Nov 23, 2020
सामाजिक

एका आईच्या मनाची घालमेल (भाग १)

Read Later
एका आईच्या मनाची घालमेल (भाग १)

राधा काय गं ,किती वेळ झाला मी बेल वाजवतोय ,शेवटी किल्ली वापरली दार उघडायला...... रमेश बोलत होता तरी तिचं लक्ष न्हवते. 

एकटक पाहत बसली होती ती खिडकीच्या बाहेर..... राकेश तिच्या जवळ गेला आणि बोलला "राणी सरकार कुठे आहात,मी तुमच्याशी बोलतो आहे."

राधाचे डोळे पाणावले होते,राधाने नजर दुसरीकडे वळवली.. राकेशने पाहिले ते... "काय झालं??का रडते आहेस????

राधा:"काही नाही राकेश,असंच भूतकाळ आठवला"....नको त्या आठवणी...मनाला त्रास देणाऱ्या".....किती जरी केलं तरी विसरता येत नाही....पाच  वर्षे झाली,पण तरीही असं वाटत काल परवा घडला आहे तो प्रसंग .....त्या दिवशी मिसकेरेज झालं नसते तर कदाचीत आज आपलं बाळ अपल्याबरोबर असते ना????

राकेश: "राधा, किती अजुन त्रास करून घेणार आहेस????रडतच राहणार का तू अशी??आपल्या नशीबात न्हवतं असा विचार कर.....जे आहे त्याचा विचार कर....


राधा: नाही रे राकेश तुला नाही कळणार, आतून तुटून गेली आहे त्यादिवसापासून ,ना कोणाशी बोलू वाटत ना पाहिल्यासारखं आयुष्य राहिले आहे....कधी लहान बाळ पाहिलं ना ,की मला आपल्या बाळाची आठवण येते....गेलेल्या.... का असा देव कठोर??माणसांनी फक्त  देवाच्या त्याच्या इशाऱ्यावर  जगायचे का???मनाला किती त्रास होतो हे देवाला कळतं नसावे का??

राकेश : राधा..आपल्या हातात आहे का ,निसर्गाच्या विरुद्ध मार्गक्रमण करणे.....ही दुःख भोगल्याशिवाय ,सुख तरी कशी येणार सांग ना???

राधा: पण किती,किती दिवस हे सर्व ....एक क्षण सुद्धा असा जात नाही,की तो विचार मनातून जाता जात नाही...एकाएकी रडु येतं.. धीर खचतो.....असं वाटतं  की, हे जीवनच नको..ज्याच्यात काहीच रस नाही...उगाच श्वास चालू आहे म्हणून जगायचे??......

राकेश : काय राधा ,तू कशी होती ?काय विचार करते  आहेस????अगदी जीवनच नको का तुला आता??आणि माझा विचार नाही का तुला करावासा वाटत..?मी तुला पाहून जगतो, खुश राहतो... आपणच आपल्या दुःखाला वारंवार चघळत बसलो तर ,ते दुःख कमी नाही उलट वाढत जाणार.....जे आहे त्याचा स्वीकार कर आणि पुढे आयुष्य जग.....

ज्याचं दुःख त्याने कमी करावे... जोपर्यंत त्याच विचारात राहशील तोवर फक्त त्रास होईल..आणि आपल्यासारखी किती तरी जोडपी आहेत ,जे ह्या सुखापासून वंचित राहतात... पण जगतात ना आयुष्य, बघ कोणाचं कोणाच्या वाचून अडत नाही....ज्याने त्याने स्वतःला सावरलं पाहिजे..भुतकाळातल्या जखमा तेव्हाच भारतील जेव्हा तू त्याला कुरवाळण सोडुन देशील.... मन दुसरीकडे वळव...इतरही गोष्टी आहेत की, आयुष्यात त्यांच्याकडे पहा.....

राधा: बोलणं सोप्प आहे राकेश, करणे अवघड.....

राकेश: हो ना,अवघड आहे पण अशक्य नाही हे लक्षात ठेव..हे जेव्हा तू शक्य करशील ना,तेव्हाच  तू आयुष्य जगशील...प्रयत्न केला की ,परमेश्वर सापडतो...., बरं ऐक उद्या ,आपल्याला माझ्या बॉसने लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी ठेवली आहे ,तिथे जायचे आहे......लक्षात राहू दे.....

राधा: नको रे राकेश ,माझी नाही इच्छा... तू जाऊन ये.....

राकेश: हे बघ,प्रत्येकवेळी असेच असते तुझे,काही नाही  उद्या यायचे  आहेस तू माझ्याबरोबर . ..मी ह्यावेळी तुझे काहीच  ऐकणार नाही राधा .....प्रत्येकवेळी एकटी राहते आणि पुन्हा विचारांमध्ये सतत गुंग राहते.आणि स्वतःला त्रास करून घेते...

राकेशने छान ड्रेस आणला होता तिला..... तिचा आवडता रंग ,गुलाबी.. आणि त्यावर छान झुमके आणले होते,उद्या पार्टी साठी जायचे होते म्हणून..राधाने  स्वतःचे डोके अलगद राकेशच्या खांद्यावर ठेवले.... आणि पुन्हा डोळे अश्रूंनी भरले...शांतता होती आणि राधाचे हुंदके  घुमत होते....


एक आई जणू तळमळत होती, निघून गेलेल्या बाळासाठी...... त्याची  सतत आठवण  येत होती,पण ते बाळ न्हवते येणार.....
क्रमश..

अश्विनी पाखरे ओगले..
लेख आवडल्यास लाईक ,शेअर ,कंमेंट करा.....
साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे...

Circle Image

अश्विनी पाखरे ओगले

Blogger

Love life Enjoying every second of life Now enjoying as a blogger ✍️ Love to share my experience through writing and touch the soul through writing from❤️ Finding me in new way..