Login

एक सामना २.०

एक सामना


आणि अहो आश्चर्य म्...
दुसऱ्या दिवशी डॉट अकरा वाजता दोघी ही ग्राउंड वर हजर झाल्या.
अलका मॅडम ने दोघींची ओळख सगळ्यांशी करून दिली.
ह्या... टिंग्या खेळणार आमच्या सोबत... आणि कांता मोठ्याने हसू लागली. " ही विद्या तरी ठीक वाटते अंग काठीने..  पणं ही सोनल आमच्या एक हाताची पणं नाहीये... " मिताली
दोघीही केविलवाण्या नजरेने अलका मॅडम आणि मिताली कडे बघू लागली.
" जस्ट वेट अँड वॉच मिता."
त्या नऊ मुली पैकी एकीला बोलवून काहीतरी सांगितल कानात मॅडम ने. ती ही लगेच गुरुआज्ञा मानून धूम ठोकली.
" चला टीम... तुमच्या जागेवर उभ्या राह.. मी एन्ट्री घेते... "
एकच कल्ला झाला.. पोरी जोश मध्ये ओरडू लागल्या.
आणि अलका मॅडम ने एन्ट्री घेतली..
उंच आणि मध्यम बांध्याच्या अलका मॅडम पंजाबी ड्रेस ची ओढणी बॅग वर ठेवून कबड्डी कबड्डी म्हणत आत गेल्या ..दोन्ही कडेच्या दोघी... आणि मधल्या तिघी.. इतक्या परफेक्ट जाळी पकडून उभ्या होत्या... कस ही करून मॅडम चा पाय पकडायचा ह्या विचारात वैशाली नजर ठेवून होती ..  पणं काही केल्या हाती लागेना... आणि अलका मॅडम ने मिता आणि पौर्णिमा ला हात लावून बाहेर आल्या देखील...
मिता आणि पौर्णिमा बाहेर आल्या... आता मिताच्या जागी म्हणजे कडेला... सोनल ला आणि पौर्णिमेच्या जागी रिद्धी ला जायला सांगितलं... आणि पुन्हा एन्ट्री घेतली...
सोनल जरा बिचकतच होती... अर्थात तिच्या समोर तीच्या तिप्पट वयाच्या मॅडम आणि खेळात गडगंज अनुभव असणाऱ्या अलका मॅडम होत्या...
शेवटी न राहवून.. ती तिच्या खेळाडू मोड मध्ये गेली आणि आता अलका मॅडम मध्ये तिला फक्त प्रतिस्पर्धी दिसत होता... आणि मोठ्या शिताफीने तिने त्यांच्या पाय घट्ट पकडून धरला... असा धरला की त्यांना खाली पणं पडता येईना... बाकी मुली पणं सगळ्या बाजूने ओरडतच मॅडम ला घट्ट पकडून ठेवलं आणि एकच क ललोळ झाला. मॅडम तर जाम खुश झाल्या होत्या. की मी इतका प्रयत्न करून सुद्धा सोडलं नाही ह्या एवढ्याशा कर्टीने...
मिताली मॅडम च्या बाजूला जाऊन उभी राहिली. तिला वाटलं मुद्दाम मॅडम ने हार मानली.
" मॅडम... मुद्दाम दिलात ना तुम्ही तिला पाय.. " मिता.
" बर.. चला आता द वन अँड ओन्ली मितू येतेय..." मॅडम.
" ये..  ये ... मिते... " दोघी तिघी किंचळल्या.
" मिता ने एन्ट्री केली.. 
तगडी धिप्पाड पोरगी..  तिला बघूनच दुसऱ्या टीम च्या मुलींना घाम फुटायचा... जिण्यातून बाजूने चालली तरी तिला टरकून आधी तिला जाऊ द्यायचा... आणि सोनल ला मात्र काही माहीतच नव्हतं... विद्याच्या भावाची वर्गात असल्याने तिला मात्र माहीत होत... की तिचे हात पाय कुणीच पकडू शकत नाही इतकी ती चपळ आहे...
मिताने मात्र सोनल ला इतकं सिरीयसली घेतल नाही. आणि आरामात कबड्डी कबड्डी म्हणत पहिली बॉर्डर क्रॉस केली.
आणि कुणीच तिला पकडत नव्हत... बाकी मुलींना माहीत होते की तिला पकडण्याच्या प्रयत्नांत ती आपल्यालाच आऊट करेल...
आणि मोठ्या मेहनतीने सोनल ने तिला पकडल पणं ती त्यातून सुटली कारण बाकी मुली तर तिला मदतीला आल्याचं नाही. अजून ही मिताली कबड्डी म्हणत कोर्ट मध्येच होती... आणि सोनल ला मात्र तीच टच झाल होत त्यामुळे मिताली कोर्ट मधून विजयी बाहेर गेली तर सोनल बाद झाली असती... तिने सगळी शक्ती एकवटून मितलीच्या मागे आली आणि मुलींच्या घोळक्यात ढकलून दिलं... आणि जशी मिताली सरपटत हात बॉर्डर कडे घेऊ लागली तशी तीच्ये दोन्ही हात सोनल ने घट्ट पकडून ठेवलं... शेवटी तिचा कबड्डीचा सुर थांबला तेव्हा कुठे ह्या मुलींनी तिला सोडलं...
मॅडम ... जितेश सर... आणि काही मुल.. सगळे टाळ्या वाजवू लागले... त्यात सोनल चा भाऊ पणं होता... तिने मिताली ला उठायला हात दिला... आणि मिताली ने ही आनंदाने हात हातात घेऊन स्टाईल ने उठली अगदी... आणि सोनल ला उचलून च घेतल ... सगळे टाळ्या वाजवत होते.
आता मॅडम ने रिद्धी  ला चढाई साठी पाठवले .. सोनल आणि मिताली मस्त गप्पा मारत बघू लागल्या... पण पोरीनी रिद्धी ला आरामात जकडून ठेवलं...
आता सोनल ची वेळ आली...
मिताली मॅडम सोबत गप्पा मारू लागली.
कबड्डी कबड्डी म्हणत तिने आत एन्ट्री केली... तीच पाऊल एक जागी थांबतच नव्हतं... ऋतिक रोशन च्या डान्स सारखं वरचे वर पाय होते अगदी... गायत्री ने तिला पकडायचा प्रयत्न केला... सगळ्या मुली पकडायला आल्या पणं... ती हातातून विरुळा निस्टावा अशी सटकन निघून कधी गेली कुणालाच कळत नव्हतं...
पुन्हा एकदा... तोच जल्लोष मिताली ने केला हू हु... छोटा पॅकेट... तू आजसे मेरा पार्टनर... आणि अगदी गालावर पापाच घेतला...
भाऊ पणं जाम खुश झाला...
" सोप्या... लयी अवघड आहे राव तुझी बहीण... कस हॅण्डल करता घरी तुम्ही लोक..." मिताली स्वप्नील च्या बाजूला येऊन बोलली.
" नाही मिताली... ती खूप शांत आहे... तशी आहे ती जरा वात्रट... " स्वप्नील.
" तू कन्फुज झाला ... नक्की काय म्हणायचं तुला... शांत... मस्तीखोर की वात्रट... तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत..." मिताली.
तो फक्त हसला... मुलींशी बोलायला जरा लाजबुजराच होता तो... पण बहिणीच इतकं कौतुक सुरू होत हे पाहून त्याला ही खूप आनंद झाला होता.