सामना ३.०

एक सामना


रोज सायकल वरून येताना विद्या आणि सोनल लवकर निघे घरून... कधी कधी भावासोबत...
रोज नवनवीन गोष्टी मॅडम शिकवत होत्या..  रांगड्या कबड्डी आणि प्रोफेशनल कबड्डी मध्ये काय फरक हा आता सोनल ला बऱ्यापैकी समजत होता .
आता एक इंटर स्कूल कंपेटिश्र्न चा एक प्रपोजल आल होत. दोन आठवड्यांनी मॅच होती.
अलका मॅडम दिवसातून दोनदा सराव घेत होत्या .. एकदा शाळा भरण्या आधी... आणि एकदा शाळा सुटण्याच्या एक तास आधी. टीम मध्ये आता अकरा मेंबर होते. कोण खेळणार कोण राखीव असणार ह्याचा निर्णय अजुन झाला नव्हता. सतरा वर्षे खालील वयोगटातील असल्याने सगळ्यांना वाटत होत की रिद्धी आणि सोनल नाही खेळू शकत... पण मॅडम ने फॉर्म भरून घेतेवेळी दोघींची वय वर्षे चौदा पूर्ण टाकली होती. हे मात्र कुणालाच माहीत नव्हते.
आता मुल विरुद्ध मुलींचा ग्रुप असा सराव सुरू होता. कारण सिरीयसली सराव खूप महत्त्वाचा होता. आणि मुलांसोबत खेळायला सुरुवातीला सोनल घाबरली पण सोबत स्वप्निल असल्याने जरा धीर आला. मुलांची पण तितकीच निश्चयाने ती खेळत होती.
रिद्धी  ही सरावाने चांगली खेळू लागली पण सामन्याच्या दोन दिवस आधी तिचे दोन्ही गुडघे फुटले होते अगदी. त्यामुळे तिला आराम करायला सांगितलं.
सामन्याच्या दिवशी सकाळी लवकर बोलावलं होतं. घरी प्रज्ञा शोध परीक्षेचा एक्स्ट्रा क्लास आहे अस सांगून भावासोबत निघाली होती. अर्थात अभ्यासात हुशार असल्याने वेगवेगळ्या परीक्षा मध्ये सहभागी व्हायला काहीही ना नव्हती... पण फक्त अभ्यास एके अभ्यास... पण जेव्हा खूप फोर्स केला जातो तेव्हा मुलांमध्ये रॉबिन हुड ने एन्ट्री घ्यायला वेळ नाही लागत.
सांगितल्या प्रमाणे सगळे वेळेवर आले. सोनल आणि स्वप्निल ला जरा उशीरच झाला होता. पण तिथून सगळे स्कूल बस ने दुसऱ्या शाळेत जिथे स्पर्धा आयोजित करण्यात आला तिथे जायला निघाले.
मॅडम ने स्पोर्ट्स चा युनिफॉर्म दिला... अर्थात सगळ्यांनी विकत घेतले होते... पण मी घरी काय सांगणार... कसं घेणार हे त्यांनी कदाचित ओळखलं होत... किंबहुना मिता दिी आणि सोनल ची चांगलीच गट्टी जमली होती त्यामुळे कदाचित तिने सांगितलं असावं अस ही तिला वाटलं.
सोनल पहिल्यांदाच शाळेबाहेर खेळण्यासाठी जात होती. गेल्यानंतर सगळे तगडे तुगडे पाहिल्यावर जरा पाचावर धारण बसली होती. पण भीती मनात दाबून ठेवत चेहऱ्यावर उसन अवसान होत.
रिद्धी सोबत नव्हती त्यामुळे जरा खाली खाली च वाटतं होत.
आयोजकांनी त्यांची फॉर्मलिटी पूर्ण करून चहा पान झाल्यानंतर सामन्यांना सुरुवात केली. मुली ड्रेस चेंज करून आल्या...सोनल तर त्या युनिफॉर्म मध्ये स्वतःला अगदी परीच समजत होती. पण तिला अंदाज आला होता की कुणीही कुणासाठी कधीही फ्री मध्ये काहीही करत नाही आणि अलका मॅडम खूप आस लावून बसल्या आहेत आपल्याकडून. आपल्याल त्यांच्या अपेक्षा पूर्ती साठी जिंकायचं आहे... काहीही करून.
पहिला सामना सुरू झाला  के के विद्यालय विरुद्ध नूतन विद्यालय.
अतिशय रंगत दार सामना होता. अगदी तोडीस तोड...दोन राऊंड झाले आणि के के विद्यालय विजयी झाला.
दुसरा ज्ञान प्रबोधिनी विरुद्ध रचना विद्यालय.
ज्ञान प्रबोधिनी म्हणजेच सोनल चा ग्रुप.
सगळ्या मुलींमध्ये सोनल सगळ्यात छोटी ... नाजूक आणि बारीक दिसत होती.
समोरच्या मुली तर तिला बघून अगदी फिदीफिदी हसायला लागल्या. काडी  पैलवान... एक फुंकर मारली तर उडून जाईल वगेरे वगेरे ऐकू येऊ लागले.
