एक सामना

Ek Samna







तिन्ही बाजूंनी बंदिस्त अशा तीन मजली शाळेच्या प्रांगणात भल्या मोठ्या ग्राउंड वर कबड्डीचा सामना रंगला होता.
पाचवी ते सातवी एक गट आणि सातवी ते दहावी एक गट दोन वेगवेगळ्या कबड्डीच्या चौकटीत हे सामने सुरू होते.
पाचवी च्या मुलींचा सामना सातवीच्या मुलींसोबत सुरू होता. अगदी लहान मुली पणं सातवीच्या मुलींना भारी पडत होत्या.
पांचवीच संघाची प्रमुख रिद्धी आणि सातवीच्या संघाची प्रमुख माधुरी दोघींनी चांगलाच सामना रंगवला होता पणं ह्या सामन्याला रंगत सुरू होती ती सोनल मुळे. मध्यम शरीरयष्टी पणं नजर मात्र घारी सारखी अजब चपळाई ने विरुद्ध कोर्टात जाऊन तीन चार खेळाडूंना स्पर्श करून तिच्या बाजूला येत होती.
विरुद्ध संघातून कुणी चाल करून आले की त्याची नजर पडत नाही तोच तिचा पाय असा जखडून ठेवत होती की तिला काही चान्स च मिळत नव्हता.
सगळ्यांचे डोळे फक्त तिलाच बघत होते. इंटर स्कूल कम्पेटिशन ची इन्चार्ज मॅडम अलका तर अगदी खुश होऊन सामना बघत होती.
" आरती... ही मुलगी... " अलका मॅडम
" मुलगी नाही अलका मॅडम.. आफत आहे. बघा ना.. मी तर शॉक झाली बघून." आरती मॅडम
" तुझ्या वर्गात च आहे ना... नाव काय ग तीच..." अलका मॅडम.
" हो... सोनल नाव आहे तीच.. हुशार आहे पणं जरा मस्तीखोर आहे... पण छान खेळते." आरती मॅडम.
" पीटी ला गायकवाड मॅडम आहेत ना... मग हिने तर कॅप्टन असायला हव टीम च..." अलका मॅडम.
" ह्म्म्म... ती मॉनिटर आहे क्लास ची. पण ती म्हणते की कॅप्टन असलं की खेळायची जास्त मजा नाही घेता येत... मग तिच्याच मनाने रिद्धीला कॅप्टन बनवलं." आरती मॅडम.
" बर सामना संपला की माझ्याकडे पाठव. माझ्या टीम साठी असेच मुलीची गरज आहे." अलका मॅडम.
" अहो पणं अंडर फॉर्टीन चा ग्रुप नाही तुमचा."
" नाही सध्या... पण नसेल थोडीच...." आणि अलका मॅडम ने टाळी देत म्हणाल्या.
सामना खेळताना सगळ्यांनी खूप माझा केली.
जाधव सर... मोरे सर... ह्यांनी तर कबड्डीत बेस्ट प्लेयर म्हणून बक्षीस पणं दिलं.

