Login

एक सोन्याचा पिंजरा भाग 9

राजेंद्र आणखी फसेल का? हिराचंदचे रहस्य काय असेल?

एक सोन्याचा पिंजरा भाग 9
मागील भागात आपण पाहिले की पिंटो वर जीवघेणा हल्ला झाला. हिराचंद दमानिया आणि पवनकुमार यांच्यात काहीतरी आहे इथवर शरद पोहोचला होता. इकडे राजेंद्रकुमार त्याला असलेल्या ग्लॅमर आणि प्रसिद्धीच्या नशेसाठी दलदलीत उतरायला तयार झाला. आता पाहूया पुढे.


मी अतिशय बैचेन होतो. पिंटो वाचेल का? हा प्रश्न सतत मनात घोळत होता. काहीही करून मला मुंबईत जायला हवे. मनाशी निर्धार करून मी राजेंद्रकुमार आणि सुधांशू यांना माझा निर्णय सांगायला निघालो.

तेवढ्यात राजेंद्र स्वतः आले,"अक्षय आपण मुंबईत जातोय."

त्यांचा निर्णय ऐकून मी जोरात ओरडलो,"काय?"

राजेंद्र शांतपणे म्हणाले,"मला ओळखणारी पिढी आता खूप पुढे गेली आहे. माझ्यात बरेच बदल झालेत. आता मला कोणी ओळखणार नाही. पिंटोला माझी गरज आहे."


आम्ही तिघे निघालो. निघताना राजेंद्रचा संपूर्ण लूक बदलला होता.

सुधांशू म्हणाला,"चला आता लवकर. रात्री प्रवास करणे सुरक्षित राहील."


रात्रीच्या अंधारात पुन्हा मुंबई नावाच्या मायानगरीकडे परत येताना राजेंद्र म्हणाले,"चाळीस वर्षांपू्वी एक तरुण,देखणा आणि हुशार मुलगा आपले जगप्रसिद्ध व्हायचे वेड घेऊन आला होता इथे. आज पुन्हा तिथे जाताना मात्र तो प्रकाशाचा झोत नको वाटतोय."


हाच धागा पकडून मी म्हणालो,"सर,पुढे काय झाले? तुम्ही निर्मात्याने बोलावले तिथे पोहोचलात."


राजेंद्र खिन्न हसत म्हणाला,"माझ्या प्रसिद्धीच्या नशेने सद्सद्विवेकबुद्धीवर मात केली. दरवाजा उघडून मी आत गेलो. संपूर्ण दिवाणखान्यात मेणबत्त्या जळत होत्या. मंद प्रकशात तो समोर आला. त्याने मला जवळ ओढले आणि म्हणाला,"आजची रात्र तुझे भविष्य ठरवणार आहे."


बस एवढे ऐकले आणि मी स्वतः ला झोकून दिले. रात्रभर तो मला उपभोगत होता. खाजगी जीवनात स्त्री बनून माझ्याशी संग करत होता. मी ही पुरुष होतो. हळूहळू कामवासना जिंकली. सकाळी उठलो तेव्हा शरीरभर दाताच्या खुणा होत्या. कितीही पाणी अंगावर ओतले तरी न जाणाऱ्या खुणा मनावर उमटल्या होत्या.


त्यानंतर दोनच दिवसात माझ्या नावाची घोषणा झाली. साजन तेरे बैरागी नावाचा पहिलाच चित्रपट सुपरडुपर हिट झाला आणि बॉलीवूडला एक देखणा नायक मिळाला.सगळीकडे झळकणारी भव्य पोस्टर्स,छापून येणाऱ्या मुलाखती आणि मिळणारी प्रसिध्दी."


एवढे बोलून राजेंद्र शांत झाले. रात्रीच्या अंधारात आमचा प्रवास चालू राहिला.


इकडे पिंटोवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. हृदयाच्या जवळ असलेल्या चार आणि पाठीतील दोन गोळ्या डॉक्टरांनी काढल्या. खूप रक्त गेल्याने अजूनही पिंटो बेशुध्द होता. राजेंद्र आणि सुधांशू हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टर आणि पिंटोचा सेक्रेटरी बोलत होते. अक्षयला पाहून सेक्रेटरी लांबूनच थांब म्हणाले.


अक्षय आणि सुधांशू थांबून राहिले. संपूर्ण लॉबी रिकामी असल्याची खात्री करून सेक्रेटरी त्यांच्याकडे आला,"अक्षय तुम्ही इथे अजिबात येऊ नका. पिंटो आता ठीक आहे. त्याच्यावर झालेला हल्ला कोणी केला हेही समजेल."


सुधांशू आणि मी बाहेर पडलो. घरी पोहोचलो तेव्हा पहाटेचे तीन वाजले होते. पलंगावर अंग झोकून देताच डोळे बंद झाले.


सकाळी मोबाईल व्हायब्रेट होऊ लागला. डोळे चोळून मी उठलो. नऊ वाजले होते. मोबाईल पहिला तर शरद होता.


मी घाईत फोन उचलला,"लोकेशन पाठवले तिथे पोहोच."

फोन ठेवताच मी आंघोळीला पळालो. अंघोळ उरकली. एकीकडे सँडविच आणि दुसरीकडे सँडविच बनवायला ठेवले. पटापट आवरून कॅब बुक केली आणि मी शरदने पाठवलेल्या पत्त्यावर पोहोचलो. खाली उतरलो आणि कॅब निघून गेल्याची खात्री केली.


