एक प्यार ऐसा भी 12

marathi love story

"अगं, मला पण आत्ताच समजले ग, खूप वाईट झालं." सावनी

"अगं, पण काय झालं सांगशील का? आता उगीच माझा जीव टांगणीला लावतेस बघ." अनुश्री सावनीवर ओरडली

"अग, हो सांगते थांब ना इतकी का ओरडतेस? सरांची तब्येत खूप बरी नाही, आणि ते हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहेत, काल रात्रीपासूनच त्यांना खूप त्रास होतोय, नेमकं काय झालंय? काही माहित नाही, आम्ही सगळे आता त्यांनाच बघायला जात आहोत हॉस्पिटलमध्ये, तू पण येतेस ना? आता तू रिजाईन देऊ शकत नाहीस, तर कधी सर बरे होऊन येतील, तेव्हा दे. आता ठेवून दे ते आणि चल आमच्या सोबत, आम्ही अनीशची वाट बघतोय, पण तो काही आला नाही आणि फोनही उचलत नाही, म्हणून आम्ही आता जाणार आहोत." सावनी

"काय सांगतेस? अशी कशी तब्येत अचानक बिघडली? आता मी कशी रिझाईन देणार? तिकडे काय परिस्थिती आहे आणि माझं काय चाललंय? असे सगळे म्हणतील मला." अनुश्री

"तेच तर तुला सांगत आहे मी, तू रिझाईन देऊ नकोस आत्ताच, पुढे बघू." सावनी

"पण मला ऑफिसमध्ये यायचं नाही, काही केल्या त्या अनीशशी बोलायचं नाही, मी काय करू? एकदा बोलायला लागले की, परत तेच तेच नको आणि मला हे सगळं थांबवायचं आहे." अनुश्री थोडीशी वैतागून म्हणाली.

"अगं मग बोलू नकोस ना तू, तुला कोण बोल म्हणतंय? फक्त ऑफिस मध्ये यायचं, स्वतःचं काम करायचं आणि शांत रहायचं." सावनी

"आणखीन एक होऊ शकते, आता सर नाहीत म्हटल्यानंतर त्यांच्या ऐवजी दुसरे कोणीतरी येईल, मी त्यांच्याकडे रिझाईन देऊ शकते, तसंच करेन ते बरोबर होईल." अनुश्री

"अगं पण सर जेव्हा परत येतील तेव्हा त्यांना खूप वाईट वाटेल ना, किती विश्वास ठेवला त्यांनी तुझ्यावर? तुला अवॉर्ड दिला. इतकं सारं करून त्यांना न सांगताच जाणार, हे काही बरोबर वाटत नाही, बघ एकदा विचार करून." सावनी

"तू खरं बोलत आहेस ग, पण जेव्हा सर येतील तेव्हा मी त्यांना एकदा भेटण्यासाठी नक्की येईन, ते मला नक्कीच समजून घेतील." अनुश्री

"बघ बाई तुझं तू काय ते ठरव?" असे सावनी म्हणाली

मग ते सगळे जण मिळून सरांना बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले, हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर सर आय. सी. यू. मध्ये ऍडमिट आहेत असे समजले, म्हणून त्यांनी सरांना बाहेरूनच बघितले आणि तिथेच बसलेल्या त्यांच्या पत्नीची समजूत घालून ते सगळे परत ऑफिसला गेले. पण अनुश्री मात्र तिथेच बसून राहिली, सरांच्या पत्नीशी बोलत ती तिथेच थांबली, कारण तिला आता ऑफिसला जायची इच्छाच नव्हती आणि ऑफिसला गेली तर तिथे अनीश असणार त्यापेक्षा इथेच थांबुया असेच ठरवून ती तिथेच बसली.

"काकू, तुम्ही काही खाऊन आलात की नाही? साॅरी, तुम्हाला काकू म्हटले तर चालेल का?" अनुश्री

"हो चालेल ग, मी काॅफी घेतली आहे मघाशीच. थोड्या वेळाने काहीतरी खाईन." सरांची पत्नी.

"सरांची तब्बेत आता कशी आहे? आणि अचानक कशी बिघडली?" अनुश्री

"आता बरी आहे ग, काल रात्री अचानक बीपी लो झाला, त्यामुळे चक्कर आली म्हणून अॅडमिट करून घेतले. मघाशीच शुध्दीवर आलेत. आता काही टेन्शन घेण्याचे कारण नाही असे डाॅक्टर म्हणाले." सरांची पत्नी.

"अच्छा, ते बरं झालं. आता लवकरच ते बरे होऊन ऑफिस जाॅईन करतील." अनुश्री एकदम आनंदाच्या भरात बोलून गेली.

"नाही ग, आता ते रिटायर्ड होणार आहेत, अजून किती दिवस काम करायचं? थोडी विश्रांती हवीच ना. खूप केलं आत्तापर्यंत, आता बास करा म्हणणार आहे." सरांची पत्नी.

