एक प्यार ऐसा भी 16

marathi love story

"तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही एकच मला सांग, जर प्रेम असेल तर तू नकार का देतेस? तुझं माझ्यावर प्रेम आहे याची मला नक्कीच खात्री आहे, पण मला हे तुझ्या तोंडून ऐकायचं आहे मला सांग. माझ्या डोक्यावर हात ठेवून अगदी खरं खरं सांग." अनीश

"तुला जे ऐकायचं ते ऐक माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही." अनुश्री

"प्रेम आहे तर लग्न करायला काय अडचण आहे? माझ्यात काही दोष आहे का? की माझ्यासोबत संसार करायचं नाही. माझ्यात काही कमी असेल तर सांग, मी नक्कीच बदलण्याचा प्रयत्न करेन." अनीश

"कमी तुझ्यात नाही कमी माझ्यात आहे अनीश, म्हणूनच मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही." अनुश्री

"का करू शकत नाहीस? मला कारण सांग काय आहे ते. असं कोड्यात बोलू नकोस. स्पष्ट सांग काय कारण आहे." अनीश

"मी कधीच आई होऊ शकणार नाही. मला मूल होणार नाही. कारण जन्मतःच माझ्यात गर्भाशय नाही. तुझ्याशीच काय मी तर कुठल्याच सामान्य मुलाशी लग्न करू शकत नाही. सो मला एकटीला निवांत जगू दे." हे बोलत असताना अनुश्रीच्या डोळ्यातून आपोआप पाणी ओघळू लागले. हे ऐकून अनीशच्या तर पायाखालची जमीनच सरकली. दोन मिनिटं त्याला काय बोलावे हेच समजेना. तिथे एक भयाण शांतता पसरली. नंतर थोडा वेळ विचार करून अनीशने तिचा हात हातात घेतला आणि तिला म्हणाला,

"अनु, मी तुझ्यावर मनापासून प्रेम केले ग. त्या प्रेमामध्ये कोणतीही अपेक्षा नाही किंवा काहीतरी मिळावे यासाठी प्रेम केलं नाही. फक्त आयुष्यभरासाठी तुझी साथ मिळावी, आयुष्यभर तू सोबत राहावे हीच अपेक्षा केली आहे ग मी. यामध्ये बाळ किंवा आणखी काही मला नको आहे. मला फक्त तूच हवी आहेस. तुझ्या या कशाला मी कमीपणा म्हणत नाही. मला तू जशी आहेस तशीच हवी आहेस. आता आहे हे कारण ऐकूनही मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. म्हणून करशील माझ्याशी लग्न देशील मला आयुष्यभराची साथ." अनीश

हे बोलणे ऐकून अनुश्रीला आणखीनच भरून आले आणि तिने लगेच अनीशला मीठी मारली. अनुश्री बराच वेळ त्याच्या मिठीत होती थोड्या वेळाने तिने स्वतःला सावरले आणि त्याच्यापासून बाजूला झाली. अनुश्रीने लाजेने मान खाली घातली. ते पाहून अनीश म्हणाला,

"अहाहा! लाजल्यावर तू आणखीनच सुंदर दिसतेस यार. तुझ्याकडे पहातच राहावं असं वाटतं. आज मी खूप खूश आहे, कारण फायनली आता तू माझी होणार. सांग कधी लग्न करायचा आपण." अनीश

"तू म्हणशील तेव्हा, पण तुझ्या आई-बाबांना हे मान्य होईल का? माझा हा प्रॉब्लेम ते एक्सेप्ट करू शकतील का? जर ते नाही म्हणाले तर." अनुश्री

"माझे आई बाबा मॉडर्न विचारांचे आहेत. त्यामुळे ते एक्सेप्ट करतील असा माझा अंदाज आहे. जर त्यांनी एक्सेप्ट केलेच नाही तर आपण लग्न करून वेगळे राहू." अनीश

"नाही हं. मला हे आवडणार नाही. आपल्या प्रेमासाठी आई वडिलांना सोडून तू माझ्याकडे आलेलं मला अजिबात चालणार नाही. जे काही असेल ते त्यांच्या संमतीनेच होईल." अनुश्री

"मग आपण त्यांना हा प्रॉब्लेम सांगायलाच नको. त्यांना न सांगताच आपण लग्न करू आणि नंतर माझ्यात दोष आहे असे म्हणून आपण एखादं मूल दत्तक घेऊ." अनीश

"अजिबात नाही. त्यांना सांगितल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलायचे नाही आणि त्यांना एक्सेप्ट असेल तरच आपण लग्न करायचं, नाही तर मी आयुष्यभर तशीच राहायला तयार आहे. अनीश आई बाबांच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही लग्न सक्सेस होत नाही. मोठ्यांचे आशीर्वाद हे लागतातच. मला त्यांच्यासोबतच राहायचं आहे आणि त्यांना सारं काही सांगूनच." अनुश्री

"अगं पण लग्न माझंही आहे. मी बघेन काय करायचं ते? तू आता निवांत रहा." अनीश

"तुझं किंवा माझं नाही तर आपलं आहे लग्न. तेव्हा जे होईल ते आपल्या दोघांच्या मतानेच होईल. कोण्या एकाच्या नाही. समजल का?" अनुश्री

"हो हो, समजलं मॅडम, चला आता सेलिब्रेशन करूया का?" अनीश

"बरं चल." असे म्हणून दोघेही गेले.

