एक प्यार ऐसा भी 19

Marathi love story

अनीश अनुश्रीला शोधत-शोधत बागेत गेला. तोच तिथे त्याला एका बाकावर अनुश्री बसलेली दिसली. लगेच अनीश पळत तिच्यापाशी गेला.

"अनु, तू इथे आहेस होय. मी तुला सगळीकडे शोधतोय. चल बघू आत. आपण बाबांना जे काही खरं खरं आहे ते सांगू. बाबांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. तू चल आपण त्यांना सगळं सांगू." असे म्हणून अनीश अनुश्रीचा हात धरून तिला घेऊन जाऊ लागला. इतक्यात तिने त्याचा हात सोडला आणि ती तिथेच उभी राहिली.

"काय झालं अनु? तू अशी का थांबलीस? चल आपण जावू, मी बाबांना सांगतो सगळं, आईला पण सांगू. ते दोघेही तयार होतील. त्यांचा गैरसमज झाला आहे." अनीश

अनुश्रीने तोंड फिरवून डोळ्यातील पाणी पुसून घेतले आणि ती म्हणाली, " हे बघ तुझं तू जा. मला यायचं नाही."

"पण का? आपलं प्रेम आहे ना आणि आपण खोटं बोलायचं नाही. जे काही असेल ते खरं खरं सांगायचं आणि त्यांना पटलं नाही तर आपण परस्पर जाऊन लग्न करायचं असं ठरलं होतं ना. आता तू माघार का घेत आहेस?" अनीश

"आपलं तसं काहीच ठरलं नव्हतं. अनीश, अरे बाबांची तब्येत अतिशय बिघडली आहे. ते आता आय सी युच्या बाहेर आले आहेत, पण अजून पूर्ण बरे झाले नाहीत ना. आपण त्यांच्या तब्येतीचा विचार करायला नको का? आपण जर हे जाऊन त्यांना सांगितलं आणि मित्रासमोर खोटे पडू म्हणून त्यांनी मनाला लावून घेतले तर, त्यांचे काही बरे वाईट झाले तर मी कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही. भले आपल्या नात्यालाही काही किंमत उरणार नाही. हे मला कदापि चालणार नाही. त्यामुळे तुझं तू जा. आता आपला मार्ग वेगळा. तू तुझ्या मार्गाने जा, मी माझ्या मार्गाने जाईन. अनुश्री नावाची कोण तुझ्या आयुष्यात होती हे सगळं विसरून जा आणि सुखाने संसार कर." हे सांगताना या गोष्टीचा कंठ दाटून आला.

"आणि तुझं. तू काय करणार आहेस?" अनीश

"ते माझं मी बघेन. तसंही मला एक्सेप्ट करणारा असा कोणी भेटणार नाही. त्यामुळे तुझ्या आठवणीत मी रमेन." अनुश्री

"अजिबात नाही. जर तू लग्न करणार नसशील, तर मी देखील लग्न करणार नाही आणि आता तुझा हा काय वेडेपणा चालू आहे? थोड्या दिवसांनी बाबांची तब्येत व्यवस्थित होईल मग मी त्यांना सगळं सांगेन ना." अनीश

"तब्येत व्यवस्थित होईलच रे, पण तरीही ती नाजूकच असेल ना. मग कशाला रिस्क घेतोस? त्यांनी निवडलेली मुलगी देखील चांगलीच आहे आणि झाला गैरसमज त्यात काय?" अनुश्री

"अनु, मी काल त्यांना तुझं नाव सांगणार होतो. तितक्यात बाबांना चक्कर आली ग. त्यांना वाटलं की, ती मुलगी म्हणजे उर्मीच असेल म्हणून. नाही तर त्यांनी तुझं नाव घेतलं असतं ना ग." अनीश

