एक प्यार ऐसा भी 14

marathi love story

अखेर दुसरा दिवस उजाडला, रविवार असल्याने ऑफिसला सुट्टी होती, अनीश निवांत झोपला होता, दोन दिवस त्याची खूप दगदग झाली होती, पण आज सुट्टी म्हटल्यावर तो निवांत होता. पार्टी तर संध्याकाळी होती आणि त्याला अस काहीच काम नव्हते. म्हणून त्याच्या आईने देखील त्याला उठवले नाही.

इकडे अनुश्रीच्या मनाची मात्र घालमेल सुरु होती, तिला लवकरच जाग आली, कारण पार्टीचे आमंत्रण खुद्द सरांच्या पत्नीने दिले होते, जावे तर पंचाईत न जावे तरी पंचाईत अशी तिची अवस्था झाली होती. तोच विचार करत असताना तिची आई तिथे आली, "अनु, आज सुट्टी आहे ना?" अनुश्रीची आई म्हणाली.

"हो आई, आज रविवार आहे ना." अनुश्री

"मग आज कोणता विचार सुरू आहे? लवकर उठलीस म्हणून विचारले." अनुश्रीची आई

"अगं आई, आज सरांकडे पार्टी आहे आणि सरांच्या पत्नीने मला स्वतःहून आमंत्रण दिलंय." अनुश्री

"अगं मग जा की, कसला विचार करतेस?" अनुश्रीची आई

"आई, अगं एक मन नको म्हणतंय तर दुसरं जा म्हणतंय, काय करू समजेना?" अनुश्री

"शांत बसून ठरव, शांत मन काय म्हणतंय? तेच ऐक, ते ऐकल्यावर तुला पण बरं वाटेल." अनुश्रीची आई

"बरं आई." म्हणून अनुश्री शांत बसली.

अनीश सकाळी त्याचे सगळे आवरून पेपर वाचत बसला, उर्मीची अजूनही तयारीच सुरू होती, ती अनीशजवळ येऊन म्हणाली, "अनीश आज पार्टीत मी मस्त ड्रेस घालणार आहे, अगदी तुझ्या आवडीचा पिंक कलरचा आणि त्याला सगळंच मॅचिंग असेल बरं, अगदी नेहमीप्रमाणेच, यू नो मॅचिंग सेन्स माझा किती चांगला आहे ते?"

"येस, तुझा हात कोणीच धरू शकत नाही, शेवटी मैत्रीण कोणाची आहेस?" अनीश

"अरे, तुझ्या मित्रांना बोलवायच ना पार्टीसाठी." उर्मी

"तू आहेस ना, बाकी मला कुणाची गरज नाही." अनीश

"मग मी काय बोलणार?" उर्मी

"तू काहीच बोलू नकोस, फक्त आत्तापासून आवरायला घे म्हणजे पार्टीपर्यंत आवरून होईल तुझं." असे म्हणून अनीश हसू लागला.

"काय रे अन्या? चालू झालं का तुझं परत? मला वाटलं सुधारला असशील." उर्मी

"मित्रांसाठी कधी बदलायचं नसतं?" अशी त्या दोघांची चेष्टा मस्करी सुरूच होती. बघता बघता संध्याकाळ झाली, सगळे तयारीला लागले होते. अनीशने मस्त स्काय ब्लू कलरचा शर्ट घातला होता आणि त्यावर ब्लेझर घातला होता, आधीचं हॅण्डसम असलेला अनीश आणखीनच रूबाबदार दिसत होता, त्याने एका हातामध्ये घड्याळ आणि गळ्यात एक लहान सोन्याची चेन घातली होती.

उर्मीने फेंट पिंक कलरचा वन पीस घातला होता, त्यासोबतच सगळं मॅचिंग केलं होतं, अर्थातच तिला नटायला, मिरवायला आवडायचं. तसेही ती खूप सुंदर होती, नटल्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली होती. सगळेच मस्त आवरून पार्टीसाठी आले होते. पण अनीशचे डोळे मात्र बाहेर होते, अनुश्रीच्या वाटेकडे. ती येईल की नाही याची शंका होती, बराच वेळ झाला तरी ती आली नाही म्हणून त्याने तिची वाट बघणे सोडून दिले.

