एका आईची आर्त हाक....

Mala mazya balala ekda baghu dya Please ekda baghu dya...

एका आईची आर्त हाक...

मला माझ्या बाळाला एकदा बघू द्या......

प्लीज एकदा बघू द्या....

ही आर्त हाक एका आईची होती, ती पोलिसांना विनवणी करत होती ,त्यांच्या हातापाया जोडत होती....रडून रडून बेहाल झाली होती....., डोळ्यातली अश्रू आटत होते पण पोलिसांच्या हृदयाला पाझर फुटला नाही,

on duty, त्यांचा ही नाईलाज होता....

असे काय झाले की ती आई आपल्या बाळाला बघण्यासाठी आतुरली होती, अहम्मम्म बाळाला नाही मृत बाळाला, तिला एकदा आपल्या मृत बाळाला बघायचं होत....
     

आई होणं हा स्त्रीच्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय क्षण असतो, एका आईचा दुसरा जन्म असतो....   तो इवलासा जीव जेव्हा या जगात येतो, त्याच्या इवल्याश्या हातांनी जेव्हा आईला स्पर्श करतो..आईला तर आकाश ढेंगणे झाल्यासारखे वाटते, सगळं जग मुठीत सामावल्यासारखं वाटत,पण जेव्हा मुठीतुन  तेच निसटत ना तो त्रास असह्य असतो...

या आईची आर्त हाक ,हाकच राहिली, कुणाच्या कानापर्यंत पोहचलीच नाही.....

आपलं बाळ काचेच्या पेटीत सुरक्षित आहे या वेड्या आशेने तिने डोळे मिटले, आणि आपल्या गोड बाळासोबतचे स्वप्न रंगवू लागली,  अचानक डोळे उघडले ते आजूबाजूच्या ओरडण्याने ....

ज्या वॉर्डात तीच बाळ ठेवलं होतं त्या वॉर्डाला आग लागलेली होती, आणि त्या आगीच्या धुरात तीच बाळ गुदमरून मरण पावल होत....पाच दिवसाच ते बाळ जग बघायच्या आतच जग सोडून गेल..... त्या आईने हंबरडा फोडला.....पण त्याचा काहीच उपयोग नाही, तिचे अश्रू देवाला दिसले नाही की त्याच्या हृदयाला पाझर फुटलं नाही....

लग्नाच्या दहा वर्षानंतर तिच्या घरी कृष्णाने जन्म घेतला होता....पण तेही तिच्या नशिबात नव्हतं..... हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी परस्पर अंतिम संस्कार केले, त्या आईला तिच्या बाळाला शेवटचं बघताही आले नाही, एका स्त्रीसाठी यापेक्षा मोठं दुर्देव्य नाही.....