एक प्यार ऐसा भी 18

marathi love story

अनीश नेहमीप्रमाणे घरी गेला. जेवण झाल्यानंतर आई-वडिलांशी बोलायचं असे त्याने ठरवले होते, त्यामुळे त्याने पटकन जेवण करून घेतले. जेवण झाल्यावर तो हॉलमध्ये आई-बाबांशी गप्पा मारत बसला.

"अरे वा! आज चक्क आमच्याशी गप्पा मारत बसला आहेस. आज काही विशेष." अनीशची आई

"आई, काही नाही ग, असंच मी बोलायचं नाही का तुमच्याशी? बरं ठीक आहे जातो." असे म्हणून तो उठला आणि जाऊ लागला. तर त्याची आई "बस रे, चेष्टा पण करायची नाही का तुझी?" असे म्हणाली

"आई-बाबा, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं" अनीश

"बोलयला तुला कधीपासून परवानगी लागली? काही बोलायच आहे तर बोल ना बिनधास्त. प्रेमात बिमात पडलास की काय कोणाच्या?" असे आईने म्हटल्यावर अनीश थोडासा लाजला, ते पाहून त्याच्या आई-बाबांच्या सारं काही लक्षात आलं आणि नक्कीच कोणाच्या तरी प्रेमात पडलाय आणि तेच तो सांगणार आहे असे त्यांच्या मनात आले.

"अरे, मग सांग ना कोण आहे ती? कशी आहे? कुठली आहे? आणि काय करते? मग बघू लवकर." अनीशची आई

"हो हो सांगतोय ना तो, किती प्रश्न विचारशील ते? थोडा श्वास तरी घेऊ दे त्याला." अनीशचे बाबा

"बघा ना, कसा शांत बसलाय? अजून काही सांगत नाही. सांग ना अनीश, कोण आहे ती?" अनीशची आई म्हणाली

"आई, ती तुम्हाला माहिती आहे कोण आहे ते? तुमची ओळख आहे तिच्याशी. आई, तू तर खूप चांगलं ओळखतेस तिला. बाबा आजारी होते तेव्हा आली होती ती. आपल्या घरी पण आली होती." अनीश अडखळतच बोलत होता.

"अरे बोल ना स्पष्ट, कोण आहे ती? नाव सांग. इतका सगळा लेक्चर देत बसू नको. मला तिचं नाव ऐकायचा आहे." अनीशची आई

"हो आई, सांगतो. तिचं नाव आहे..." असे म्हणून अनीश तिचे नाव सांगणार इतक्यात अनीशच्या बाबांना कसंतरी होऊ लागलं आणि ते तिथेच चक्कर येऊन पडले. ते पाहून सगळेच घाबरले अनीश चटकन उठला आणि बाबांना हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला. तिथे गेल्यावर सगळी प्रोसेस डॉक्टरांनी सुरू केली. सगळी तपासणी झाल्यावर डॉक्टर म्हणाले की, यांना आयसीयू मध्ये हलवावे लागेल.

अनीश आणि अनीशची आई खूप घाबरले होते. तरी पण डॉक्टरांनी आधार दिल्यामुळे ते थोडे शांत झाले. त्यांना आयसीयूमध्ये घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी त्यांना केबिनमध्ये बोलावून घेतले आणि सांगितले की, "सरांना चार दिवस आयसीयूमध्ये ठेवावे लागेल, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली तर त्यांना डिस्चार्ज देता येईल नाहीतर परत आणखी थोडे दिवस आयसीयू मध्ये ठेवावे लागेल, त्यांना ऑक्सिजन कमी पडत आहे शिवाय बीपी सुद्धा खूप वाढलेला आहे."

"डॉक्टर, तुम्ही सगळी प्रोसेस सुरू करा. पण बाबा लवकर बरे झाले पाहिजेत. पैशाची काळजी करू नका." अनीश

"आम्ही सर्व प्रयत्न करू, तुम्ही काही काळजी करू नका." डॉक्टरांनी असे सांगितल्यावर अनीश आणि आई हे दोघेही केबिनच्या बाहेर आले.

अनीश त्याच्या आईला म्हणाला, "आई, तू घरी जा. थोडी विश्रांती घे. तुला देखील विश्रांतीची गरज आहे. मी इथे थांबतो. काय हवं? काय नको? ते बघता येईल."