अनीश अनुश्रीचा हात धरुन तिला खुर्चीत नेऊन बसवतो. नंतर त्याने केक मागवला. केक आल्यानंतर अनुश्री केककडेच पाहत बसली, तो तर केक मोठा आणि खूप सुंदर होता. अगदी अनुश्रीच्या आवडीचा होता. अनीशने अनुश्रीला खुणावले तसे अनुश्रीने केक कापला आणि तिने त्याचा एक पीस अनीशला भरवला अनीशनेही अनुश्री केकचा पीस भरवला आणि भरवताना थोडासा तिच्या नाकाला लावला. ते पाहून अनुश्री थोडी चिडली. "हे काय अनीश? नाकाला का लावलास केक? मला आवडत नाही." अनुश्री

"नाकावर खूप मोठा राग असतो ना म्हणून थोडासा लावला." असे म्हणून अनीश हसू लागला, ते पाहून अनुश्री देखील गालातच हसू लागली. त्यानंतर त्या दोघांनी मिळून जेवण केले. जेवणामध्ये सर्व पदार्थ हे अनुश्रीच्या आवडीचे होते. ते पाहून अनुश्रीला थोडेसे आश्चर्यच वाटले, कारण तिच्या आवडीचे पदार्थ अनीशला कसे काय माहित? हा तिच्या मनात विचार आला. अनुश्रीने पण अनीशला लगेच विचारले देखील, "अनीश माझ्या आवडीचे पदार्थ तुला काय माहित? हे सगळे तर माझ्या आवडीचे आहे. सांग ना." असे अनुश्री म्हटल्यावर अनीश हसू लागला.

"अरे नुसता हसतोस काय? सांग ना हे पदार्थ तुला काय माहित? मी तुझ्यासमोर कधीच बोलले नाही की मला हे आवडतं हे आवडत नाही. मग तुला कसे समजले?" असे अनुश्री म्हणत असतानाच अनीशने तिला थांबवले. "अगं हो हो हो, किती वेळ म्हणशील? सांगतो थांब. मला सावनीने सांगितले." अनीश

"काय? सावनी.. पण कधी? म्हणजे या प्लॅनमध्ये तिचाही सहभाग असणारच. तरीच मला ती भेटायला जा, भेटायला जा सारखं म्हणत होती. मला समजलेच नाही." अनुश्री

"तिने जबरी केली म्हणून तर तू आलीस ना. आली नसतीस तर तुझ्या मनातल्या भावना मला कशा कळाल्या असत्या?" अनीश

"हो ते पण आहेच." असे त्यांचे बोलणे चालू असताना अनुश्रीचा फोन वाजला. लगेच अनुश्री अनीशला म्हणाली, "आईचा फोन येतोय, चल आपल्याला निघावे लागेल." असे म्हणून तिने फोन उचलला. "हॅलो आई, येते लगेच." असे म्हणून तिने परत फोन ठेवला.

"अनीश, चल बाय मी निघते." असे म्हणून ती जाऊ लागली. अनीशने तिला थांबवले.

"हॅलो मॅडम, मला एकट्याला सोडून चाललात." अनीश

"अरे, घरी आई बाबा वाट पाहत आहेत. किती वाजलेत बघ? ऑफिस सुटून बराच उशीर झाला आहे." अनुश्री

"बरं, चल तुला सोडतो मी." अनीश

"नको. माझी मी जाईन. तुझ तू जा. उशीर झालाय. तुला पण उशीर होत असेल ना." अनुश्री

"आता भाव खाऊ नकोस. चल तुला सोडतो मी." अनीश

"बरं ठीक आहे चल." असे म्हणून अनीश अनुश्रीला सोडायला निघाला.

सुंदर रात्रीचे वातावरण, आकाशात चांदण्या पसरल्या होत्या, आजूबाजूला गर्द झाडी आणि गाडीमध्ये ते दोघे जणच. शांत वातावरण असतानाच अनीशने गाडीतील एफएम सुरू केला आणि त्यामध्ये सुंदर गाण्याची सुरुवात झाली. "लग जा गले कि फिर ये हसी रात हो ना हो.. शायद फिर इस जनम में मुलाखात हो ना हो..."

हे गाणे ऐकताना दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि अनुश्री गालातच लाजली. ते पाहून अनीश म्हणाला "अहाहा, सोने पे सुहागा. तू लाजल्यानंतर इतकी सुंदर दिसतेस ना, काय बोलू? फक्त तुझ्याकडेच पाहत बसावसं वाटतं. गाडी एका बाजुला थांबून तुझ्याकडे पाहत बसू का?" अनीश

"बस तुझी नौटंकी, चल आता उशीर होईल." अनुश्री

"तू म्हणजे ना, आता कुठे सुरुवात आहे? तर लगेच घरी चल, घरी चल म्हणून मागे लागतेस. अगं नवीन नवीन प्रेमात पडलोय आपण. सोबत थोडा वेळ घालवायला हवा ना. तू तर रोमँटिकच नाहीस." अनीश थोडासा नाराज होऊन म्हणाला.