इतक्यात अनुश्री आली, अनीशच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना, तो एकटक तिच्याकडे पाहत होता, ती फेंट पिंक कलरचा पंजाबी ड्रेस घालून आली होती, त्यावर रेड कलरचा मोठा दुपट्टा होता, तो दुपट्टा सावरतच ती आत आली आणि अनीशच्या आईजवळ गेली, तिकडे जाताना ती नजर चोरून अनीशकडे पाहत होती. ते अनीशच्या नजरेतून सुटले नाही. तो तिच्याकडेच पाहत होता. अनुश्री तिकडे गेल्यावर अनीश सुध्दा लगेच तिथे गेला. थोड्या वेळाने उर्मीचे लक्ष तिकडे गेले आणि तिच्या मनात पाल चुकचुकली, तिला वाईट वाटले, कारण तिचे देखील अनीशवर मनापासून प्रेम होते.

अनीशचे हिच्यावर प्रेम तर नसेल ना, ही आली आणि लगेच हा बोलायला गेला, नक्कीच काही तरी असेल का? नाही नाही अनीश काही तसा मुलगा नाही, खरंच त्यांचं प्रेम असेल तर.. अशा अनेक प्रश्नांनी उर्मीच्या मनात काहूर माजले होते. उर्मी सुद्धा बोलायला गेली, पण अनुशी काहीच बोलली नाही, ती अनीश सोबतच उभा राहिली, पण अनीश बोलत असताना तिने अलगदपणे अनीशचा हात हातात घेतला आणि मग ती बोलू लागली.

अनुच्या नजरेतून ते काही सुटले नाही, पण तिने पाहून न पाहिल्यासारखे केले. ते पाहून उर्मी आणखीनच अनीशच्या जवळ चिकटून उभा राहिली, ते पाहताना अनुश्रीच्या मनाची घालमेल सुरू होती, तिला ते पाहवत नव्हते म्हणून ती तिथून दुसरीकडे जाऊन उभा राहिली, ते पाहून अनीशची खात्री पटली की, उर्मी माझ्याजवळ आहे हे अनुला पाहवत नाही, याचा अर्थ तिचेही माझ्यावर प्रेम आहे पण ती कबूल करत नाही. यासाठी काहीतरी प्लॅन करायला हवा. पण नक्की तिच्या मनात काय आहे? हे देखील समजायला हवे, म्हणून तो मुद्दाम उर्मीचा हात हातात पकडून तिच्यासोबत बोलू लागला. ते पाहून अनुश्रीला खूप राग आला, ती तेथून निघून अनीशच्या आईशी बोलायला गेली.

"अगं अनुश्री, काहीतरी खाऊन घे जा. थांब मी अनीशला सांगते." असे म्हणून त्यांनी अनीशला हाक मारणार इतक्यात अनुश्री "नको काकू, माझी मी जाईन." असे म्हणून ती जाऊ लागली. कारण तिथेही तो उर्मी सोबत येणार आणि ते तिला नको होते. अनुश्री थोडफार खाऊन घेते. तिथे अनीश लगेच गेला.

"काय? झालं का खाऊन?" अनीश

"हो" अनुश्री

"चल तुला आमचं घर दाखवतो." अनीश

"नको मी जाते आता, खूप उशीर झालाय." अनुश्री

"फार वेळ नाही लागणार, चल ना." अनीश खूप आग्रह करू लागला पण अनुश्रीला जायचे नव्हते.

"मी पुन्हा नक्की येईन तेव्हा दाखव. आता नको प्लीज." अनुश्री

"ओके, पण पुन्हा नक्की ये." अनीश

"हं. चल बाय." असे म्हणून अनुश्री अनीशच्या आईला सांगायला गेली.

"काकू, मी जाते." अनुश्री

"जाते नाही ग, येते म्हणावं. तू परत लवकर ये." अनीशची आई

"हं" म्हणून अनुश्री जात असतानाच अनीशच्या आईने परत तिला बोलावले.
"अगं थांब, अनीश येतोय तुला सोडायला, एवढ्या रात्री एकटी कशी जाशील?" अनीशची आई

"नको काकू, मी जाईन एकटी. मला सवय आहे." अनुश्री

"नको म्हणते ना मी, अनीश येईल, मी बोलावलंय तुला, म्हणजे माझी जबाबदारी आहेस तू, तो येईल तुला सोडायला." अनीशची आई म्हणाली

"बर" म्हणून अनुश्रीने फक्त मान हलवली आणि ती अनीशची वाट पाहू लागली. इतक्यात अनीश आला, "चला मॅडम, हा ड्रायव्हर आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे." असे म्हणून हसू लागला.