"नाही रे, मला देखील घरामध्ये चैन पडणार नाही. मी सुद्धा इथेच थांबेन तुझ्यासोबत." अनीशची आई

"नको. आपण दोघे थांबलो तर डॉक्टर काहीतरी म्हणतील. तू जा घरी. घरामध्ये देखील कोणीतरी हवं ना. मी आहे. मी बघेन आणि सकाळी तू ये ना परत, मग मी जाईन घरी." अनीश

"बर ठीक आहे." असे म्हणून अनीशची आई घरी गेली. अनीश बाबांचा विचार करत होता. ते लवकर ठीक होती ना, असा विचार करत तिथेच बसला. इतक्यात त्याला अनुश्रीचा फोन आला.

"हॅलो, अनीश तू सांगितलंस का आई बाबांना? काय झालं? काय म्हणाले ते? हो म्हणाले की नाही म्हणाले." असे अनुश्री विचारताच अनीश एकही अक्षर बोलला नाही. तेव्हा अनुश्री परत म्हणाली, "अनीश, बोल ना. नाही म्हणाले का ते? बरं ठीक आहे. राहू दे. मला वाटलं होतं की ते हो म्हणतील. पण असु दे. आपलं प्रेम एकमेकांवर होतं आणि असंच राहील. मी तुझ्या आठवणींमध्ये अशीच राहीन. तुझा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा. आता आपण भेटायचं नाही. तू लग्न करून घे एखाद्या चांगल्या मुलीशी. माझी काहीच हरकत नाही. तू सुखी रहा. तुझ्या सुखामध्येच माझे सुख आहे." असे अनुश्री बोलत असतानाच अनीश रडू लागला. अनीश रडताना अनुश्रीला काहीच समजेना.

"अनीश, अरे रडू नकोस. आपली सोबत इथे पर्यंतच होती. आपण भेटत राहू, पण तू रडू नकोस. काय झालंय? रडायला सांग मला." अनुश्री

"अनु, बाबांची तब्येत बिघडली आहे. ते आता हॉस्पिटलमध्ये आहेत." अनीश

"काय? कधी? आणि कुठल्या हॉस्पिटल मध्ये आहेत ते?" अनुश्री

"ममता हॉस्पिटल मध्ये आहेत. अचानक चक्कर आली ग, आयसीयूमध्ये आहेत ते." असे म्हणून अनीश रडू लागला.

"अरे बापरे! मी आलेच थांब." असे म्हणून अनुश्री फोन ठेवणार इतक्यात अनीश, "थांब अनु,

तू आत्ताच येऊ नकोस. उद्या ये. आत्ताच आईला पण घरी पाठवले आहे आणि मी एकटाच आहे. तू गडबड करू नकोस." म्हणाला.

"बरं, ठिक आहे. मी उद्या येईन. पण तू काळजी घे." अनुश्री

"हो." म्हणून अनीशने फोन ठेवली आणि तो भिंतीला डोके ठेवून बसला. तिथेच त्याला थोडीशी झोप लागली, पण नंतर लगेच जाग आली. सकाळ कधी होईल याचीच तो वाट पाहत होता. तिथे एकेक मिनीटं म्हणजे त्याला दिवसासमान भासत होता. वेळ टळत नव्हती ना डोक्यातील विचार जात नव्हते. तो तसाच बसून राहिला. अख्खी रात्र त्याने तशीच घालवली. बराच वेळ गेल्यावर मग थोडी माणसं दिसू लागली, म्हणजे अर्थातच सकाळ झाली होती. अनीश तसाच बसून होता. थोड्या वेळाने अनीशची आई तिथे आली.

आईला पाहून अनीश म्हणाला, "आई, इतक्या लवकर का आलीस? अगं, आवरून आली असतीस तरी चाललं असतं."

"अरे बाळा, मला घरी करमेनाच. सारखं दवाखान्यातील आठवू लागले. म्हणून सगळं लवकर आवरून आले बघ." अनीशची आई

"आई, आता बाबांची तब्बेत बरी आहे. ते आता झोपले आहेत. ते उठल्यानंतर त्यांना बाहेर आणणार आहेत, मग आपण त्यांना भेटूया." अनीश

"देव पावला बघ. मला खूप टेन्शन आलं होतं." अनीशची आई

"आई, तू काहीच टेन्शन घेऊ नकोस ग." अनीश

"हो रे." अनीशची आई म्हणाली. असे त्यांचे बोलणे सुरू असतानाच अनुश्री आली.

"अनीश, बाबांना काय झाले? आता त्यांची तब्येत कशी आहे? बरी आहे ना." अनुश्री थोडी घाबरतच म्हणाली.