"असू दे रे. माझी काहीच तक्रार नाही. तू मला समजून घेतलंस, माझ्यावर मनापासून प्रेम केलंस, माझ्याशी लग्न करायला तयार झालास, यातच सगळं आलं. माझा मला आत्मविश्वास परत मिळाला. तुला सांगू माझा प्रॉब्लेम तुला सांगितले, तरीही तू लग्नाला तयार झालास तेव्हापासूनच मी स्वतःवर प्रेम करायला शिकले. माझ्यात कोणत्या गोष्टीची कमी आहे? हे मला तेव्हापासून जाणवले देखील नाही. उलट मी खूप काही स्पेशल आहे असे मला वाटू लागले, याचे श्रेय सगळे तुझेच. तुझ्यामुळेच मला असे वाटू लागले. त्यामुळे मी तुला कधीच विसरणार नाही आणि विसरू शकणार नाही. चल मी निघते आता. बाय. आता मी जॉब सोडून दुसरीकडे कुठेतरी बघेन. समोरा समोर असलं की मनात परत तोच विषय सुरू व्हायचा. त्यापेक्षा आपण आपापले मार्ग बदलू आणि आपल्या मनाप्रमाणे जगू." असे म्हणून अनुश्री जाऊ लागली.

"इतकं सोपं आहे का ग ते? विसरू शकशील तू मला? राहू शकशील माझ्याशिवाय. बरं ठीक आहे तू एक जगू शकशील ग, पण मला ते शक्य नाही. मी मनापासून तुझ्यावर प्रेम केलं आहे. कसा विसरु तुला सांग ना?" अनीश

"अवघड आहे, पण अशक्य नाही. एकदा लग्न कर तिच्याशी, संसारात मन रमवशील तर विसरून जाशील मला." अनुश्री

"तुला विसरणं शक्यच नाही. माझा श्वास आहेस तू, तुझ्याविना मी काहीच नाही. अनु, आपण दोघे एकमेकांसाठीच बनलेलो आहोत. तू माझा जीव आहेस, माझ्या मनात फक्त तूच आहेस. आत चल अनु.

प्रत्येक श्वासात आहेस तू,
ध्यानी मनी स्वप्नी तू,
मनामनात फक्त तू,
मनातला हळवा कोपरा तू,
मनातली गर्द हिरवळ तू,
आनंदाचे कारण आहेस तू,
विसाव्याचे ठिकाण तू,
अनु, फक्त तू सोबत रहा. कायम माझीच बनून रहा. माझ्यासारख्या वेड्याला फक्त तूच समजून घेऊ शकतेस ग, बाकी कुणीच नाही. तुझ्याविना मी अधुरा आहे अनु. प्लीज मला सोडून जाऊ नकोस." अनीश खूपच व्याकुळ होऊन म्हणत होता.

"अजिबात नाही. आपला प्रवास इथपर्यंतच होता. आता आपल्या वाटा वेगळ्या आहेत. चल मी जाते." असे म्हणून अनुश्री जाऊ लागली. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. ती थांबवण्याचा प्रयत्न करत होती पण थांबतच नव्हते. इतक्यात परत अनीशने तिला थांबायला सांगितले पण अनुश्री थांबली नाही. कारण तिला फक्त अनीशच्या बाबांची तब्बेत दिसत होती. त्यात ती भराभर पावले टाकत निघून गेली आणि अनीश तिथेच सुन्न होऊन तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत होता.

मिळाली होती तुझी साथ
सोबतीने चालत होतो वाट..
काळाने असा घातला घाव
वेगळी झाली आपली वाट..

अनीशच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. तो खूप दुःखी झाला होता. पण परिस्थिती पुढे हतबलही झाला होता. आता काय करावे काहीच सुचेना. थोडा वेळ तिथेच बसून तो आत गेला तर सगळे अनीशला शोधत होते, ते पाहून त्याच्या मनात धडकीच भरली.

"बाबांना काही झालं तर नसेल ना. हे सगळे मला का शोधत आहेत?" असा मनात विचार करून अनीश पळत-पळत तिथे गेला.

"काय झाले? बाबा ठीक आहेत ना. तुम्ही सगळे मला का शोधत आहात?" अनीश

"अरे, तू कुठे दिसत नव्हतास ना? म्हणून तुला शोधत होतो. बाबा आत्ता ठीक आहेत. डिस्चार्ज दिला की लग्नाच्या तयारीला लागू असे ते म्हणाले. आता तू आमचा जावई होणार म्हणून आम्हाला खूप बरे वाटत आहे." उर्मीचे बाबा

अनीश काहीच बोलला नाही. त्याला फक्त बाबांच्या तब्येतीची काळजी वाटत होती. आता काळजीचे कारण नाही म्हटल्यावर तो थोडा निर्धास्त झाला होता. उर्मीचे आई-बाबा थोडा वेळ तिथे बसून नंतर ते घरी चालले.