"हो, खरंय. हक्काची विश्रांती हवीच." अनुश्री

"तुझं नाव काय?" सरांची पत्नी

"मी अनुश्री. अलिकडेच जाॅईन झाले आहे. सरांनी खूप प्रोत्साहन दिले म्हणून मी थोडीफार प्रगती करू शकले, नवीन असूनही मला प्रोजेक्ट बनवायला दिला. खरंच सर खूप चांगले आहेत." अनुश्री सरांचे खूप कौतुक करत होती.

"तू पण तितकीच लाघवी आणि हुशार आहेस ग, तू ऑफिसला जाणार नाहीस का?" सरांची पत्नी

"नाही, आज इच्छाच नाही ऑफिसला जायची, म्हणून थोडा वेळ बसून घरी जाईन." अनुश्री

"बरं, पण आज एकच दिवस हं. कामात हलगर्जीपणा मलाही आवडत नाही." सरांची पत्नी

अशाप्रकारे दोघी गप्पा मारत बसल्या होत्या, सरांच्या पत्नीला सुध्दा तेवढेच बरे वाटू लागले.
"काकू, तुम्ही घरी जाणार आहात की कोणी डबा घेऊन येणार आहे? नसेल तर मी आणू का डबा?" अनुश्री

"नको ग, मी जाईन थोड्या वेळाने घरी." सरांची पत्नी

"नको काकू मी घेऊन येते ना. उगीच तुमची दगदग होईल. तसेही मी ऑफिसला जाणार नाही, मग आणेन ना. त्यात काय एवढं?" अनुश्रीने खूपच आग्रह केल्याने त्यांनी शेवटी होकार दिला.

मग अनुश्री घरी जाऊन आईला सांगून तिने डबा बनवला. चपाती, भाजी, भात, वरण सार काही तिने डब्यांमध्ये भरून घेतले, परत एकदा सरांच्या पत्नीला फोन करून सरांना काय करून आणू, असे विचारून सरांसाठी गरम गरम वरण, भात डब्यात भरून घेतले आणि ती तिच्या स्कुटी वरून डब्बा घेऊन हॉस्पिटलला आली. तिथे आल्यानंतर डॉक्टरांनी सरांना काहीतरी खायला घाला म्हणून सांगितले असल्यामुळे त्यांची पत्नीने वरण-भात घेऊन सरांना दिले. सरांनी अनुश्रीचे खूप कौतुक केले, नंतर सरांचे जेवण झाल्यावर सरांची पत्नी आणि अनुश्री शेजारीच टेबलवर जाऊन बसल्या, सरांची पत्नी जेवायला चालू करणार, इतक्यात "तू पण घे ना, जेवली नसशील ना अजून," असे त्यांनी अनुश्रीला विचारले, तेव्हा अनुश्रीने मानेनेच नकार दिला. मग दोघी मिळून जेवू लागल्या. सरांच्या पत्नीला जेवण खूप आवडले "छान झालय जेवण, आईला सांग बरं."

"हो काकू सांगेन पण स्वयंपाक मी बनवला आहे." अनुश्री

"काय तुला स्वयंपाक बनवता येतो?" सरांची पत्नी

हे वाक्य ऐकून अनुश्रीला अनीशची आठवण झाली, त्यालाही खूप आश्चर्य वाटले होते की, तिला स्वयंपाक बनवता येते म्हणून.
"काय झालं? कोणत्या विचारात गुंतली आहेस?" सरांच्या पत्नीने प्रश्न केल्यावर अनुश्री काही नाही म्हणून शांत बसली.

अनुश्रीने जेवण झाल्यानंतर डबा वगैरे भरून पिशवीत घालून ठेवली आणि ती सरांच्या पत्नी सोबत बोलत बसली, इतक्यात तिला तिकडून अनीश येताना दिसला, त्याला पाहून ती म्हणाली, "काकू मी जाते आता."

"काही काम नसेल तर बस ना थोडा वेळ, मला पण तेवढीच सोबत होईल." सरांची पत्नी

"नको काकू, मी संध्याकाळी एक चक्कर टाकून जाईन." असे म्हणून अनुश्री उठणार इतक्यात अनीश तेथे आला.
"सॉरी सॉरी, मला खूप उशीर झाला यायला, मी लगेच डबा घेऊन येतो." अनीश असे म्हणताच अनुश्रीने चोरट्या नजरेने त्याच्याकडे पाहिले.

"अरे, अनुश्रीने डबा आणला होता आणि आमचं जेवण झालेलं आहे." असे सरांच्या पत्नीने सांगितले.

ते ऐकून अनीशच्या मनात अनुश्री बद्दल आणखीनच स्थान बळकट झाले, त्याच्या मनात तिच्याबद्दल आणखीनच प्रेमभावना जागृत झाली, तो एकटक तिच्याकडे पाहत उभा राहिला आणि ते पाहून अनुश्रीला थोडसं अवघडल्या सारखं वाटलं, "हा ऑफिसमध्ये असेल म्हणून मी येथे थांबले तर हा इथेही आला, सगळीकडून माझी पंचाईतच, बाबा म्हणाले तसे जर नियतीच्या मनातच असेल तर त्याला कोणीही काहीही करू शकणार नाही, माझ्या नशिबात जर प्रेम असेल तर ते मिळणारच." असे अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये चालू होते.

