Login

एक वार

स्लीप वॉकींगच्या आजाराने एका मुलाचे आयुष्य कसे उद्धवस्त केलं ह्याची एक काल्पनीक कथा


विषय :आभास


आज तो पार्टीतुन जरा उशिराच आला होता. नशेचा अंमलही होताच त्याच्यावर ..ऑफिसचेही टेशंन होते त्याला... त्याने घराची लॅच हळुच उघडली आणि बेडरूममध्ये जाउन बसला ,कपडे बदलुन झोपणार इतक्यात कुठुनतरी खटखट असा आवाज येत होता.


कोण असेल आता ह्या वेळी .अचानक डोक्यात चोरी , खुनाच्या विविध घटना आठवल्या.शरीर थंड पडले आणि कपाळावर घाम जमा झाला.

मग तो किचनमध्ये पाण्याची बाटली आणण्याकरता गेला ,पुन्हां त्याच आवाजाने त्याचे लक्ष विचलित केले. त्याने मग हातात चाकु घेतला आणि तो दुसऱ्या बेडरूममध्ये आवाजाच्या दिशेने गेला.


तिथे त्याला बाल्कनीत कोणतरी उभे दिसले पाठमोरे .त्याने त्याचा हातातील चाकु दाखवत पुढे यायला सांगितले पण तो माणुस हलला नाही.


आपण धमकी देवुन जर हा हलत नाही तर हा नक्कीच मला मारेल त्यापेक्षा मीच वार करतो ह्या विचाराने त्याने पाठमोऱ्या त्या माणसावर वार केला.


अचानक एक किंकाळी ऐकु आली ,पण काहीच प्रतिसाद नाही आला म्हणुन चोर जखमी होउन पळाला असेल,असे समजुन तो पुन्हां झोपायला गेला.


काही घातपात तर नाही झाला तरी पोलीसांना सकाळी बोलवु. पोलीसांना आता बोलवले तर बाबांची झोपमोड होइल म्हणुन नकोच ,ह्या विचाराने तो पुन्हा झोपायला गेला.


काही वेळाने त्याला दचकुन जाग आली . " देवा !  हे कसले  भयानक स्वप्न बघितले मी ."अस म्हणत चेहऱ्यावरचा घाम पुसणार तितक्यात त्याने स्वत:चा हात बघितले तर त्याचे हात रक्ताने माखलेले होते .


तो बुचकळ्यात पडलेला होता, हे रक्त आले कुठुन,तरी तो जास्त विचार न करता वडिलांच्या काळजीपोटी त्यांना शोधत त्यांच्या रूम मध्ये गेला .त्याचे वडिल रक्ताच्या थारोळ्यात होते पडलेले होते.त्याने लगेच एम्बुलेंस बोलवली आणि वडिलांना हॉस्पिटलकडे नेलं.


प्रत्यक्षात त्याचे वडिल उभे होते बाल्कनीत . त्याला वडिलांची किंकाळी ओळखताच आली नाही .त्यांनीही त्याच्या हाकेला  काही प्रतिसाद दिला नाही कारण ते वयोमानानुसार कर्णबधीर  झाले होते. आधीच असलेल टेशंन आणि त्यात दुर्लक्षित आजार ह्यामुळे  चोर आले असतील ह्या आभासने त्याने  हातातील चाकूने त्याच्या वडिलांवर वार केला आणि स्वःताच्या बाबांना जखमी केल होतं .


त्याच्या स्लीप वॉकिंगच्या आजाराने त्याचा नि त्याच्या वडीलांचा घात केला होता.

0