Jan 23, 2022
वैचारिक

एक ट्रेक.......कधी न झालेला

Read Later
एक ट्रेक.......कधी न झालेला

खरंतर हा असा प्रसंग प्रत्येक ग्रुप बरोबर कधी ना कधी घडतोच.एखादा तरी अवली असतोच ज्याची माशी प्रत्येक वेळी शिंकते.असाच एक धमाल किस्सा एका न झालेल्या ट्रेक चा

खरं तर आता आम्ही सगळे मित्र भरपूर पुढे आलो आहोत आयुष्यात .पण म्हणतात ना men  will be men त्यामुळे आत सतत एक कीडा वळवळतो. जुने बॅचलर दिवस एन्जॉय करायचा.आम्ही म्हणजे मी स्वतः परशा ,सच्या संत्या,शऱ्या,गण्या आणि चंद्या.

नाव चुकली नाहीत बरोबर आहेत.आम्ही अजून डॅशिंग आणि यो यो कूल आहोत.तर आता मूळ मुद्द्यावर येतो.एका गुरुवारी आमच्या सिक्रेट ग्रुपवर मॅसेज आला.यार खूप दिवस झाले आपण फिरायला गेलो नाही.एक शॉर्ट ट्रेक तो बनता है।

खरंय रे निसर्गाचा आनंद घ्यायला हवा,इति शऱ्या उर्फ शरद.लगेच धडाधड मॅसेज चा पाऊस पडायला लागला.एवढ्यात सच्या ने नावाप्रमाणे सिक्सर मारला,"पण जायचं कुठं भावानो!

"बास का??कोकणात जाऊ जाम मासे बिसे हाणू",नाव गण्या पण पक्का मांसाहारी.माझं टाळकच सरकल लगेच ढीगभर लाल तोंडाच्या ईमोजी सेंडवल्या ग्रुपला.आपण पक्के शाकाहारी बाबा.एवढ्यात संत्या जागा झाला,"फार लांब नको रे,जवळच जाऊ कुठं तरी".चंदू ने लगेच अंगठा उमटवला.अशी गरम चर्चा चालू होती.शेवटी एकदाच ठिकाण पक्क झालं ,"राजगड,लगेच आस्मादिकांच्या अंगात मावळे संचारले.सर्वांनी आपापल्या घरी जाहीर केलं ,"या रविवारी आम्ही राजगड ला जाणार.

एवढ्यात माझ्या कानात फिस्स्स असं हसू आलं.मी फोन मधून डोकं बाहेर काढलं तर बायको हसत होती.आता अश्या प्लॅन वर कुत्सित हसणं बायकोचा जन्मसिद्ध अधिकारच ना.वर पुढे म्हणाली,"खरच जाताय ना!नाहीतर मागच्या सारखं व्हायचं.आमचे अनेक फसलेले प्लॅन आठवून ती हसायला लागली.मी मात्र साफ दुर्लक्ष केलं.ट्रेकिंग शुज चमकवले, मस्त ड्रेस शोधला ,बरोबर घ्यायचा स्टॉक हा .....शब्दशः नाही हा स्टॉक म्हणजे खाऊ .तसा आमचा ग्रुप पापभिरू आहे☺️☺️☺️

मोहिमेची सगळी तयारी झाली शनिवारी रात्री गाड्यांचे नियोजन झाले सगळे खुशीत बडबडत होते.रात्री किल्ले राजगडाची स्वप्न पहातच झोपलो.पहाटे चार ला जाग आली.सहज मोबाईल ऑन केला, पहाटे चार ला संत्याचा मॅसेज,"sorry guys मला बरं वाटत नाहीय, मी नाही येऊ शकत आणि अजिंक्य माझ्या बरोबर आहे.????????????

संत्या ला शिव्या हासडत फोन उचलला,"पहाटे चार वाजता गण्याचा नंबर फिरवला ,"पशा यार आताशी 4 वाजले,मी येतो वेळेवर.गण्या जाणार कसा आहेस ??अज्या गाडी घेऊन संत्याला  दवाखान्यात घेऊन गेलाय. गण्या खडबडून जागा झाला ,"संत्याला झालं काय पण???आता मात्र मी जॅम चिडलो एवढ्यात शऱ्या वेटिंग ला दिसला त्याला ऍड केलं,"त्याने लगेच दोस्तीची टेप लावली ,संत्या नाही तर जायला मजा नाही रे ?? शऱ्या खरं कारण सांग!!!अरे सासूबाई येतायत आज......पुढे भयाण शांतता

पुढच्या दोन तासात ट्रेक ची वाट लागली .डोकं दुखायला लागलं.सहा वाजता झोपलो ते नऊ ला उठलो.बायको गालात हसत म्हणाली,"राजे !!चहा घेणार ना? गप उठलो आणि अंघोळीला गेलो .बायको मात्र साळसूदपणे म्हणाली,"जास्त आजारी आहेत का संतोष भाऊजी!थांबा मी वहिनींना फोन लावते.

अय्या!!बायको फोनवरच किंचाळली.फोन स्पिकरवर गेला.अगं, मी सांगत होते काल नका खाऊ आईस्क्रीम सायनस चा त्रास होईल".पण बायकोच काय ऐकायच ना! ट्रिप च्या आनंदात चार आईस्क्रीम खाल्ल्या,मग क्काय सक्काळी अडकला ना श्वास नाकात.लगेच बायको म्हणाली,"आता बरे आहेत का?हो ग आता एकदम ओके!ऐक ना आता हे सगळे घरीच आहेत तर आपण जाऊ या ना मॉल मध्ये मस्त सेल लागलाय.डन मी लगेच आपल्या ग्रुप ला कळवते हा...

अशा रीतीने राजगडावर निघालेले सर्व मावळे आता मॉल मध्ये पिशव्या सांभाळत फिरत होते आणि राजगड वर सुरु झालेला ट्रेक मॉल मधेय संपला होता....

कथा पूर्णपणे काल्पनिक

लेखक प्रशांत कुंजीर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Kunjir Prashant Vishwanath

Primary Teacher

Primary Teacher In Z P Pune