मिताली ने डोळ्यांनीच दिलासा दिला... आणि तिच्या हातात हात घालून पुढे घेऊन गेली... त्यांच्या सोबतच्या मुलामुलींनी एकच जल्लोष सुरू के ला.
मिता आणि विरुद्ध टीम ची कॅप्टन टॉस साठी गेल्या. टॉस विरुद्ध टीम जिंकली. सगळ्यांनी ग्राउंड ला एक राऊंड मारला... त्यांनी पाहिले चढाई घेण्याचं ठरवलं. 
सोनल आणि मिताली हात पकडून उजव्या बाजूने तर गायत्री आणि पौर्णिमा दुसऱ्या बाजूने आणि मध्ये तिघी मुलींची जाळी... समोरून एक अॅक्टिव मुलगी कबड्डी कबड्डी करत बॉर्डर ला हात लाऊन आत आली. ती आत येऊन पहिली बॉर्डर क्रॉस केली पणं पुढे काही न येता तिच्या संघात परतली.
नंतर गायत्री गेली पण बाद झाली. कधी इकडची मुलगी तर कधी तिकडची मुलगी बाद होत होती.
सामना अटीतटीचा सुरू होता. सोनल अजून ही सेफ ली खेळत होती. मिताली आणि ती दोघी मिळून समोरच्या टीम चा फडशा पाडत होते.
दुसरा राऊंड सुरू झाला होता... सोनल ने पहिल्या राऊंड मध्ये चढाई केली पणं कुणी बाद झाल नव्हत... कदाचित ती थोडी नरवस होती...
बाकी मुली एकमेकींना ओळखत होते. पण सोनल मात्र त्यांच्यासाठी नवीन होती. दिसायला बारीक वय उठून दिसत होते आणि त्यामुळे सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळून होत्या.
आता मिताली ची टीम कमी होत होती... समोर सहा आणि मिताली सोनल स्मिता तिघी... स्कोअर होता १३-१२
शेवटी मिताने हुकुमाचा एक्का बाहेर काढायचं ठरवलं. सोनल ला एन्ट्री दिली आणि तिच्या कानात काहीतरी बोलली... आणि कबड्डी एकसुरात म्हणत एन्ट्री केली...
समोरच्या संघात कुणी तिला कोंबडी कोंबडी म्हणत होते तर कुणी काय तर कुणी काय... ती काय आहे हे मिता ला मात्र चांगलाच ठावूक होत.
सोनल ने आतील बाऊँड्री क्रॉस केली... परत यायला तिचा पाय निघेना... कारण कुणालाच स्पर्श झाला नव्हता... आणि ती जरा आत गेली... एक मुलीच्या पायाला पाय लावला... तिला कळलं च नाही मात्र पंचाना कळलं... दुसरी मुलगी तिला पकडायला आली... आणि बाकी सगळ्या आल्या... पण त्यातून ही केव्हा निसटली कुणालाच कळत नव्हतं... बस.. एका वेळी पाच ही मुली बाद झाल्या होत्या... पोरिनी एकच जल्लोष केला...मिता ने तर अगदी तिला मिठीच मारली .. आणि ज्या रिंगण बाहेर होत्या त्यांना पुन्हा एन्ट्री मिळाली... आणि प्लस पॉइंट सुद्धा... त्यांचा स्कोअर हा पुढील संघाच्या जास्त होता... आणि प्रथम फेरीत विजेते झालेल्या तीन टीम पैकी एक टीम फायनल ला पाठवणार असा निर्णय झाला होता... आणि मिताली ची टीम सेमी फायनल एेवजी दिरिक्टली फायनल ला गेली..

फायनल ला सुद्धा त्यांनी असच धूमधडाका केला आणि ट्रॉफी घेऊनच शांत राहिल्या... पण सामना ट्रॉफी पुरता मर्यादित नव्ह्ता... काही बेस्ट खेळाडूंना तालुका स्तरीय टीम मध्ये घ्यायचं ठरवलं होतं... त्यात मिताली आणि सोनल दोघीही होत्या... आणि बाकी संघाच्या ही मुली निवडल्या गेलेल्या.
सगळे जाम खुश होते. आणि अलका मॅडम ला ही त्यांचं निर्णयाचा गर्व वाटत होता. त्यांनी पंचक्रोशीत शाळेत तर त्या सहभाग नोंदवत होत्याच टीम च पणं आता त्यांनी बाकी वेगवेगळ्या विभागांत ही सहभागी होण्याची तरतूद करू लागल्या... खेळून ही मुली अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही ह्याची ही त्या काळजी घेत होत्या...

क्रमशः

🎭 Series Post

View all