्हरएकटिंग चालू आहे...पुरे कर आता...चल निघुयात..

रमेश :काय मी आणि overacting ,नाही हा..एवढी सुंदर माझी बायको आणि तिची तारीफ मी नाही करणार तर कोण करणार.??...


राधा: बरं साहेब ,पुरे झाली हा तारीफ ,निघुया का आता????.......


रमेश: हो राणीसरकार......


दोघेही निघाले......

रमेश ड्राईव्ह करत होता.आणि राधा आपली  window च्या बाहेरील दृश्य बघण्यात गुंग झाली......सिग्नल लागला..बाजूला तिला एका मोटार सायकल वर जोडपं दिसलं आणि त्या बाईच्या हातात एक छोटी दोन वर्षांची  मुलगी होती.....ती राधाकडे पाहत होती....राधा तिला पाहून हसू लागली तर तीसुद्धा राधाला पाहून डोळे मीचकावू लागली.... पाच मिनिटाने सिगनल सुटला.....तरी ती चिमुरडी राधाला मागे वळून पाहतच होती .आणि राधासुद्धा तिला हसवण्याचा प्रयत्न करत होती ....हा खेळ रमेशसुद्धा पाहू लागला.... त्यालाही छान वाटलं...किती दिवसाने राधा मनापासून हसत होती....नाही तर सतत आपली रडावलेला चेहरा करून बसलेली असायची.....

पुढे ते जोडपे गाड्यांच्या गर्दीत दिसेनासे झाले तरी त्या मुलीने दिलेले सुंदर हावभाव आठवून राधा हसत होती.....


रमेशला बोलू लागली....

"रमेश तुला आठवत का रे,जेव्हा मी प्रेग्नेंनेट होते ,तेव्हा तू एका गोंडस मुलीचा फोटो आनला होता....

रमेश:"हो आहे ना लक्षात.....

राधा:तुला माहीत आहे ,ही जी  छोटी मुलगी होती ना  ,अगदी तिच्यासारखीच दिसत होती ती पोस्टारमधली मुलगी......

रमेश: "हो ग,राधा खरंच की....

राधा:खूप छान वाटलं रे ह्या मुलीला पाहून.....का कोणास ठाऊक पण  असं वाटलं की ही आपलीच लेक आहे...कारण सतत पाहत राहायची मी तो पोस्टर..... असं वाटायचं की,आपलं होणार बाळ त्या पोस्टर मधल्या मुलीसारखचं दिसावं.....पण काय  नियतीला मान्य न्हवतं........


राधाचा आवाज जड झाला ,ती शांत बसली.....

रमेशने तीच मन वळवण्यासाठी ,छान संगीत लावलं.. त्याला माहित होतं ,विषय नाही बदलला की ,राधा पुन्हा दुःखी  होईल.....

थोडं पुढे गेल्यावर रस्त्यात गर्दी जमली होती.....कोणाचा तरी अपघात झाला होता......रमेश आणि राधा  गाडीतून खाली उतरले ,नक्की कोणाचा अपघात झाला आहे ते पाहायला .. बघतात तर काय त्याच जोडप्यांचा अपघात झाला होता...नवरा बायको रक्तबंभाळ झाले होते..... ती मुलगी ,आई वडिलांच्या शेजारी बसून जोरजोरात रडत होती..बघ्याची गर्दी जमली होती.......दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली...त्या मुलीने राधाला पाहिले ,तशी ती राधाकडे पळत आली......आणि तिने राधाला मिठी मारली.. राधा  गहिवरली....

त्या मुलीचे वडील वारले होते पण  तिच्या आईचे श्वास चालू होते ,रमेशने लगेच तिच्या आईला  हॉस्पिटलला घेऊन गेला..

काय होते पुढे?त्या मुलीची आई वाचेल ?
क्रमश...


अश्विनी पाखरे ओगले..
लेख आवडल्यास नक्की मला फॉलो करा.. लाईक, शेअर ,कंमेंट नक्की करा....

🎭 Series Post

View all