Login

एक स्त्री म्हणून जगताना...4

स्त्री जन्माविषयी
नवऱ्या मुलाला ना नवरीशी भेटण्याची ओढ होती ,ना बोलण्याची. सगळ्यांनाच ही गोष्ट खटकत होती, पण त्यांना वाटलं की असेल मुलगा जरा जुन्या वळणाचा.लग्न झालं की होईल सगळं ठीक.असं करत करत दिवस निघून गेले आणि त्या दोघांचं लग्न पार पडल. लग्न झालं ,स्मिताने लक्ष्मीच्या पावलांनी सासरी गृह प्रवेश केला. तिच्या मनात नवीन संसाराविषयी, नवीन नवऱ्या विषयी फार उत्सुकता होती. लग्नाआधी तर ती तासंतास राजा राणीच्या संसाराच्या स्वप्नात रंगून जात असे. कधीही आई-वडिलांचे प्रेम न मिळालेली, सुखी संसार डोळ्याने न बघितलेली मुलगी तिच्या आनंदी संसाराचे स्वप्न बघत असे. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य असत,हेच खरं!! लग्नानंतर हळूहळू तिला सगळ्या गोष्टींचा उलगडा होऊ लागला,नवऱ्याची नोकरी नावापुरती होती.खरंतर तो वेगळ्याच विश्वात रमणारा होता.त्याच्या कोणी आप्तेष्टांनी त्याच्या डोक्यात गुप्तधनकाळी जादू ,पैशांचा पाऊस अशा कल्पना भरलेल्या होत्या आणि यातूनच तो लोकांची फसवणूक करत असे. कोणाकडे हजार, कोणाकडे दोन हजार उसने मागत असे, नंतर तोंड लपवत फिरत असे. तिला बरेचदा तसा अनुभव आला. कोणी देणेकरी दारासमोर आला की हा तिला पुढे करतो आणि स्वतः मात्र तोंड लपवून बसतो.तिने ही गोष्ट अर्थातच तिच्या आत्याला सांगितली. आत्या तिला तिच्या घरी घेऊन आली. पण तिच्या बापाने आत्याकडेच येऊन तमाशा केला.आत्याला म्हणाला तू माझ्या पोरीचा संसार मोडायला निघालीस. तुला तिचा सुख बघवत नाही.तू जशी आयुष्यभर एकटी राहिली, तशी तू तिला पण ठेवायला बघतेस. माझ्या मुलीच्या संसारात बोलण्याचा तुझा काही एक अधिकार नाही.आत्याचा नाईलाज झाला. आत्याने तिला परत पाठवल. हा जगावेगळा विरोधाभास मुलीलाही सतत जाणवत होता. माझी कधीच कुठल्याच प्रकारची काळजी न करणारा बाप आज इतका कसा प्रेम उतू घालतोय आणि तेही अशा व्यक्ती प्रति जो की पूर्णपणे चुकीचा आहे. स्मिताने या गोष्टीचा शोध घ्यायचा ठरवला आणि जे तिला समजलं ते एक भयाण वास्तव होतं.तिच्या बापाने तुला विकलं होतं. तिच्या नवऱ्याला कोणीतरी सल्ला दिला होता,की तुझ्या अंगाला जोपर्यंत हळद लागत नाही, तोपर्यंत तुझ्या हातून कुठलेही विधी सकारात्मक फळ देणार नाही.या हव्यासापोटी तिच्या नवऱ्याने तिला तिच्या बापाकडून विकत घेतलं .झालं !!!तिला वाटत होतं ,धरतीने मला कुशीत सामावून घ्यावे ,पण त्या क्षणी तिला जाणीव झाली की आता खूप उशीर झाला आहे. कारण तिच्या पोटात त्याचा अंकुर वाढत होता .निसर्गचक्राप्रमाणे नऊ महिन्यांनी तिनेही एका मुलीला जन्म दिला. मुलीचा जन्म तिला जगण्याची नवी उमेद देऊन गेला .कारण तिच्या डोळ्यासमोर तिचा भूतकाळ उभा होता. तिला तिच्या आईच्या जागी उभं राहून तिच्या बाळाला स्वतःपासून दूर करायच नव्हत. त्यासाठी ती जिद्दीने पेटून उठली आणि जे मिळेल ते काम करून तीच व मुलीचे संगोपन करू लागली. नवरा अजूनही होता तसाच होता, कधी पिऊनच येई, कधी मारहाणच करे ,कधी पैसे मागे ,कधी तिच्यावर खूप अत्याचार करे,ती सार सोसत होती आणि आपल्या मुलीला पाहून पुन्हा उभी राहते. निसर्गाने परत एकदा त्याचं काम केलं होतं तिला दुसऱ्यांदा आई होण्याची चाहूल लागली होती. ती खूप आनंदी झाली,तिने ही बातमी तिच्या नवऱ्याला सांगितली,पण तो ढिम्म हलला नाही. अगदी जसा होता तसाच गूढ, विचारांमध्ये गाढ हरवलेला, यथावकाश तिचा दुसर बाळंतपण पार पडलं.या वेळेला मुलगा झाला.थोडा का होईना तोही आनंदी झाला, पण त्याच्या स्वभावात मात्र फरक पडला नाही.या सार्यात तिची आत्या अधे मध्ये येत होती,विचारपूस करत होती, तिला नेत होती ,नातवंडांचा कोड कौतुक करत होती ,आत्याने एक शेवटचा पर्याय म्हणून त्याला पंचमंडळींसमोर समजावून पाहिलं ,की आता पदरात दोन लेकरं आहेत .सुखी संसार करायचा असेल, तर कामधंद्याला लागायला हव. त्यानेही मोठ्या लोकांच्या दबावामुळे का होईना,सर्वांसमोर ते मान्य केले, आणि एका छोट्याशा कंपनीत तो एका नोकरीला लागला. तीही दिवस दिवसभर राबते आहे ,तोही काम करतो आहे ,तरी संसाराला काही गती येत नव्हती, कारण तो कमवत तर होता पण गमावण्याचे दहा रस्ते त्याच्याकडे तयार होते. तिनेही आता त्याच्या मदतीची आशा सोडून दिली होती. ती आणि तिची लेकरं एवढंच तिचं विश्व होतं.
0

🎭 Series Post

View all