Login

एका आईच्या मनाची घालमेल भाग 3

True love means everything

राधा त्या मुलीला घट्ट पकडून होती, राधाच्या पायाखालची जमीन सरकली होती..त्या मुलीला पाहून ,राधाचे अश्रू अनावर झाले..त्या इवल्याश्या जीवाला कल्पना अजिबात नव्हती, की तिच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवले आहे.....

त्या मुलीच्या आईचीही परिस्थिती नाजूक होती,डोक्याला जबर मार लागला होता.... उपचार सुरू झाले.. राधा देवाकडे प्रार्थना करू लागली,तिची आई बरी होऊ दे....खरं तर राधा आणि त्या मुलीचा कसलाही संबंध न्हवता.. पण माणुसकीच्या नात्याने राधा ,रमेश दोघेही धावले होते....

थोड्या वेळाने डॉक्टरांनी तिला, रमेशला बोलावले ,त्या मुलीची आई कोमात गेली होती, ती मुलगी आईला पाहताच तिच्याकडे पळत गेली,तिला उठवू लागली,"आई,उठ उठ मला घे"मला भूक लागली"..ते दृश्य पाहुन सर्वांचे डोळे पाणावले, त्या लहानग्या जीवाला काहीही कळत न्हवते.....ती आईला मुके घेऊ लागली आणि बिलगली......


राधा रमेश दोघे सुन्न झाले होते.....सर्वच विचित्र घडले होते..... थोड्या वेळाने एक  वयस्कर बाई जोरजोरात रडत आली...आणि त्या मुलीला घेऊन रडु लागली...

"गेला गं  गेला,माझा लेक मला सोडून गेला,माझं पोरगं गेलं,......देवा का केलंस असं ??.,का घेतलंस माझ्या मुलाला हिरावून......काय पाप केलं होतं मी ,काय पाप केलं होतं.....?.
असे बोलून ती स्वतःच ,तोंड झोडून घेऊ लागली. लालेलाल गाल झाले होते ..अचानक ती , चक्कर येऊन पडली.

थोड्या वेळाने शुद्धीवर आली......पुन्हा रडु लागली.....त्या माऊलीच्या  आक्रोशाने सर्वांचे डोळे पाणावले.. राधाला तर काहीच सुचत न्हवते....

ती मुलगी आजीकडे गेली आणि विचारू लागली "बाबा कुठे आजी???बाबा पाहिजे....

ती माऊली निशब्द झाली आणि नातीला घेऊन मोठमोठ्याने रडु लागली...ती मुलगी घाबरली होती.,तीसुद्धा आजीला रडताना पाहून स्वतः रडु लागली..तिच्या इवल्याश्या हातानेच रडत रडत डोळे पुसू लागली...

हृदयला कंप सुटावा असा तो प्रसंग होता...ना तिचे बाबा येणार होते ना त्या आईचा मुलगा..ज्याने नेहमीसाठी जगाला निरोप दिला होता.खूप मोठा आधार निघून गेला होता.....

राधाने त्या आजीला पाणी दिले,त्यांच्या बाजूला बसली.......ती आजी राधाला सांगू लागली..


"पोरी,माझा एकुलता एक मुलगा होता,पोटाला चिमटा काढून कसंबसं त्याला वाढवलं होतं.. माझं पोरगंच माझा आधार होता...कसंबसं दोन घास त्यांच्यामुळे भेटायचे...कसं व्हायचं माझ्या नातीचे, माझ्या सुनेचं... कसं व्हायचं????कसं दुःख पचवू ..??

राधाने त्या आजीच्या पाठीवर हात ठेवला...कसंबसं राधा स्वतःलाच आवरत होती.... तीचीसुद्धा घालमेल होत होती..

आज राधाला स्वतःच मूल नसल्याचे  दुःख त्या आजीच्या दुखासमोर नगण्य वाटत होते..त्या आजीने उतारवयात आपला मुलगा गमावला होता....


रात्र कधी झाली कळलं नाही....रमेश आणि राधा होस्पिटलमधून  निघत होते ,तेव्हा त्या मुलीने राधाची ओढणी घट्ट पकडली......ती नको जाऊ बोलत होती राधाला.....त्या मुलीची आजी आली आणि मुलीला समजावले...... तरीही ती मुलगी रडत होती..

राधाने तिला मी पुन्हा उद्या येईल तुला भेटायला म्हणाली......

तसं ती मुलगी रडायची थांबली....


राधा जेव्हा घरी आली तेव्हा ती ,रमेशला घट्ट पकडून रडु लागली.... 

राधा रोज रडायची, मुल होत न्हवतं म्हणून, पण आजचा प्रसंग तिला सांगून गेला ,तिच्यापेक्षाही खूप लोक आहेत जे खूप दुःखी आहे,खूप त्रासलेले आहेत.....आज राधा स्वतःला नशिबवान समजू लागली, कमीत कमी हक्काचा ,प्रेम करणारा नवरा तरी आहे....ह्यापेक्षा अजून काय हवं आयुष्यात..??. तिला जाणीव झाली संपूर्ण असल्याची.....
क्रमशः


अश्विनी पाखरे ओगले.
लेख आवडल्यास लाईक, शेअर, कंमेंट करा... नक्की फॉलो करा..

🎭 Series Post

View all