अलका मॅडम केबिन मध्ये बसल्या होत्या.
" मे आय कम इन मॅडम."
" येस..." त्यांनी बुक मधून नजर वर न करताच बोलल्या.
" मॅडम आरती मॅडम ने पाठवलं. मी.." रिद्धी
" हा सोनल... ये..ये.. बस... " अलका मॅडम मध्येच तीच बोलणं तोडत म्हणाली.
" मी रिद्धी आहे मॅडम... ही सोनल..." रिद्धी
" हो.. बसा दोघी ही..."
त्या दोघी ही बसल्या.
" हे बघा..  तुम्हाला कदाचित माहिती नसेल... तुम्ही आताच हायस्कूल मध्ये आलात ना... तर माझ्या काही टीम आहेत... कबड्डी... हॉलीबॉल... क्रिकेट... फुटबॉल... मुलींच्या आणि मुलांच्या ही... आणि अथले टीक्स पणं आहेत काही... तर त्यादिवशी तुमचा खेळ बघितला मी... मला खूप आवडला... तर  आता सगळे ग्रुप हे अंडर सेवेंटीन आहे. पण तुमच्या कडे बघून वाटलं की अंडर ट्वेल आणि फॉरटीन पणं असायला हवे... तर माझ अस म्हणणं आहे की तुम्ही माझ्या टीम ला जॉईन व्हावं... "
" पण आम्ही वयात बसत नाही ना मॅडम.." सोनल.
" जोपर्यंत अंडर फोरटीन टीम पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही अंडर सेवेंटीन ला जॉईन करायचं. "
" ओके. मी घरी विचारून सांगू मॅडम." रिद्धी
घरचं नाव काढल्यावर सोनल चे मात्र इंडिकेटर वाजू लागले. कारण एक भाऊ सोडला तर कुणालाच माहीत नव्हते की सोनल खेळते म्हणून... ते ही मुलांचे खेळ... ऑर्थोडॉक्स आणि जॉईन फॅमिली मध्ये राहणाऱ्या मुलींना खूप कमी स्वातंत्र्य मिळत.
" तू सोनल... मी तुला विचारणार नाही अजिबात... मला तू कुठल्याही परिस्थितीत हवी आहेस. उद्यापासून अकरा वाजता यायचं मागच्या छोट्या ग्राउंड जवळ... "
छोट ग्राउंड म्हणल्या वर विद्याची ही पाचावर धारण बसली.
" तिथे तर विहीर आहे ना... "
" हा मग..."
" त्या विहिरीजवळ भूत आहे अस सांगितल वॉचमेन काकांनी .."
" रिदे... काही पणं..." सोनल तिला थांबवत म्हणाली.
मॅडम जरा कडक शिस्ती च्या पणं खळखळून हसू लागल्या.
" कोणत्या... सखाराम काका ने... नाही... जोपर्यंत विहिरीला जाळी नव्हती बसवली तो पर्यंत तस सांगायचे ते...पणं आता बसवली आहे जाळी. आणि माझ्या मुली गुढग्या पर्यंत बर्मुडा घालून खेळतात म्हणून ते मोठ्या मुलांना तिकडे जाऊ देत नाही. काळजी करू नका... मी आहे ना... मी पणं असेन सरावाच्या  वेळी. "
" ओके मॅडम. " रिद्धी आणि सोनल परत निघाल्या.
" सोनल उद्या अकरा वाजता... स्वप्नील ची बहीण ना तू... त्यासोबत येत जा... शाळा सुरू होण्यापूर्वी एक तास.. "
नंदी बैलासारखी मान डोलवित निघून गेल्या.
" रिद्धी अरे घरी काय सांगायचं... मी नाही काही सांगणार... भाऊ ला ओळखता मॅडम.. त्याला सांगते फक्त. " सोनल.
" माझे पप्पा तर मला कशालाच नाही म्हणत नाही... त्यामुळे मी त्यांना सांगेन आजच... मला नाही आवडत काही लपवायला... " मोठ्या तोऱ्यात विद्या म्हणाली.
विद्या सोनल ची बेस्ट फ्रेंड... तिच्याशिवाय ती कुठेच जायची नाही... पण तिचा अशा बोलण्याचा मनोमन सोनल ला तिचा जाम राग येत होता... मनात मात्र .. " रिद्धी  फिदी... शायनिंग मारी... नुसत पप्पा पुराण दिवसभर..."
" काय ग... शांत झालीस... बोल की..." रिद्धी
सोनल काहीच बोलली नाही.
" हो.. आता तुला टेंशन आल असणार... मी आहे ना... डोन्ट वरी..."
तीच डोन्ट वरी ऐकुन जरा हायस वाटलं. त्यामुळेच ती तिची बेस्ट फ्रेंड होती. काही मदत करो ना करो... पण दिलासा मात्र अगदी दिलखुलास द्यायची. त्यामुळे सोनल तर तिच्यासाठी काहीही करायला तयार असायचे.
भाऊ सोडून कुणाला शब्दाने काहीही सांगितल नाही सोनल ने... तरी मन आतून खात होत की आईला तरी सांगायला हवं... आणि बाकी बहिणीनं पैकी कुणाला कळलं तर हीच काय होईल माहिती होत त्यामुळे कुणाला भनक पणं नाही लागू दिली.


क्रमशः

🎭 Series Post

View all