इतक्यात समोरून शरदने इशारा केला. आम्ही तिघे कॉफी घेऊन बसलो.

शरद बोलू लागला,"हिराचंद दमानिया आणि पवन यांच्यात काहीतरी होते."

मी हसत म्हणालो,"कम ऑन शरद दमानिया बद्दल असे काहीही ऐकले नाहीय."


शरद हसत म्हणाला,"आजपासून आपण म्हणजे तू आणि मी त्याच्यावर पाळत ठेवणार आहोत. समीर आपल्याला बॅकअप देईल."


मी म्हणालो,"मला राजेंद्रकुमार बद्दल लिहायचे आहे."

शरद म्हणाला,"ते तू दिवसा कर. आपल्याला आज रात्रीपासून काम सुरू करायचे आहे."


मी सुधांशुला फोन लावला,"आज भेटू का."

सुधांशू म्हणाला,"पत्ता लिहून घे. येताना बाईक वरून येऊ नकोस. दोन तीन वेळा कॅब बदलून ये."


मी व्यवस्थित पत्ता लिहून घेतला आणि निघालो. सुधांशूने सांगितलेल्या सूचना पाळून मी मढ आयलंड मधील बंगल्यात आलो.

मला पाहून राजेंद्र म्हणाले,"ये बस. पिंटो शुद्धीत आला आहे. त्याला पहायला रात्री जाईल."


मी म्हणालो,"हे सगळ सांगून जर तुम्हालाही धोका असेल तर आपण थांबवू."


तेव्हा मात्र राजेंद्र निर्धाराने म्हणाले,"नाही,आता माघार नाही. तर माझा पहिला चित्रपट यशस्वी झाला आणि मग चित्रपटांची रांग लागली. यश सगळीकडून धावत होते. त्यावर्षी फिल्मफेअर मध्ये मी नाचलो. सगळीकडे माझे नाव होत होते.


एक दिवस मला फोन आला. ए.जे.मधून मला बोलवले होते. मी प्रचंड खुश झालो. आरमानी सूट,कमावलेले शरीर,पैशांनी आलेला आत्मविश्वास. मी ऑफिसला पोहोचलो. अतिशय नामांकित दिग्दर्शक तो चित्रपट करणार होते. माझी ऑडिशन झाली. त्यानंतर आठवडाभराने मला फोन आला. ताराचंद दमानिया मला भेटणार होते.


एका भव्य साहसी चित्रपटात काम मिळणार होते. मी त्यांना भेटायला गेलो. समोर माझ्याइतका देखणा ताराचंद बसला होता.


मंद हसून मला म्हणाला,"मी सगळे.कागदात लिहिले आहे.घरी जाऊन सविस्तर वाच.मान्य असेल तर भेट नाहीतर कागद फाडून टाक."

राजेंद्र थांबले आणि मला शरदने फोन केला,"सहा वाजले लवकर ये."

मी राजेंद्र आणि सुधांशू दोघांचा निरोप घेऊन निघालो.


शरद आणि मी वेषांतर करून हिराचंद दमानियाच्या ऑफिसबाहेर थांबलो. बरोबर सात वाजता तो बाहेर पडला. आलिशान मर्सिडीज बेंझ धावू लागली. अर्ध्या तासाने कार थांबली. दमानिया उतरला आणि कार निघून गेली थोड्यावेळाने एका रिक्षात बसून तो पुढे निघाला.


आम्ही योग्य अंतर ठेऊन आम्ही पाठलाग करत होतो. रिक्षा वाशी जवळ थांबली. तिथून दुसऱ्या गाडीत बसून तो वळसा घालून लोणावळा दिशेने जाऊ लागला. रात्री दहा वाजता लोणावळ्यात एका निर्जन ठिकाणी असलेल्या भव्य हॉटेलवर दमानिया पोहोचला.


तो आत गेल्यावर आम्ही बाहेर थांबून टेहळणी केली आणि मग आम्हीही आत आलो.


शरद हळूच म्हणाला,"ह्या हॉटेलात कुठेही सी. सी. टी. वी.नाही."


मी सगळीकडे पाहिले आणि म्हणालो,"इथे सगळे पुरुषच आहेत. कोणीही महिला किंवा मुले नाहीत."


आता शरदच्या लक्षात आले.त्याने मला जवळ ओढून कंबरेत हात घातला आणि निघालो. दमानियाच्या पाठोपाठ आम्ही रूम घेतली त्याच्याच शेजारची. आम्ही आत गेलो.


शरद हसत सुटला,"आपण कसे दिसत होतो मघाशी."


इतक्यात लॉबी मध्ये आवाज आला. मी बाहेर आलो. एक गोरा देखणा मुलगा चालत येत होता. मी गुप्त कॅमेऱ्याने फोटो घेतले.


तो मुलगा दमनियाच्या खोलीत गेला आणि मी पटकन आत आलो. काम झाले होते आम्ही तासाभराने हॉटेल सोडून बाहेर पडलो.


कोण असेल तो मुलगा? राजेंद्रकुमारला काय सांगितले असेल कागदात? पिंटो शुध्दीवर आल्यावर काय सांगेल?

वाचत रहा.
एक सोन्याचा पिंजरा.

🎭 Series Post

View all