"चला जावईबापू, आता तयारीला लागायला हवं. लवकरात लवकर लग्न आटोपले तर आम्ही मोकळे झालो. इथेच काखेत कळसा नि गावाला वळसा अस आमचं झालं होतं. तिच्या लग्नाची काळजी तर होतीच शिवाय मुलगा देखील आमच्या बघण्याचा असायला हवा असे सारखे वाटत होते. एकुलती एक मुलगी आहे ना, म्हणून देवान ऐकल आमचं. अगदी बघण्यातलाच मुलगा मिळाला. आता तयारीला लागायला हवं. मुलीचं लग्न थाटामाटात करणार आहे मी." असे म्हणून उर्मीचे आई बाबा गेले. उर्मीचे आईबाबा गेल्यावर उर्मी थोडा वेळ तिथेच बसून होती. मग अनीश तिच्याजवळ गेला.

"उर्मी, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. हे बघ तू तरी मला समजून घेशील असे वाटते. प्लीज तू वाईट वाटून घेऊ नकोस. पण माझं.." असे म्हणून अनीश पुढे बोलणार इतक्यात डॉक्टरांनी त्याला बोलावले म्हणून तो लगेच डॉक्टरांकडे गेला.

"डॉक्टर बोला, काही सिरीयस आहे का? बाबांची तब्येत आता कशी आहे? ते ठीक आहेत ना? लवकर घरी परत येतील ना." अनीशने थोडासं घाबरतच विचारले.

"हो. ते आता ठीक आहेत, पण त्यांची तब्येत अजूनही नाजूक आहे. त्यांना धक्का बसेल असे काहीच वागायचं नाही, बोलायचे नाही. त्यांची तब्येत जपावी लागेल. त्यांना चांगले सांभाळावे लागेल." असे डॉक्टर म्हणाले.

"हो डॉक्टर. आम्ही त्यांना खूप चांगले जपू. त्यांच्या खाण्या-पिण्याकडे लक्ष देऊ. कसलीही कमतरता भासू देणार नाही. फक्त त्यांना डिस्चार्ज कधी मिळेल? इतकं सांगा." अनीश

"आणखीन दोन दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागेल. विकनेस असल्यामुळे त्यांना चक्करही येत आहे. दोन दिवसांनी मग तुम्ही घरी नेऊ शकता. पण त्यांना खूप दगदग करून जाणार नाही." डॉक्टर

"हो ठीक आहे डॉक्टर." असे म्हणून अनीश केबिनमधून बाहेर आला आणि परत उर्मीला सांगण्यासाठी गेला, तर तिथे उर्मी नव्हतीच.

"आता ही कुठे गेली?" असे मनात म्हणून अनीश आईकडे गेला.

"आई उर्मी कुठे गेली ग? तुला काही सांगून गेली का? अनीश म्हणाला

"हो रे. ती घरी गेली. काही काम होतं का तिच्याकडे?" अनीशची आई

"हो थोडं काम होतं. तिला थांब म्हणून म्हणताना मला न सांगता का गेली?" अनीश थोडासा वैतागून म्हणाला.

"हॅलो, अजून तुमचे लग्न झालेले नाही. ती तुझ्या प्रत्येक बंधनात अडकायला अजून थोडा वेळ आहे. लग्नानंतर तू तिला असे बंधनात अडकू शकतोस. पण अजूनही ती स्वतंत्र आहे." अनीशची आई

"हो आई. पण तेच काम होतं म्हणून म्हणालो मी. ठीक आहे. भेटून बोलतो तिच्याशी. चल आता मी घरी जातो आणि आवरून ऑफिसला जातो. इथे काही गरज लागली तर मला फोन कर, मी लगेच येईन." असे म्हणून अनीश घरी गेला.

अनीश घरी गेल्यावर त्याने उर्मीला सांगितले की, "मला तुझ्याशी खूप महत्वाचे बोलायचे आहे. आज संध्याकाळी भेट." असा त्याने मेसेज केला आणि तो आवरून ऑफिसला गेला.

आत्ता अनीश उर्मीला अनुश्री बद्दल खरं सांगेल की आणखी काही होईल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा
क्रमशःअनीश अनुश्रीला शोधत-शोधत बागेत गेला. तोच तिथे त्याला एका बाकावर अनुश्री बसलेली दिसली. लगेच अनीश पळत तिच्यापाशी गेला.

क्रमशः

🎭 Series Post

View all