एक सामना ४.०

एक सामना
त्या इतर विभागांत ही मुलींना सामने खेळायला घेऊन जाऊ लागले... कधी कधी शाळा खर्च करत नव्हती तर स्वखर्चाने घेऊन जाऊ लागल्या... आणि आता फॉर्म मध्ये सोनल च वय वर्षे अकरा टाकू लागल्या... टीम अंडर सेवेंटिन मध्ये एक अकरा वर्षाची मुलगी खेळते हे जवळपास सगळ्यांनाच माहिती झाल होत.
परेंट मीटिंग मध्ये मॅडम ने स्वतः सोनल च्या आईला हे सर्व सांगितल. तिला ही खूप आनंद झाला. पण घरचे कसे रिअॅक्ट होतील ह्या विचाराने तिने ही काही घरी सांगितल नाही...
आता सोनल ला आई आणि भाऊ दोघांचीही साथ होती.
अभ्यास ही सुरू होता आणि खेळ ही. असे अनेक सामने वेगवेगळ्या शाळांत खेळले... तालुकास्तरीय मध्ये पणं चांगले यश मिळवले. आता जिल्हास्तरीय साठी त्यांना अप्रोच केलं गेलं. जबाबदारी वाढली होती. रविवारी सराव करावा अशी मॅडम ची ईच्छा होती पण शाळा शहरात नसल्याने सगळ्याच मुलींना घरून बंधने होतीच. रविवारी शक्य होत नव्हते. तरीही इतर दिवशी प्रामाणिक पणें सराव सुरू होता. मुलांसोबत त्या सर्व करत होत्या म्हणजे आपल्यापेक्षा जास्त ताकदवान आणि हुशार मुलांसोबत खेळल्याने आपली स्त्रेंथ वाढते अस मिताली च स्पष्ट शुद्ध मत होते... जितेश सर... मुल.. तर फिदा होते ह्या दोघींच्या खेळण्यावर... मिताली आणि सोनल मध्ये पाच वर्षे अंतर होत आणि सोनल मिताली ला सरस होती... पण मिताली ला कधी ही तिचा हेवा नाही वाटला... उलट ती नेहमी सोनालची काळजी घेत होती... कधी लागलं वगेरे तर लगेच फर्स्ट एड करणार... खेळताना तिला प्रेमाने समजावणार... चेअर अप करणार... त्यामुळे सोनल मध्ये तर प्रोफेशनल खेळाडू सारखी सुधारणा झाली होती... ते कधी कधी फुटबॉल आणि क्रिकेट पणं  खेळत होते. त्यात ही बऱ्यापैकी सरस झाल्या होत्या. आता इंटर स्कूल कंपेटिश्र्न मध्ये ते क्रिकेट आणि फुटबॉल ही खेळू लागले होते.
पण कबड्डीची जिल्हास्तरीय सामन्याची तारीख आली आणि ती मुलींची नेमकी रविवारी होती. आणि मुलांची सोमवारी.
सोनल पेक्षा मिताली ला जास्त टेंशन आल होते की रविवारी सोनल कशी निघेल घराबाहेर.
आणि दोन दिवस आधी मिताली आणि सोनल ने मॅडम ला सांगितल.
" ठीक आहे मी बोलते तुझ्या बाबांसोबत ..." अस आश्वासन देऊन त्यांना निश्चिंत केलं.
पण आता मॅडम कधी बोलणार... आणि बोलल्यानंतर काय होईल याचा जास्त मोठा प्रश्न पडला होता.
पण मॅडम मात्र विसरून गेल्या. सोनल ने घरचा लेंडलाईन नंबर पणं दिला होता. खेळणार दोघीच... मिताली आणि सोनल... पणं सगळ्यांना सोबत घेऊन जाणार अस ठरलं. की ज्यामुळे मुलींना शिकायला मिळेल.
स्पर्धेचा दिवस उजाडला. सोनल ने पोट दुखतयं बहाणा सांगून जायचं नाही ठरवलं. रविवारी वडील घरी असतात म्हणून तिने ही चांगली  संधी नाकारली. तरीही मॅडम तिची वाट बघत होत्या. शेवटी त्यांनी कॉल केला. वडिलांना फोन दिला. त्यांनी काय काय सांगितल माहिती नाही पण वडील बाहेर जाऊन आले... त्यांनी तिला व्हाइट टी शर्ट आणि बर्मुडा घेऊन आले... आणि सोनल ला रेडी व्हायला सांगितल.
ती तर सातव्या आसमंतात होती... इतका बदल कसा झाला अचानक...
तिला जिथे मॅडम आणि टीम थांबल्या होत्या तिथे सोडवलं आणि पैसे पणं दिले.
आज सोनल ही जोश ने खेळत होती कारण वडिलांनी स्वतः तिला सप्पोर्त केलं होतं. मॅडम पणं खुश होत्या... आणि त्यांनी पुन्हा बाजी मारली होती. पुन्हा एकदा फायनल वाजवली होती.
मॅडम ने तिला घरी सोडलं. तीच भरपूर कौतुक केलं... ट्रॉफी सर्टिफिकेट वडिलांच्या हाती दिले...
आणि त्यांचे आभार सुद्धा मानले.
वडील मात्र एकदम शांत होते... इतर वेळी जमदग्नी अवतार घेणारे वडील आज शांत का हा प्रश्न खूप वेळा तिला पडला होता.
आणि निवांत सायंकाळी जे त्यांनी पट्टा काढला आणि धोपटायला सुरुवात केली... की बस... मध्ये जो पडेल त्याला सुद्धा धुतला... आधी भाऊ... मग आई.. काका.. आजी वगेरे... सगळे त्यांच्या तिसऱ्या डोळ्याचे शिकार झाले होते...
तर अशी कबड्डी मॅच सोनल च्या घरात सुद्धा रंगली होती... इतका सराव करून ही त्यात मात्र तिची हार झाली होती...
त्यानंतर फक्त लपून छपून खेळ सुरू होते... नो संडे मॅच नोथिंग...
स्कूल... कॉलेज... इतकेच काय ते खेळायचे दिवस असतात मुलींसाठी... नंतर काय...फक्त चूल आणि मुल...
त्यामुळे लेकरांना मनसोक्त खेळू द्या... मजा करू द्या... प्रत्येकाचं नशीब सचिन सारखं नसत... तेव्हा आपल्या मुलांत सचिन बघा... धोनी बघा... सायना.. मेरी कोम... सानिया बघा...


धन्यवाद. ?

🎭 Series Post

View all