कसलासा खट्ट आवाज झाला म्हणून ती भानावर आली आणि सरांच्या पत्नीला सांगून तिथून निघाली, कारण आणखी थोडा वेळ ती तिथे बसली असती तर सरांच्या पत्नीला सगळे समजले असते आणि त्यांना हे समजू नये म्हणून ती लगेच तिथून निघाली.

घरी आल्यावर तिच्या मनामध्ये तोच विचार सुरू होता, कोणत्याही गोष्टीत तिचे लक्ष लागत नव्हते. ऑफिस सोडावे तर एक आणि न सोडावे तर एक अशी द्विधा मनःस्थिती झालेली. परत संध्याकाळी एकदा अनुश्री हाॅस्पिटलमध्ये जाऊन आली. तिथे सरांच्या पत्नी एकट्याच होत्या त्यामुळे ती तिथे बराच वेळ बोलत बसली. इतक्या वेळेत दोघींची छान गट्टी जमली. जणू त्या दोघी खूप दिवसांपासून ओळखत आहेत की काय? असेच वाटायला हवे. उशीर झाल्यामुळे अनुश्री परत त्यांचा निरोप घेऊन जाऊ लागली, इतक्यात त्यांनी अनुश्रीकडे तिचा नंबर मागितला. तेव्हा अनुश्रीने त्यांना नंबर दिला आणि त्यांचाही नंबर घेतला. मग ती घरी गेली. तिला त्या काकूंविषयी एक वेगळीच ओढ वाटत होती, तसेच त्यांनाही वाटत होते.

दुसऱ्या दिवशी अनुश्री नेहमीप्रमाणे आवरून ऑफिसला गेली, आज जावेच लागणार होते कारण तिने तसे सरांच्या पत्नीला सांगितले होते, ती ऑफिसमध्ये जाऊन तिच्या डेस्कवर बसणार इतक्यात सावनी तेथे आली,
"अनु, तू आलीस. मला वाटलंच होतं तू नक्की येणार." सावनी

"हो, पण फक्त सर येईपर्यंत, एकदा का सर आले तर मी हा जाॅब सोडणार आहे." अनुश्री

"हो ग, तोपर्यंत तू विसरशील सगळं." सावनी

"माझा निर्णय ठाम आहे, यात काहीही झाले तरी बदल होणार नाही." अनुश्री

"बरं ऐक ना, एक न्यूज आहे." सावनी

"आता कोणती न्यूज? स्पष्ट सांग हं, अजिबात आढेवेढे घ्यायचे नाहीत." अनुश्री

"नाही ग, ऐक, आज आपल्या ऑफिसमध्ये नवीन बाॅस येणार आहेत." सावनी

"काय?? कोण आहे? आणि कुठे आहेत?" अनुश्रीच्या प्रश्नांचा भडिमार सुरू झाला, तेव्हा वैतागून सावनी म्हणाली, "अगं, हो हो, सांगते थांब, थोडा श्वास तरी घे." सावनी

"बरं झालं यार आता मी जाॅब सोडू शकते. बोल ना लवकर कोण आहे नवीन बाॅस?" अनुश्री

"मला माहित नाही." सावनी हळूच बोलली.

"काय ग तू पण? माहित करून घ्यायचं ना, अर्धवट माहिती घेऊन येतेस." अनुश्री थोडीशी चिडक्या सुरात म्हणाली.

"अगं, पण आता ते येतीलच ना, आणि हे नवीन बाॅस म्हणजे सरांचा मुलगा आहे. अजून लग्न झालेलं नाही त्यांचं, खूप हॅण्डसम आहे म्हणे, चिकना आहे दिसायला, मी तर कधीपासून वाट बघत आहे, मला खूप आतुरता लागून राहिली आहे." सावनी

"तू सुधारणार नाहीस. तो इतका हॅण्डसम आहे तर त्याला ऑलरेडी गर्लफ्रेण्ड असेल ना. तू पण ना." अनुश्री

"असू दे ग, तेवढंच टाईमपास." असे म्हणून सावनी हसू लागली.

"गप्प ग, आता टाईमपास बंद कर आणि एखादा चांगला मुलगा बघून लग्न कर." अनुश्री

"हो राणी सरकार." सावनी
अशाप्रकारे दोघी गप्पा मारत असतानाच नवीन बाॅसची एन्ट्री झाली. त्या दोघी एकदम तिकडे पाहिल्या आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

"अरे बापरे! आता खूप कठीण आहे माझं, कसं व्हायचं? मी आता लगेच रिझाईन देते म्हणजे विषयच संपेल." अनुश्री मनातच बडबडत होती.

नवीन बाॅसची एन्ट्री झाली आणि त्या दोघींना धक्का बसला, कोण असेल नवीन बाॅस? सरांचा मुलगा होता तर मग या दोघी त्याला आधीपासूनच ओळखत होत्या का? तो अनुश्रीचे रिझाईन लेटर अॅक्सॅप्ट करेल का? या प्रश्नांची उत्तरे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः"अगं, मला पण आत्ताच समजले ग, खूप वाईट झालं." सावनी

क्रमशः

🎭 Series Post

View all