"हो. आता ते बरे आहेत. शुद्धीवर पण आले आहेत. अगं, पण तू इतक्या लवकर का आलीस? नंतर आली असतीस तरी चाललं असतं." अनीश

"नाही रे, घरी माझे मन कशातच लागेना. म्हणून म्हटले की आधी हाॅस्पिटलमध्ये जाऊन बघून तरी येऊ म्हणून आले." अनुश्री

"अनुश्री, प्रत्येक वेळी तू लगेच धावून येतेस बघ. आपले कोणत्या तरी जन्माचे नक्कीच ॠणानुबंध असतील ना." अनीशची आई असे म्हणताच अनीश मनातच म्हणाला, "याच जन्माचे ॠणानुबंध आहेत आई. लवकरच तुम्हाला मी सांगेन."

अनुश्री मात्र गालातच हसली आणि अनीशच्या आईजवळ बसली. थोड्या वेळाने उर्मी आणि तिचे आईबाबा आले. तोपर्यंत अनीशच्या बाबांना बाहेरच्या रूममध्ये शिफ्ट केले होते आणि डाॅक्टरांनी त्यांना भेटायलाही सांगितले. म्हणून सगळे जण त्यांना भेटायला गेले. आत गेल्यावर तब्बेतीची विचारपूस झाली.

"अरविंदा, आपली मैत्री खूप वर्षांची आहे ना." अनीशचे बाबा उर्मीच्या बाबांना म्हणाले.

"होय तर. अगदी काॅलेजमध्ये असल्यापासूनची आपली मैत्री आहे." उर्मीचे बाबा.

"मग आता त्या मैत्रीचे नात्यात रूपांतर करण्याची वेळ आली आहे." अनीशचे बाबा

"म्हणजे? मी काही समजलो नाही." उर्मीचे बाबा

"अरे, म्हणजे मुलांचे सुख तेच आपले सुख." अनीशचे बाबा

"हे बघ, आता तू जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोल. तू काय बोलत आहेस ते मला काहीच समजेना." उर्मीचे बाबा

"अरे, म्हणजे आपल्या मुलांची लग्न." अनीशचे बाबा

"काय?" उर्मीचे बाबा

"हे बघ, उर्मी आणि अनीश लहानपणापासूनचे मित्र आहेत. त्यांचे खूप छान पटते देखील. आता तर ते प्रेमातही आहेत. मग आपण कशाला अडथळा आणायचा?" अनीशचे बाबा असे म्हणताच अनीश आणि अनुश्रीच्या पायाखालची जमीनच सरकली. अनुश्री दोन पावले मागेच सरकली.

"अहो बाबा, हे काय बोलताय तुम्ही? माझ्या तर मनात..." असे अनीश पुढे बोलणार इतक्यात डाॅक्टर आले.

"चला सगळे बाहेर. पेशंटला त्रास देऊ नका. त्यांची तब्येत खूप नाजूक आहे. त्यांना त्रास होईल असे काही बोलू नका." डाॅक्टरांनी असे म्हटल्यावर सगळे बाहेर आले.

अनीश आणि अनुश्रीच्या मनात खूप वादळं चालू होते. बाहेर आल्यावर अनुश्री दवाखान्यातून निघून गेली. रस्त्यावरून जाताना तिच्या डोळ्यांतून पाणी ओघळत होते. तिचे मन खूप दुःखी झाले होते आणि तिच्या हृदयात सॅड साॅन्ग वाजू लागले.

देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही
सांग कुठं ठेऊ माथा कळनाच काही

देवा कुठं शोधू तुला मला सांग ना
प्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हा

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी

अर्थातच याप्रकारच्या तिच्या मनातून भावना उत्पन्न होत होत्या. अनुश्री एका बाकावर बसून खूप रडली. तिच्या डोळ्यांतून ओघळणारे पाणी थांबतच नव्हते. ती बराच वेळ हाॅस्पिटलच्या बागेतील बाकावर बसून होती.

इकडे अनीशची परिस्थिती काही वेगळी नव्हती. त्यालाही खूप मोठा धक्का बसला होता. त्याने इकडे तिकडे पाहिले तर त्याला अनुश्री कोठेच दिसली नाही. तो अनुश्रीला शोधू लागला. पण ती कोठेच नव्हती.

आता अनीश काय करेल? बाबांच्या इच्छेने उर्मीशी लग्न करेल की बाबांच्या विरोधी जाऊन अनुश्रीशी लग्न करेल.. मग त्याच्या बाबांच्या तब्येतीवर तर काही परिणाम होणार नाही ना... हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशःअनीश नेहमीप्रमाणे घरी गेला. जेवण झाल्यानंतर आई-वडिलांशी बोलायचं असे त्याने ठरवले होते, त्यामुळे त्याने पटकन जेवण करून घेतले. जेवण झाल्यावर तो हॉलमध्ये आई-बाबांशी गप्पा मारत बसला.

क्रमशः

🎭 Series Post

View all