"तुला काम असेल तर माझी मी जाईन." अनुश्री

"आईची ऑर्डर आहे, पाळलीच पाहिजे. चल." असे म्हणून अनीश गाडी काढण्यासाठी गेला. ते सगळं उर्मी पाहतच होती, तिच्या मनात खूप काही चालू होते.

अनुश्री आणि अनीशला असे एकत्र पाहून तिचा जळफळाट होत होता, म्हणून ती अनीशकडे गेली आणि मी पण येऊ का? असे तिने विचारले

"अगं मी अनुला सोडायला चाललोय, मी काही फिरायला वगैरे चाललो नाही, तू थांब ना पार्टीमध्ये, अजून पार्टी आहे मी येईन लगेच जॉईन होईन तुला." असे म्हणून गाडी सुरू केली आणि अनुश्री त्याच्या शेजारी गाडीत बसून केली. ते पाहून उर्मीला खूप वाईट वाटले, ती रागारागातच आत गेली.

इकडे थोडे पुढे गेल्यानंतर अनीशने गाडीत गाणी सुरू केले.
कसा सांग उरातला
घाव विसरावा
वनवा हा जिव्हारी चा
सांग विझवावा
कशापाई जडवावा
गुंतवावा सोडवावा
कितिदा नि कुणासाठी
आसवात भिजवावा
जीव हा.... सांग ना....

हे गाणे ऐकून अनीशने लगेच अनुश्रीकडे पाहिले, अनुश्रीला कसेतरीच वाटले.
"हा माझ्यावर इतकं प्रेम करतो आणि मी त्याला इतकं दुःख देत आहे. पण माझाही नाईलाज आहे, मी तरी काय करणार? माझं सुध्दा याच्यावर खूप प्रेम आहे पण मी ते त्याला नाही सांगू शकत." असा मनात विचार करत असतानाच एकदम ब्रेक लागला आणि ती भानावर आली.

"जरा हळू चालव ना गाडी. किती फास्ट चालवतोस? चालवता येत नसेल तर कशाला यायचं?" अनुश्री

"मी खूप चांगल्या प्रकारे गाडी चालवतो, माझ्यासारखे कुणाला जमणार नाही. समजलं का?" अनीश

"ते दिसतंय की" अनुश्री

"गप्प बस हं, नाहीतर वेडीवाकडी गाडी सुध्दा चालवता येते मला, तू शांत बसली नाहीस तर मी चालवून दाखवेन." असे म्हणून अनीशने गाडी जोरात चालवायला सुरुवात केली. ते पाहून अनुश्री थोडीशी घाबरली.

"हळू चालव ना गाडी. साॅरी मी चुकून बोलले, परत नाही बोलणार." अनुश्री अनीशला विनवणी करत होती.

"तुलाच हौस होती ना, घे आता." अनीश थोडासा रागातच म्हणाला.

"साॅरी ना आता" असे म्हणून अनुश्रीने अनीशचा हात पकडला. अनुश्रीने हात पकडल्यावर अनीश थोडा शांत झाला आणि आपोआप गाडीचा स्पीड कमी झाला. ते पाहून अनुश्रीने लगेच त्याचा हात सोडला. ते दोघेही शांत बसले, इतक्यात अनुश्रीचे घर आले, ती गाडीतून उतरली पण अनीशला घरी चल असे म्हणाली नाही. ती फक्त बाय ,गुड नाईट असे म्हणून निघून गेली, त्याचा अनीशला राग आला, त्या रागातच तो घरी जाऊन झोपला.

दुसऱ्या दिवशी अनीश नेहमीप्रमाणे आवरून ऑफिसला जायची तयारी करत होता. इतक्यात त्याला सावनीचा फोन आला आणि तो एकदम आश्चर्यचकित झाला. "ओह् शेट मी कसा विसरू शकतो. मी पण ना." असे मनातच म्हणून तो काहीतरी ठरवू लागला.

काय असेल? सावनीने का फोन केला असेल? अनीश काय विसरला हे पाहण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशःअखेर दुसरा दिवस उजाडला, रविवार असल्याने ऑफिसला सुट्टी होती, अनीश निवांत झोपला होता, दोन दिवस त्याची खूप दगदग झाली होती, पण आज सुट्टी म्हटल्यावर तो निवांत होता. पार्टी तर संध्याकाळी होती आणि त्याला अस काहीच काम नव्हते. म्हणून त्याच्या आईने देखील त्याला उठवले नाही.

क्रमशः

🎭 Series Post

View all