"आधी घरी वेळेत गेले पाहिजे सरकार, नाहीतर आई बाबा फायलीवर घेतील तेव्हा समजेल कुठलं प्रेम आणि कुठलं काय?" अनुश्री हसत हसत म्हणाली

"तुझ्या घरी लव मॅरेज केलं तर चालेल ना! नाहीतर नंतर प्रॉब्लेम येईल." अनीश

"चालतं रे, माझे आई बाबा इतके पण जुन्या विचारांचे नाहीत. त्यांना सगळं चालतं. फक्त उशीर झालेला त्यांना आवडत नाही म्हणून." अनुश्री

अनीश अनुश्रीला तिच्या घरी सोडून निघून गेला. अनुश्री घरात आली. घरी आल्यावर तिचे आई-बाबा तिची वाट पाहत बसलेले होते, ते पाहून तिच्या लक्षात आले की, आई बाबा आज तिच्यासाठी जेवायचे थांबले होते. तसे त्यांचे सकाळी ठरलेलेच होते. पण अनीशच्या नादात ती सारं काही विसरून गेली.

"सॉरी आई बाबा मी वेळेत घरी येऊ शकले नाही. आज वाढदिवस होता त्यामुळे ऑफिसमधून सर्वांनी सेलिब्रेशन केले. त्यामुळे उशीर झाला आणि मी बाहेरच जेवून आले आहे म्हणून." अनुश्री

"बरं ठीक आहे. मी एवढ्या प्रेमाने केक बनवला होता, तो ठेवते तसाच फ्रीजमध्ये." अनुश्रीची आई

"नको ना आई, मी आले लगेच आवरून. आपण सेलिब्रेशन करू आणि मी माझ्या हाताने तुम्हा दोघांना वाढणार आहे. आले थांबा बघू." असे म्हणून अनुश्री आवरायला गेली. आवरून आल्यावर आईने बनवलेला केक तिने कापला आणि आई-बाबांना दोघांना भरवून त्यांच्यासोबत सेलिब्रेशन केले.

त्यानंतर आईने मस्त जेवणाचा बेत केला होता. आमरस पुरी आणि गुलाबजामुन. अनुश्रीने आई बाबांना वाढले आणि मनसोक्त गप्पा मारल्या. त्यात बराच वेळ निघून गेला. आज इतक्या दिवसांनी त्या सर्वांनी मिळून मनसोक्त गप्पा मारल्या होत्या. जेवण झाल्यानंतर अनुश्रीने आईस्क्रीम ऑर्डर दिली होती. सर्वांनी मिळून आईस्क्रीम खाल्ले.

"चला आता झोपायला जाऊ. खूप उशीर झाला आहे. अनु तुला उद्या ऑफिस नाही का? झोप आता." अनुश्रीची आई

"आई काय गं, मज्जा येत होती ना, तुझं आपलं असंच असतय बघ. बोलणं रंगात आलं होतं ना. आता झोपायला पाठवतेस लगेच."

"का बरं, सकाळी ऑफिस आहे ना तुला, उठायला उशीर होईल. झोप झाली नाही की मग पित्त होतं तुला. मग तू आजारी पडलीस तर पुन्हा ऑफिसला दांडी. हे नको आहे ना म्हणून म्हणते मी." अनुश्रीची आई

"बरं ठीक आहे, जाते मी, गुड नाईट." असं म्हणून अनुश्री झोपायला गेली. ती झोपल्यानंतर थोड्या वेळाने तिचा फोन वाजला. तिने फोन उचलला. तिकडून आवाज आला "अनीशचा एक्सीडेंट झालेला आहे." हे ऐकून तिच्या हातातून फोन खाली पडला. तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. कसंबसं ती उठून रिक्षा पकडून हॉस्पिटलमध्ये गेली. तिकडे गेल्यावर तिथे रक्तबंबाळ झालेला अनीश स्ट्रेचरवर झोपलेला तिला दिसला. ती गयावया करून डॉक्टरांना अनीशला तपासायला सांगत होती. अनुश्री खूप घाबरली होती. तिच्या अंगाला दरदरून घाम फुटला. अनीशला काही होणार तर नाही ना? मला खूप भीती वाटत आहे.

अनीशला खरंच काही होईल का? तो यातून वाचेल का? की आणखी काही घडेल? हे पाहण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
क्रमशः"तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही एकच मला सांग, जर प्रेम असेल तर तू नकार का देतेस? तुझं माझ्यावर प्रेम आहे याची मला नक्कीच खात्री आहे, पण मला हे तुझ्या तोंडून ऐकायचं आहे मला सांग. माझ्या डोक्यावर हात ठेवून अगदी खरं खरं सांग." अनीश

क्रमशः

🎭 Series Post

View all